प्रादेशिक बातम्या

August 31, 2024 9:11 AM

views 18

नदीजोड प्रकल्पाची राज्य मंत्रिमंडळात घोषणा, निधीसाठी प्रस्ताव लवकरच केंद्राकडे पाठवणार – खासदार हेमंत गोडसे

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या दमणगंगा-अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंग या नदीजोड प्रकल्पाला जलसंपदा विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. पुढच्या कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे पाठवला असून त्यानंतर अंतिम मान्यतेसाठी हा प...

August 30, 2024 8:13 PM

views 36

सहा लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचं गडचिरोली पोलिसांपुढं आत्मसमर्पण

गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या पश्चिम उपक्षेत्र विभाग तांत्रिक समितीचा सदस्य केदार उर्फ मन्या किंजो नैताम यानं आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. शासनाने त्याच्यावर ६ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. २०१२ ते २०२० पर्यंत तो प्लाटून क्रमांक १५ मध्ये कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे १८, जाळपोळीचे ३, खुनाच...

August 30, 2024 7:35 PM

views 51

मोसमी पावसाचा मुक्काम यंदा लांबण्याची हवामान विभागाची शक्यता

मोसमी पावसाचा मुक्काम यंदा लांबण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परतीचा मान्सून सुरु होतो. परंतु यंदा‘ला निना’च्या प्रभावामुळे तयार होणाऱ्या कमी दाबामुळे सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरपर्यंत मान्सून लांबण्याची शक्यता आहे. मान्सूनचा मुक्काम...

August 30, 2024 7:29 PM

views 42

शेतकरी हा फक्त अन्नदाता नसून ऊर्जादाताही आहे – मंत्री नितीन गडकरी

देशाच्या आर्थिक विकासात शेतकऱ्याचं योगदान अमूल्य असून कृषिनिर्मिष्ठेपासून तयार होणाऱ्या ऊर्जेचा विचार करता शेतकरी हा फक्त अन्नदाता नसून ऊर्जादाताही आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केलं आहे. अमरावतीच्या सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात आज ते बोलत होते. तंत्रज्ञान, ...

August 30, 2024 7:25 PM

views 22

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची राज्य सरकारवर टीका

येत्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा या हेतूनेच निवडणुका पुढे ढकलण्यात येत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. ते आज लातूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. एकिकडे सरकार प्रगतीशील शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यासाठी पैसे नसल्याचं सांगतं मात्र लाडकी ...

August 30, 2024 7:09 PM

views 36

प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हे वाढवण बंदर राज्यासाठी प्रगतीचं नवं शिखर ठरेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. या बंदराची निर्मिती करताना सर्वांचं हित ध्यानात ठेवू, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली. वाढवण बंदरामुळे आत्मनिर्भर आणि विकसित भारतात महाराष्ट्राची भूमिका आणखी मजबूत होईल, असं केंद्रीय ...

August 30, 2024 7:04 PM

views 39

मालवण राजकोटमधला शिवरायांचा पुतळा पडल्याबद्दल प्रधानमंत्र्याकडून दिलगिरी व्यक्त

देशातल्या सर्व बंदरांमधून होणाऱ्या एकूण कंटेनर वाहतुकीपेक्षा अधिक कंटेनर वाहतूक या बंदरातून होईल. इथं येणाऱ्या हजारो जहाजं आणि कंटेनर मुळे परिसराचा चेहरा मोहरा बदलून जाईल. महाराष्ट्राकडे विकासासाठी लागणारं सामर्थ्य आणि संसाधनं आहेत. महाराष्ट्राला समुद्री व्यापाराचा इतिहास आहे आणि भविष्यातही व्यापारा...

August 30, 2024 6:45 PM

views 40

गावांमध्ये नवीन ग्रंथालय मान्यतेचा फेर प्रस्ताव शासनाकडे तातडीनं सादर करावा – मंत्री चंद्रकांत पाटील

दहा हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांच्या नवीन ग्रंथालय मान्यतेचा फेर प्रस्ताव शासनाकडे तातडीनं सादर करावा, अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. जिल्हा ग्रंथालय आणि अन्य ग्रंथालयांच्या विविध मागण्यांसंदर्भात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झ...

August 30, 2024 6:40 PM

views 39

मुंबई मनपा आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीचा वापर करणार

नागरिकांसाठी आरोग्य सेवा आणखी सुलभ पद्धतीनं उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अद्ययावत आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीचा वापर करणार आहे. आरोग्य विभाग एकंदर चार टप्प्यांमध्ये या प्रणालीची अंमलबजावणी केली जाईल. नागरिकांना आरोग्य सुविधांसाठी वाट बघावी लागू नये आणि त्यांना सोप्या आणि डिजिट...

August 30, 2024 6:35 PM

views 37

काँग्रेस आमदार जितेश अंतापुरकर यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा

नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांचं मत फुटल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात होता, अशा आमदारांना यापुढं तिकीट दिलं जाणार नाह...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.