प्रादेशिक बातम्या

November 22, 2025 6:04 PM

views 73

२०२९ पर्यंत काँग्रेस पक्षाचं अस्तित्व फार शिल्लक राहणार नाही- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये प्रचंड विसंगती असल्यानं हा पक्ष देशातून हद्दपार होत आहे. २०२९ पर्यंत या पक्षाचं अस्तित्व फार शिल्लक राहणार नाही, असं  मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केलं. गडचिरोली इथं भाजपच्या नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं.त्यानंतर झालेल्या...

November 22, 2025 5:51 PM

views 40

हज यात्रेशी निगडित सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या भारतीय हज समितीला सूचना

हज यात्रेशी निगडित सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या सूचना केंद्रीय अल्पसंख्यक सचिव चंद्र शेखर कुमार यांनी भारतीय हज समितीला दिल्या आहेत. मुंबईत झालेल्या हज परिषदेत ते बोलत होते. हज यात्रेसाठी अर्ज करण्यापासून यात्रेहून परत आल्यानंतर करायच्या प्रक्रिया सुद्धा डिजिटल करण्याची ...

November 22, 2025 3:54 PM

views 76

राष्ट्रीय छात्र सेना-NCC ची क्षमता १७ लाखांवरून २० लाखापर्यंत वाढवण्याचा सरकारचा विचार

राष्ट्रीय छात्र सेना-NCC ची क्षमता १७ लाखांवरून २० लाखापर्यंत वाढवण्याचा आणि राष्ट्रीय विकास तसंच राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात विविध कार्यक्रमांत एनसीसीचा सहभाग वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. सुरक्षा सचिव राजेश कुमार सिंह यांनी ७८ व्या राष्ट्रीय छात्र सेना दिनानिमित्तानं नवी दिल्लीत राष्ट्रीय समर स्मारक...

November 22, 2025 3:49 PM

views 68

हिवाळी अधिवेशनापूर्वी बैठक घेऊन तोडगा काढावा – सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेची मागणी

सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेनं केली आहे. परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी तसं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलं आहे. बैठक न झाल्यास येत्या अकरा ड...

November 22, 2025 3:40 PM

views 87

राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट

  लातूरमध्ये ४ नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी ४४ तर सदस्य पदासाठी ६१४ जण निवडणुकीच्या रिंगणात उरले आहे. लातुरमध्ये काल नगराध्यक्ष पदासाठीच्या एकूण १५ तर सदस्य पदासाठीच्या १०७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. रत्नागिरी जिल्ह्यातही नगराध्यक्षपदांच्या सात, तर नगरसेवकपदांच्या ८४ अशा एकू...

November 22, 2025 3:20 PM

views 115

राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ८ जण ठार ८ जण जखमी

राज्यात दोन वेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमधे ८ जणांचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले. धाराशिव जिल्ह्यातल्या अणदूर जवळ आज सकाळी एका वाहन अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. धावत्या क्रूझर गाडीचे टायर फुटल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात ...

November 21, 2025 7:03 PM

views 4.8K

Malegaon Case: बालिकेवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी

बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आज नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीयांच्यावतीनं काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात हजारो नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं सहभागी होत आरोपीच्या फाशीच्या शिक्षेची मागणी केली.  जमावानं  घाेषणाबाजी करत न्यायालयात  घुसण्याचा प्...

November 21, 2025 6:51 PM

views 91

‘प्रोजेक्ट सुविता’ अंतर्गत ५० लाखांहून अधिक बालकांच्या पालकांची नोंद

महाराष्ट्र शासनाच्या “प्रोजेक्ट सुविता” अंतर्गत ५० लाखांहून अधिक बालकांच्या पालकांची नोंदणी पूर्ण झाली आहे. याशिवाय ४० लाख गर्भवती महिलांचा सहभाग या उपक्रमात नोंदवला गेला आहे. अशा प्रकारे एकूण ९४ लाख लाभार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे. या कार्यक्रमांतर्गत बालकांचं वेळेवर लसीकरण आणि गर्भवती महिल...

November 21, 2025 6:59 PM

views 175

धुळ्यात नगराध्यक्षांसह सर्व २६ नगरसेवकांची बिनविरोध निवड

धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा नगर परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच नगराध्यक्षांसह सर्वच्या सर्व २६ नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटच्या दिवशी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवर रावल यांची नगराध्यक्षपदी, तसंच भाजपाच्या काही नगरसेवकांची बिन...

November 21, 2025 5:47 PM

views 82

रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचं २२ नोव्हेंबरला आयोजन

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळातर्फे २२ नोव्हेंबर रोजी रत्नागिरीच्या नवनिर्माण शिक्षण संस्थेत रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणार असून, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.