प्रादेशिक बातम्या

July 20, 2024 8:11 PM

views 22

मोदी सरकारच्या निर्णयामुळे कृषी आणि सहकार क्षेत्र अधिक बळकट झालं – राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

सहकार क्षेत्रासाठी नवीन मंत्रालय स्थापन करून केंद्रातील मोदी सरकारनं गेल्या १० वर्षात घेतलेल्या निर्णयांमुळे कृषी आणि सहकार क्षेत्र अधिक बळकट होत असल्याचं केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात सांगितलं. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेच्या वार्षिक पदवीदान समारंभात प...

July 20, 2024 7:34 PM

views 39

मनोज जरांगे यांचं पुन्हा आमरण उपोषण सुरू

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी या गावात पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे. उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सगेसोयरेंची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, तसंच तीनही गॅझेट लागू करावे या माग...

July 20, 2024 7:32 PM

views 44

राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी

राज्यात आज अनेक जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. रायगड, साताऱ्यातील घाट परिसर, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे.   रायगड जिल्ह्यात सर्व नद्यांना पूर आले असून रोह्यात कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. रोह्याजवळ भिसे खिंडीत दरड कोसळल...

July 20, 2024 7:13 PM

views 41

राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने कल असल्याचा शरद पवार यांचा दावा

राज्यात जनतेने ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून जनतेचे प्रश्न सुटले नाहीत. आता जनतेने महाविकासआघाडीकडून अपेक्षा ठेवल्या असून मविआ राज्याला स्थिर सरकार देईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत ह...

July 20, 2024 7:51 PM

views 37

भाजपाचं उद्या पुण्यात महाअधिवेशन

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं महाअधिवेशन उद्या पुण्यात होणार असून यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित हो...

July 20, 2024 3:35 PM

views 52

भाजपाच्या अधिवेशनात ५,३०० प्रतिनिधी उपस्थित राहणार – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

पुण्यात उद्या होणाऱ्या भाजपाच्या अधिवेशनात ५ हजार ३०० प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडी सत्तेत आल्यास महायुतीनं नागरिकांच्या कल्याणासाठी सुरु केलेल्या सर्व योजना ते बंद करतील, असं बा...

July 20, 2024 7:14 PM

views 42

मुंबईतल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाची निविदा रद्द करण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी

मुंबईतल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाची अदानी समूहाला दिलेली निविदा रद्द करून पुन्हा पारदर्शक पद्धतीनं निविदा काढावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.   धारावीकरांना त्यांच्या हक्काचं ५०० चौरस फुटांचं हक्काचं घर तिथेच मिळायला पाहिजे, ही आप...

July 20, 2024 2:49 PM

views 46

रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी

महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस पडत असून हवामान विभागानं रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावतीमध्ये जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाल्यानं चाकरमान्यांची...

July 20, 2024 12:23 PM

views 36

सरकारी तंत्रशिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न-अश्विनी वैष्णव

केंद्र सरकार विविध उपक्रमांद्वारे शासकीय तंत्रशिक्षण क्षेत्राचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. वैष्णव यांनी काल मुंबईत महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली, या बैठकीदरम्यान ...

July 20, 2024 12:15 PM

views 52

मनोज जरांगे पाटलांचे आजपासून पुन्हा आमरण उपोषण

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यापूर्वीच्या उपोषणावेळी सरकारच्या शिष्टमंडळानं दिलेलं कुठलंही आश्वासन पाळलं नाही, त्यामुळे पुन्हा उपोषणाचा निर्णय घेतल्याचं, त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.