प्रादेशिक बातम्या

November 8, 2024 2:50 PM

views 37

एकत्रिपणे मविआच्या पाठीमागे उभं राहा, जयंत पाटलांचं आवाहन

एकनाथ शिंदेंच्या सरकारने महाराष्ट्र अधोगतीकडे नेला आहे. त्यामुळे राज्याला पुन्हा प्रगतीच्या मार्गावर न्यायचं असेल, तर आपण एकत्रितपणे महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे,' असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये क...

November 8, 2024 2:35 PM

views 47

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काँग्रेसवर टीका

माझी लाडकी बहीण, माझा लाडका शेतकरी  या योजना महायुती सरकारने आणल्या. परंतु काँग्रेसच्या सरकारने कर्नाटक, राजस्थान येथे अशा  योजनांची आश्वासनं पूर्ण केली नाहीत, हे सर्वांना माहीत आहे, असं लोक जाणतात, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर मधे सांगितलं.

November 8, 2024 3:43 PM

views 44

ईडी कारवाईतून सुटका करण्यासाठी महायुतीमध्ये सामील झाल्याच्या वृत्ताचं भुजबळांकडून खंडन

ईडीच्या कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी महायुती सरकारमध्ये सामील झाल्याच्या वृत्ताचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी खंडन केलं आहे. आपण ओबीसी असल्यामुळे आपल्यावर कारवाई झाली असं भुजबळ यांनी म्हटल्याचं वृत्त ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी लिहीलेल्या पुस्तकाचा हवाला देत एका दैनिकाने ...

November 8, 2024 11:08 AM

views 13

कॉग्रेसच्या बंडखोर उमेदवारांचं सहा वर्षांसाठी निलंबन

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांना पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल आता कारवाईला समोर जाव लागणार असून, त्यांना पुढील सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती कॉँग्रेसचे कार्यकारी सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली...

November 8, 2024 10:19 AM

views 33

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची राज्याच्या विविध भागांत जाहीर सभा

महाराष्ट्र विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्याच्या विविध भागांत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रभारी रम...

November 8, 2024 9:54 AM

views 32

 निवडणुकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आज दोन प्रचार सभा

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ भाजपा नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा आजपासून सुरू होणार आहे. येत्या 14 नोव्हेंबर पर्यंत धुळे, नाशिक, अकोला, नांदेड, चंद्रपूर, चिमूर, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबई इथं पंतप्रधानांच्या प्रचार सभा होणार आह...

November 7, 2024 7:07 PM

views 31

विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने प्रचार

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोमाने सुरु आहे. राज्यातल्या दिग्गज नेत्यांसह इतर राज्यातल्या नेत्यांच्या देखील ठिकठिकाणी सभा होत आहेत. औरंगाबाद मध्य मतदार संघात महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी आज मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मतदारसंघात पदयात्रा काढली. महायुतीचे औरंगाबाद पूर्व मत...

November 7, 2024 7:04 PM

views 56

…म्हणून विरोधक महिलांसाठी योजना जाहीर करत आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्र आणि राज्य सरकारचं डबल इंजिन महाराष्ट्राचा विकास करत आहे. महाराष्ट्राचा विकास पाहून विरोधकांच्या पोटात दुखलं आणि त्यांनी खटले दाखल केले. परंतु याचा फटका आपल्यालाच बसेल हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर आता हे विरोधक महिलांसाठी योजना जाहीर करत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. अक...

November 7, 2024 6:57 PM

views 33

एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षा – सीबीटीच्या वेळापत्रकात बदल

मुंबई विद्यापीठातर्फे एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षा - सीबीटीच्या वेळापत्रकात बदल केला आहे. ऑनलाईन माध्यमातून होणारी ही परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार १० नोव्हेंबरला होणार होती आता ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनंच १७ नोव्हेंबरला विविध केंद्रावर घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी साडेचार हजारांहून अधिक विद...

November 7, 2024 6:51 PM

views 28

आचारसंहितेच्या कालावधीत उत्पादन शुल्क विभागाची राज्यात छापेमारी

निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत उत्पादन शुल्क विभागाची राज्याच्या विविध भागात छापेमारी सुरु आहे.   उत्पादनशुल्क विभागानं धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या छापेमारीत अवैध मद्यविक्री, वाहतूक प्रकरणी आतापर्यंत ७६ गुन्हे दाखल केले असून, ९३ लाख २ हजार ९७८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.