प्रादेशिक बातम्या

August 9, 2024 3:31 PM

views 37

कोल्हापूरातल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीत रंगमंच जळून खाक

कोल्हापूरातल्या ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री आग लागली. या आगीमुळे जीवितहानी झाली नाही, मात्र आगीत नाट्यगृहाचा रंगमंच जळून खाक झाला. नाट्यगृहाचा काही भाग तसंच छतही कोसळलं आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. नाट्यगृहाचा बहुतांश भाग लाकडाचा असल्यामुळे आग भरा...

August 9, 2024 10:38 AM

views 36

धुळे जिल्ह्यात तोरणमाळ इथं सेल्फी काढतांना पर्यटकाचा मृत्यू

धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातील तोरणमाळ इथं पर्यटनासाठी आलेल्या एका युवकाचा सेल्फी काढतांना मृत्यू झाला. निसरड्या कड्यावरून पाय घसरून हा युवक दीड हजार फूट खोल दरीत पडला; 4 ऑगस्ट रोजी ही घटना घडली; यानंतर तीन चार दिवसांनी त्याचा मृतदेह सीताखाई मधून बाहेर काढण्यात आला आहे.

August 9, 2024 10:37 AM

views 34

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ठाणे-नाशिक, आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.   दरम्यान गणेशोत्सवापूर्व...

August 9, 2024 10:33 AM

views 46

यवतमाळच्या डॉ.विवेक पोलशेट्टीवार यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर

यवतमाळच्या मुकूटबन इथल्या डॉ विवेक पोलशेट्टीवार यांना रसायनशास्त्रातील योगदानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 23 ऑगस्टला दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. डॉ पोलशेट्टीवार सध्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये प्रोफेसर आहेत.   हवेतील कार्बनचे ...

August 8, 2024 7:29 PM

views 27

राज्यभरातल्या घाऊक बाजार समित्यांची येत्या २७ ऑगस्ट रोजी बंदची हाक

अन्नधान्यावर वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानं बाजार समितीनं आकारलेला नियमन कर रद्द करावा या आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातल्या घाऊक बाजार समित्यांनी येत्या २७ ऑगस्ट रोजी बंदचा इशारा दिला आहे. या बंदमध्ये देशभरातल्या बाजार समितींचाही सहभाग असावा यासाठी उद्या दिल्ली इथं व्यापाऱ्यांची बैठक होणा...

August 8, 2024 7:20 PM

views 35

रसायनशास्त्रातल्या शांती स्वरूप भटनागर पुरस्कारासाठी यवतमाळचे डॉ.विवेक पोलशेट्टीवार यांची निवड

यवतमाळ जिल्ह्यातले मुकुटबनचे रहिवासी डॉ.विवेक पोलशेट्टीवार यांची राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांना रसायनशास्त्रातील शांती स्वरूप भटनागर हा पुरस्कार २३ ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणार आहे. सध्या ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये कार्यरत आहेत...

August 8, 2024 7:18 PM

views 31

नंदुरबार जिल्ह्यात ४ लाखांपेक्षा जास्त कुटुंबांना ३ गॅस सिलेंडर मोफत

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातून ४ लाखांपेक्षा जास्त कुटुंबांना वर्षाला ३ मोफत गॅस सिलेंडर रिफील करून दिले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी इंधन कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिली. सदर योजनेत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री...

August 8, 2024 7:16 PM

views 56

यवतमाळ जिल्ह्यातल्या ७६ क्षयरोगमुक्त ग्रामपंचायंतींची निवड

प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान अंतर्गत सन २०२३ साठी यवतमाळ जिल्ह्यातल्या ७६ क्षयरोगमुक्त ग्रामपंचायंतींची निवड झाली आहे. हा कार्यक्रम वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित कऱण्यात आला होता. यावेळी संरपंच आणि सचिवांचा सत्कार जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या हस्ते करण्यात आला.

August 8, 2024 7:01 PM

views 49

नंदुरबार इथं तीन दिवसीय आदिवासी महोत्सवाचं आयोजन

जागतिक आदिवासी दिनानिमित्त नंदुरबार इथं तीन दिवसीय आदिवासी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवा अंतर्गत  नंदुरबार शहरातून आज भव्य रॅली काढण्यात आली.  यात राज्यभरातून आलेल्या आदिवासी कलापथकांनी विविध नृत्याविष्कार सादर केले. राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे तारपा वाद्य वाजवत ...

August 8, 2024 3:32 PM

views 23

रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या विविध विषयाबाबत आढावा बैठक

रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या मराठवाडा उपकेंद्राच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. जालना इथल्या उपकेंद्राच्या पदनिर्मितीस मान्यता आणि मूल्यनिर्धारण अहवालानुसार संस्थेस देय असले...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.