प्रादेशिक बातम्या

September 17, 2024 9:59 AM

views 30

हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज राज्यात, प्रामुख्यानं मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण होणार आहे. नांदेडमधे पालकमंत्री गिरीश महाजन, हिंगोलीत पालकमंत्री अब्दुल स...

September 16, 2024 7:03 PM

views 52

शिवसेनेचे संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी केलेलं वक्तव्य हिंसेला चिथावणी देणारं असल्यानं त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारच्या पायाखालची वाळ...

September 16, 2024 6:57 PM

views 33

धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करणं चुकीचं असल्याची विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भूमिका

धनगरांचा समावेश आदिवासी जमातीमध्ये करणं चुकीचं असून त्याला संपूर्ण आदिवासी समाजाचा विरोध कायम असेल. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते.  धनगर जातीचा आदिवासी जमातीमध्ये समावेश करण्यासाठी लवकरच जीआर काढण्याकरत...

September 16, 2024 3:12 PM

views 25

रेशनच्या तांदळाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात

रेशनच्या तांदळाची अवैध वाहतूक करणारा ट्रक भंडारा पोलिसांनी पकडला असून ८ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा ट्रक नांदेडवरून गोंदियाच्या दिशेने जात असल्याची माहिती भंडारा जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली असून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या ...

September 16, 2024 2:54 PM

views 34

मविआ राज्यात सत्तेत आल्यावर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू होणार – नाना पटोले

महाविकास आघाडीचं सरकार राज्यात सत्तेत आल्यावर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. शिर्डी इथं आयोजित  निवृत्तीवेतन राज्य महा अधिवेशनात ते बोलत होते. जुनं निवृत्तीवेतन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे, असं...

September 16, 2024 2:45 PM

views 59

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी धार्मिक तेढ निर्माण केल्याचा काँग्रेसचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातल्या गणपती विसर्जनाबाबत खोटी बातमी पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसनं केला आहे. याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करत, प्रदेश काँग्रेसच्या विधि विभागाचे अध्यक्ष ॲड. रविप...

September 16, 2024 3:25 PM

views 43

चित्रपटगृहात दृष्टीहीन आणि कर्णबधिर प्रेक्षकही चित्रपटांचा आनंद लुटणार

दृष्टीहीन आणि कर्णबधिर प्रेक्षकांना चित्रपटांचा आनंद लुटता यावा याकरता चित्रपटगृहात विशिष्ट यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याकरता माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडून ई सिनेप्रमाणन या यंत्रणेमधून प्रदर्शनाचं प्रम...

September 16, 2024 1:26 PM

views 39

प्रधानमंत्री आज देशभरातल्या पाच वंदे भारत रेल्वेगाड्यांना दूरस्थ पद्धतीने हिरवा झेंडा दाखवणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज देशभरातल्या पाच वंदे भारत रेल्वेगाड्यांना दूरस्थ पद्धतीने हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यात महाराष्ट्रातल्या पुणे-हुबळी, कोल्हापूर-पुणे आणि नागपूर-सिकंदराबाद या तीन रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.   तसंच दुर्ग ते विशाखापट्टणम आणि आग्रा छावणी ते वाराणसी या वंदे भारत रेल्वेग...

September 15, 2024 7:14 PM

views 74

अभियंता दिनानिमित्त नागपूरमध्ये राज्यस्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्रदान

अभियंता दिनानिमित्त आज नागपूरमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते राज्यस्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्रदान करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उत्‍कृष्‍ट कार्य करणारे अभियंते, वास्‍तुशास्‍त्रज्ञ, अतांत्रिक संवर्गातील कर्मचारी यांचा सत्‍का...

September 15, 2024 7:08 PM

views 58

नागपुरातल्या रामदेव बाबा विद्यापीठात आज डिजिटल टॉवरचं उपराष्ट्रतींच्या हस्ते उद्घाटन

  नागपुरातल्या रामदेव बाबा विद्यापीठात आज डिजिटल टॉवरचं उद्घाटन उपराष्ट्रती जगदीप धनखड यांनी केलं. विद्यार्थ्यांनी केवळ सरकारी नोकऱ्यांमध्ये नव्हे, तर तंत्रज्ञानातल्या संधींचा शोध घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.  या १२ मजली डिजिटल टॉवरमध्ये संगणक, विज्ञान, आणि अभियांत्रिकीसाठी आधुनिक तंत्रज...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.