प्रादेशिक बातम्या

September 22, 2024 6:35 PM

views 32

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळेल – पालकमंत्री विखे पाटील

अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज जिल्ह्यातल्या शिवपूरमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.  त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून  त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी...

September 22, 2024 7:22 PM

views 52

महायुतीत रिपब्लिकन पक्षाला बारा जागा देण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला बारा जागा देण्याची मागणी पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. महायुतीतल्या तीन प्रमुख पक्षांनी प्रत्येकी चार जागा रिपाईला द्याव्यात, असं ते म्हणाले.   विदर्भातल्या उत्तर नागपूर, उमरेड, उमर...

September 22, 2024 6:26 PM

views 49

लातूरमध्ये धनगर समाजाचं सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे हलगी वाजवून आंदोलन

धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करायच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आज धनगर समाजानं लातूर जिल्ह्यातल्या सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे हलगी वाजवून आंदोलन केलं. अहमदपूरचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील, उदगीर इथं क्रीडामंत्री संजय बनसोडे, निलंगा इथले भाजपा आ...

September 22, 2024 5:58 PM

views 35

नांदेड महानगरपालिकेतर्फे गोदावरी नदीघाटावर स्वच्छता मोहीम

‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमे अंतर्गत नांदेड महानगरपालिकेने गोदावरी नदीघाटावर आज स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छता मोहिमेत शहरातल्या अनेक महाविद्यालयातल्या विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. महानगरपालिका प्रशासनाच्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याच्या आवाहनाला  नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला....

September 22, 2024 3:25 PM

views 67

कोस्टल रोडला बेलापूरमधल्या नागरिकांचा विरोध

सिडकोतर्फे बेलापूर ते खारघर दरम्यान बांधण्यात येणाऱ्या कोस्टल रोडला बेलापूरमधल्या नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. बेलापूर जेट्टीजवळ नागरिकांनी आज मानवी साखळी करत आंदोलन केलं. वन टाईम प्लॅनिंग अंतर्गत नवी मुंबई महापालिकेनं बेलापूरचा विकास केला, असं असताना सिडकोतर्फे कोस्टल रोडसाठी या भागात आखणी क...

September 22, 2024 3:41 PM

views 35

नाशिकमधून रेल्वेद्वारे कांद्याची निर्यात पुन्हा सुरु होणार

कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिकमधून रेल्वेद्वारे कांद्याची निर्यात पुन्हा एकदा सुरु केली जाणार आहे. त्यासाठी रेल्वेच्या वाघिणी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक अरविंद मलखाडे आणि भुसावळ रेल्वे विभागाचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांनी दिलं. नाशिक र...

September 22, 2024 3:41 PM

views 42

मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मंत्री रामदास आठवले यांची प्रशंसा

दलित चळवळीचं रूपांतर आर्थिक विकासाच्या चळवळीत होण्यासाठी रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रशंसा केली आहे. मारवाडी फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार मंत्री रामदास आठवले यांना ...

September 22, 2024 2:09 PM

views 48

विदर्भात पुढचे पाच दिवस सलग मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

विदर्भात पुढचे पाच दिवस सलग मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मराठवाडा इथं पुढचे दोन दिवस तर मध्य महाराष्ट्र कोकण आणि गोवा इथं मंगळवार ते शुक्रवार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, छत्तीसगड इथं पुढचे चार दिवस तर नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा इथं पुढील सात दिवस मुसळधार ...

September 22, 2024 3:45 PM

views 34

पुण्यातल्या खासगी कंपनीत काम करणाऱ्या मुलीच्या आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

महाराष्ट्रात पुण्यातल्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या मुलीनं अतिरीक्त कामाच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. याप्रकरणी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने तपास करून चार आठवड्यात अहवाल द्यावा, अशी सूचना आयोगानं केली आहे. पीडित मुलगी केरळच...

September 22, 2024 10:58 AM

views 28

स्वच्छता ही सेवा’ अभियानानिमित्त मंत्री भूपेंद्र यादव मुंबईतील जुहू चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी

‘आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन मोहीम’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानानिमित्त केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव काल मुंबईत जुहू चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. स्वच्छता अभ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.