प्रादेशिक बातम्या

September 11, 2024 9:31 AM

views 47

धुळे जिल्हा लवकरच औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जाईल-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या औद्योगिक भागात आता लवकरच धुळ्याचे नाव असेल,असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल धुळ्यात व्यक्त केला. धुळे जिल्ह्यातल्या जामफळ धरणावरून शिंदखेडा तालुक्यातल्या 54 गावांना शेतीसाठी थेट वाहिनीद्वारे पाणी पुरवठा करणार्‍या 'बंदिस्त नळ वितरण प्रणाली' या योजनेचा शुभारंभ काल फडवणीस ...

September 11, 2024 9:07 AM

views 41

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी कुटुंब भेट अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी राज्यभरात लाभार्थी कुटुंब भेट अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता दररोज 15 कुटुंबांची भेट घेऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही, हे तपासून पाहील आणि, हा लाभ मिळाला नसेल, तर संबंधित कुटुंबा...

September 10, 2024 7:06 PM

views 44

मुंबई पालिकेच्या कार्यकारी सहायक लिपिक पदभरतीबाबत ‘ही’ अट रद्द

बृहन्मुंबई महानगरपालिकेतल्या कार्यकारी सहायक लिपिक पदासाठी, दहावी आणि पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावं, या अटीतली  'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द करण्यात आली आहे. सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार असल्याचं प्रसिद्धी ...

September 10, 2024 7:38 PM

views 13

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विजय तथा अप्पा साळवी यांचं निधन

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विजय अर्थात अप्पा साळवी यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी रत्नागिरीतल्या मिरकरवाडा अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. काल रात्री त्यांचं वार्धक्यानं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना रुजवण्यात आणि वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ...

September 10, 2024 6:48 PM

views 31

राज्यात लाभार्थी कुटुंब भेट अभियानाची सुरुवात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी राज्यभरात  लाभार्थी कुटुंब भेट अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. राज्यात महायुतीला विजयी करण्यासाठी शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता दररोज १५ कुटुंबांची भेट घेऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही, हे तपासून तो मिळालेला नस...

September 10, 2024 6:38 PM

views 41

बावनकुळे यांना अडकवण्यासाठी गोष्टीचं राजकारण करू नये – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या मालकीच्या कारमुळे काल मध्यरात्री नागपुरात काही गाड्यांना झालेल्या अपघाताबाबत पोलीस योग्य तो तपास करत आहेत. पण केवळ बावनकुळे यांना  अडकवण्यासाठी या गोष्टीचं राजकारण करणं योग्य नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नाग...

September 10, 2024 6:32 PM

views 40

धुळ्यात ‘बंदिस्त नलिका वितरण प्रणाली’ योजनेचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भूमीपजून

धुळे जिल्ह्यात निर्माण होत असलेल्या जामफळ धरणावरून शिंदखेडा तालुक्यातल्या ५४ गावांना शेतीसाठी थेट पाणीपुरवठा करणार्‍या 'बंदिस्त नलिका वितरण प्रणाली’ योजनेचं भूमीपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. सहा राष्ट्रीय महामार्ग आणि मनमाड-इंदूर रेल्वे मार्गामुळे प्रवास आणि वाहतुकीची सोय...

September 10, 2024 6:29 PM

views 51

विधानसभा निवडणुकीत ‘आरपीआय’ला योग्य प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा – पक्षाध्यक्ष रामदास आठवले

आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते.   लोकसभा निवडणुकीत एनडीएला अपेक्षित यश मिळालं नसलं, तरी विधानसभेला आम्...

September 10, 2024 8:20 PM

views 43

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती स्थापन

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. त्यात तीन सहसंयोजक, विविध स्तरांवरच्या समित्यांचे प्रमुख, विशेष आमंत्रित आणि पदसिद्ध सदस्यांचा समावेश असल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. बूथ पर्यंतची यंत्रणा सक्षम करण्यासाठी प...

September 10, 2024 6:58 PM

views 45

ईद-ए-मिलाद दरम्यान डीजे आणि प्रखर प्रकाशझोतांवर बंदीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

आगामी ईद-ए-मिलाद दरम्यान डीजे आणि प्रखर प्रकाशझोतांवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. राष्ट्रीय हरित लवादानं याआधीच गणेश...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.