प्रादेशिक बातम्या

August 5, 2024 7:23 PM

views 39

पुण्यात झिका विषाणूचे आणखी ७ नवे रुग्ण

पुण्यात झिका विषाणूचे आणखी सात नवे रुग्ण आढळले आहेत. या सात नवीन रुग्णांमध्ये कात्रज आणि कोंढवा भागातल्या पाच गर्भवती महिला, एक १८ वर्षीय तरुण आणि एक ४० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ७२ जणांना झिका विषाणूची लागण झाल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागानं दिला आहे.  

August 5, 2024 10:22 AM

views 72

बीड जिल्ह्यात दूध भेसळीविरोधात कारवाई, १३ हजार ३६८ किलो रासायनिक भुकटी जप्त

बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या कडा इथं काल अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईत भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी ११ लाख ८५ हजार ६८ रूपये किंमतीची १३ हजार ३६८ किलो रासायनिक भुकटी जप्त केली. तसंच बीड, अहमदनगर आणि धाराशिव इथं काल विभागातर्फे विविध ठिकाणी धाड टाकण्यात आली. या कारवाई...

August 5, 2024 10:18 AM

views 27

98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार

98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीमध्ये होणार आहे. दिल्लीच्या सरहद संस्थेकडे या संमेलनाचं यजमानपद असेल. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं काल मुंबई मराठी साहित्य संघात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. या संमेलनासाठी सात संस्थांनी निमंत्रण दिलं होतं. त्यापैकी पुण्याच्या महाराष्ट्र स...

August 5, 2024 10:16 AM

views 56

एसटी महामंडळातर्फे ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम

श्रावण महिन्याचा प्रारंभ आजपासून, म्हणजे श्रावणी सोमवारपासून होत आहे. यानिमित्त राज्यातल्या ज्योतिर्लिंगांच्या विविध प्रमुख शिवमंदिरांसह ठीकठीकाणच्या शिव मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे. दरम्यान, श्रावण महिन्यात एसटी महामंडळानं 'श्रावणात एसटी संगे तीर्थाटन' हा अभिनव उपक्रम सुरू केला...

August 5, 2024 9:59 AM

views 64

महाराष्ट्रात पुण्यासह अन्य भागात जोरदार पाऊस, पूरस्थितीमुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रात काल पुण्यासह अन्य काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या काही भागाला काल पुन्हा जोरदार पावसानं झोडपून काढलं. खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात पावसाचा जोर कायम होता. धरणातून मुठा नदीमध्ये सकाळपासून टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग सुरू होता. सिंहगड रस्त्यावरील एकतानगर, निं...

August 4, 2024 7:19 PM

views 50

श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्रचा दर्जा देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं सविस्तर आराखडा तयार केला जात आहे. या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्यासाठीचा १०० कोटींचा पहिला हप्ता आपण आज मंजूर करत असून या तीर्थक्षेत्राला...

August 4, 2024 7:16 PM

views 61

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय देखील पूर्ण भरले

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी 'हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' आज पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी पूर्णपणे भरला.  गेल्याच महिन्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ आज मध्य वैतरणा तलावही पूर्ण भरला आहे. गेल्या काही दिवसांत पाणलोट क...

August 4, 2024 7:08 PM

views 33

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना

भारतीय हवामान विभागानं पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर धोकादायक भागातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावं, त्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, सैन्याची मदत घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.  तसंच, बाधित लोकांसाठी निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्...

August 4, 2024 7:01 PM

views 45

९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीच्या सरहद संस्थेत होणार

९८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीच्या सरहद संस्थेत होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं आज मुंबई मराठी साहित्य संघ इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. या संमेलनासाठी एकूण सात संस्थांनी निमंत्रण दिलं होतं. त्यापैकी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेची इचलकरंजी शाखा, ...

August 4, 2024 6:56 PM

views 33

ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या शोभना रानडे यांचं पुण्यात निधन

ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या शोभना रानडे यांचं आज सकाळी पुण्यात  निधन झालं. त्या १०० वर्षांच्या होत्या. शोभना रानडे यांनी निराधार महिला आणि मुलांसाठी समाजकार्य केलं. भारत सरकारनं २०११ मध्ये त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. पुण्यात आगा खान पॅ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.