प्रादेशिक बातम्या

August 21, 2024 7:32 PM

views 47

भाजपाचे धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील यांची राज्यसभेवर निवड निश्चित

  भाजपाचे राज्यसभेसाठीचे उमेदवार धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. देशभरात राज्यसभेच्या १२ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. महाराष्ट्रातून खासदार पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या दोन जागांवर पोटनिवडणूक...

August 21, 2024 7:03 PM

views 50

बदलापूर इथं कालच्या आंदोलनानंतर परिस्थिती सुरळीत

बदलापूर इथं दोन लहान मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी काल झालेल्या आंदोलनानंतर या भागातली परिस्थिती आणि रेल्वे वाहतूक सुरळीत असून अफवा पसरू नयेत, यासाठी काही दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे. बदलापूर आणि परिसरातल्या शाळा आज बंद ...

August 21, 2024 5:43 PM

views 42

राज्यातल्या रास्त भाव दुकानदारांचं कमिशन वाढवण्याबाबत सरकार सकारात्मक – मंत्री छगन भुजबळ

राज्यातल्या रास्त भाव दुकानदारांचं कमिशन वाढवण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज सांगितलं. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज रास्त भाव दुकानदारांची बैठख झाली, यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह...

August 21, 2024 7:07 PM

views 55

बदलापूरमधील लहान मुलींवरील अत्याचारप्रकरणी २४ तारखेला मविआचा ‘महाराष्ट्र बंद’

बदलापूरमध्ये लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं येत्या शनिवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला असल्याचं  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितलं. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर  मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते.  राज्यात लहान मुलं, महिलांवरच्या अत्याचाराच्या प्रकरणात...

August 21, 2024 3:26 PM

views 50

बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा राज्यात विविध ठिकाणी निषेध

बदलापूर इथं दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे पडसाद आज राज्यात विविध ठिकाणी उमटत आहेत. राज्यात ठिकठिकाणी निदर्शन, आंदोलन केली जात आहेत. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आणि राज्य सरकारच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट इथं आज निदर्शनं केली. राज्यपालां...

August 21, 2024 5:54 PM

views 70

रत्नागिरी विमानतळाच्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकनाथ शिंदे भूमिपूजन

रत्नागिरी विमानतळाच्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. या वेळी रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा पर्यटनासाठीचं केंद्र व्हावा यासाठी हे विमानतळ महत्त्वाचं ठरेल, असं प्र...

August 21, 2024 1:20 PM

views 49

कोल्हापुरात नेमबाज स्वप्नील कुसळेचं जल्लोषात स्वागत

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेतला कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसळे याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज कोल्हापुरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या स्वागत मिरवणुकीत  नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शालेय विद्यार्थी, खेळाडू  देखील सहभागी झाले होते.  &n...

August 21, 2024 8:32 AM

views 48

बदलापूर लैंगिक अत्याचार तपास प्रकरणी एसआयटीची स्थापना

ठाणे जिल्ह्यात बदलापूर मधल्या आदर्श महाविद्यालयात दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आलं आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं असून, मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आलं आहे. तसंच संस्थाचालकांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दे...

August 21, 2024 8:47 AM

views 54

राज्यात शक्ती कायदा आणावा – उद्धव ठाकरे

राज्यात शक्ती कायदा आणण्यासाठी आमच्या सरकारच्या काळात मसुदा तयार केला, तो या सरकारनं मंजूर करून शक्ती कायदा तयार करावा, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते. तर बदलापूर घटनेतल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी माग...

August 21, 2024 8:56 AM

views 54

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसात जोरदार पाऊस

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसात सात जिल्ह्यातल्या २२ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. आतापर्यंत विभागात ७३ पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल चांगला पाऊस झाला. दुपारी काही वेळ मुसळधार पाऊस झाल्यानंतर रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. जिल्ह्यातल्या तुर्काब...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.