प्रादेशिक बातम्या

October 29, 2024 9:41 AM

views 65

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने डॉक्टर संतुक हंबर्डे यांना उमेदवारी घोषित केली आहे. खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झाल्यामुळे नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांचे पुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी घोषित केली आहे. र...

October 28, 2024 6:51 PM

views 36

काँग्रेसचे नेते अनिस अहमद यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अनिस अहमद यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मुंबईत राजगृह इथं हा पक्ष प्रवेश झाला. अनिस अहमद यांना वंचित बहुजन आघाडीने नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

October 28, 2024 6:48 PM

views 53

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभा निवडणुकीसाठी ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. माणमधून प्रभागर घार्गे, काटोलमधून माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख, तर खानापूरमधून वैभव पाटील यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. दौंडमधून रमेश थोरात, वाईतून अरुणादेवी पिसाळ, पुसदमधून...

October 28, 2024 6:44 PM

views 41

ईडीची बँक घोटाळा प्रकरणात नागपूरच्या एका व्यावसायिकाच्या मालमत्तेवर टाच

बँक घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने नागपूरच्या एका व्यावसायिकाची सुमारे ५०३ कोटी रुपये मूल्याच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. मेसर्स कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड आणि त्यांच्या प्रवर्तकांच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि आंध्रप्रदेशातल्या विविध ठिकाणाहून जप्त केल्या आह...

October 28, 2024 10:07 AM

views 69

मुंबईतील निवडक प्रमुख स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध

दिवाळी सणासुदीच्या काळात होणाऱ्या प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेत मध्य आणि पश्चिम रेल्वेनं प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई विभागातील निवडक प्रमुख स्थानकांवरफलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. प्लॅटफॉर्मवरील गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं पश्चिम रेल्वेच्या जनसंप...

October 28, 2024 3:16 PM

views 67

दीपावलीच्या मंगलपर्वाला वसुबारसपासून प्रारंभ

देशभरात दीपावलीच्या मंगलपर्वाला आज, गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारसेपासून प्रारंभ झाला. आज, गायवासराची पूजा करून दिवाळीची सुरुवात होईल. येत्या रविवारपर्यंत चालणाऱ्या या प्रकाशोत्सवानिमित्त महाराष्ट्रात सर्वत्र चैतन्याचं वातावरण आहे. मनोवेधक रोषणाईनं बाजारपेठा सजल्या आहेत. आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या...

October 28, 2024 8:47 AM

views 25

मुंबईत वांद्रे टर्मिनसवर झालेल्या चेंगराचेंगरीत ९ जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

मुंबईत वांद्रे टर्मिनसवर काल पहाटे प्रचंड गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाली, यात नऊ जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. वांद्रे टर्मिनस, इथल्या फलाट क्रमांक एक वर वांद्रे-गोरखपूर या गाडीत बसण्यासाठी मोठी गर्दी झाल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. दिवाळीसाठी आपल्या गावी जाणाऱ्या कामगारांचा या गर...

October 28, 2024 8:43 AM

views 27

अनेक मतदारसंघात पक्षांकडून उमेदवारीची अद्याप प्रतीक्षा, अर्ज भरण्याचा उद्या अखेरचा दिवस

राज्य विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपत आहे. महायुती तसंच महाविकास आघाडीसह अनेक पक्षांनी अद्यापही काही ठिकाणचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. आतापर्यंत महायुतीकडून २३५ उमेदवार जाहीर झाले असून, यामध्ये भाजपचे १२१, शिवसेनेचे ६५, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४९ उमेदवारांचा समावेश आह...

October 27, 2024 7:09 PM

views 53

वार्ताहरांनी बातमीची निष्पक्षता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवावी- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

वार्ताहरांनी बातमीची निष्पक्षता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवावी, असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केलं. आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीने आयोजित  अंशकालीन वार्ताहरांची कार्यशाळेत मुंबईत ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माहिती प्रसारण मंत्रालयाच्या ...

October 27, 2024 1:56 PM

views 38

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या तिसऱ्या याद्या जाहीर केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं गेवराई विधानसभा मतदारसंघातून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील, निफाडमधून दिलीप बनकर आणि पारनेरमधून काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाही...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.