प्रादेशिक बातम्या

August 12, 2024 3:46 PM

views 26

नागपूर इथं मेफेड्रोन कारखान्यावर छापा, ५२ किलो मेफेड्रोन जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयानं काल नागपूर इथं मेफेड्रोन कारखान्यावर छापा टाकून सुमारे ७८ कोटी रुपये किमतीचं ५२ किलो मेफेड्रोन जप्त केले. यासोबत कच्चा माल आणि उपकरणं देखील जप्त करण्यात आली आहेत. शहरातल्या एका निर्माणाधीन इमारतीत मेफेड्रोनचं उत्पादन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली....

August 12, 2024 3:29 PM

views 53

विधानसभा क्षेत्र विकास समिती गठीत नसल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी पात्र लाभार्थ्यांची यादी पुढच्या कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवावी

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ज्या जिल्ह्यात विधानसभा क्षेत्र विकास समिती गठीत झाली नाही, किंवा समितीकडून पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम झाली नाही, अशा जिल्ह्याची यादी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढच्या कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवावी, अशा सूचना राज्य शासनानं दिल्या आहेत. यासाठी विधानसभा क्षेत्र समि...

August 12, 2024 3:18 PM

views 73

आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यापेक्षा जास्त वाढवण्यासाठी पाठिंबा – शरद पवार

महाराष्ट्रात आरक्षणासंबंधाने दोन समाजात कटुता निर्माण होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून यावर तोडगा काढावा असं राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातलं सामाजिक ...

August 12, 2024 3:16 PM

views 49

राज्यात पावसाची विश्रांती

राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला, तरी विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. सिंचन प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रांमध्येही चांगला पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या विदर्भातल्या सहा मोठ्या प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातल्या उर्ध्व वर्...

August 12, 2024 8:43 AM

views 31

प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संविधानाचा आदर वाढावा, त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी, प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, काल छत्रपती संभाजीनगर इथं कृतज्ञता सोहोळ्यात केली. अजिंठा लेणी पायथ्याशी जागतिक दर्जाच्या बुद्धविहार विपश्यना केंद्राची उभारणी आणि ...

August 11, 2024 8:48 PM

views 56

भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्ता हीच पक्षाची सर्वांत मोठी ताकद -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्ता हीच पक्षाची सर्वांत मोठी ताकद आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज नागपुरात भाजपाच्या मध्य नागपूर कार्यकारीणीच्या बैठकीत बोलत होते. कार्यकर्ता जाती-धर्म-पंथानं मोठा होत नाही, तो कार्य आणि कर्तृत्व...

August 11, 2024 8:35 PM

views 26

हिंडेनबर्ग अहवालासंदर्भात भाजपाची विरोधकांवर जोरदार टीका

हिंडेनबर्ग अहवालासंदर्भात भाजपानं आज विरोधकांवर जोरदार टीका केली.  गेल्या काही वर्षांपासून संसदेचे अधिवेशन सुरू होते तेव्हा परदेशी संस्थेचा अहवाल प्रसिद्ध होतो असं भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. हे प्रकरण सरकारी कंपनीशी संबंधित आहे की खासगी कंपनी या संभ्रमातून व...

August 11, 2024 8:07 PM

views 43

कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या अत्याधुनिक शीत गृहांकरता  ११ कोटी रूपये मंजूर

अहमदनगर जिल्ह्यातल्या  राहाता आणि  शिर्डी या परिसरातला  शेतमाल सुरक्षित रहावा यासाठी राहाता इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या  अत्याधुनिक शीत गृहांकरता  ११ कोटी रूपये मंजूर केले असल्याची माहिती  पणन आणि अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.   सत्तार यांच्या हस्ते आज  राहाता बाजार ...

August 11, 2024 8:00 PM

views 61

लाडकी बहिण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातून ६ लाख १५ हजार १३६ अर्ज प्राप्त

राज्यशासनाच्यावतीनं सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहिण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातून  आतापर्यंत विविध ठिकाणाहून जवळपास ६ लाख १५ हजार १३६ अर्ज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ५ लाख ४२ हजार ८१९ अर्ज जिल्हास्तरीय समितीनं पात्र ठरवले असून पुढील कार्यवाहीसाठी हे पात्र अर्ज शासनाला सादर करण्यात...

August 11, 2024 7:48 PM

views 28

विधानसभा निवडणुकीला  काँग्रेस – महाविकास आघाडी एकत्र सामोरे जाणार – काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला

विधानसभा निवडणुकीला  काँग्रेस - महाविकास आघाडी एकत्र सामोरे जाणार आहेत, असं काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे. ते आज नांदेडमध्ये बातमीदारांशी बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्यावतीनं आज  नांदेडमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर आयोजि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.