प्रादेशिक बातम्या

December 17, 2024 8:58 AM

views 41

रत्नागिरीत वायुगळतीमुळे बाधित विद्यार्थ्यी पुन्हा रुग्णालयात दाखल

रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगडमधल्या वायुगळतीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 19 विद्यार्थ्यांना काल पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवसांनंतर त्यांना शासकीय रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं; मात्र काल त्यांना परत त्रास जाणवू लागल्याने पुन्हा उपचारांसाठी आणण्यात आलं आहे.

December 17, 2024 8:44 AM

views 56

जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त हा यशाचा मूलमंत्र – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर स्वयंशिस्त हा यशाचा मूलमंत्र असल्याचा सल्ला राज्यपाल आणि कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी काल नागपुरात विद्यार्थ्यांना दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ११२व्या दीक्षान्त समारंभात राज्यपाल बोलत होते. या समारंभात एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी, पद...

December 17, 2024 8:36 AM

views 24

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या साठये महाविद्यालयात प्राचीन काळातील दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तूंचं प्रदर्शन

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे साठये महाविद्यालय (स्वायत्त), प्राचीन भारतीय संस्कृती व पुरातत्त्व विभाग, बौद्धविद्या विभाग, प्राणिशास्त्र विभाग, पुरातत्त्व विभाग, मुंबई विद्यापीठ, पर्यटन मंत्रालय, भारत सरकार, लब्धी विक्रम जनसेवा ट्रस्ट, अहमदाबाद, इन टू द पास्ट हेरिटेज, मराठी देशा फाऊंडेशन, पुरासंस्...

December 16, 2024 7:16 PM

views 47

एसटीनं तिकीट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सुपूर्द

एसटीनं तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, तसा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे, असं एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सांगितलं. उत्पन्न आणि खर्चात ताळमेळ राखण्यासाठी  हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले.   एसटीला नोव्हेंबरमध्ये ९४१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल...

December 16, 2024 6:26 PM

views 57

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश नसल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश नसल्याच्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये आंदोलनं करण्यात आली. कार्यकर्त्यांनी, भुजबळ यांचा मतदार संघ असलेल्या येवला तालुक्यात विंचुर इथं रास्ता रस्ता रोको केला, तर नाशिकमध्ये राष्ट्रवादी भवनासमोर घोषणाबाजी केली. काल रात्री काही कार्यकर्...

December 16, 2024 6:22 PM

views 43

विरोधकांनी मांडलेल्या कोणत्याही विषयावर चर्चा करायला सरकार तयार-देवेंद्र फडनवीस

विरोधकांनी मांडलेल्या कोणत्याही विषयावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज स्पष्ट केलं. ते नागपुरात विधिमंडळाच्या पायऱ्यावर बातमीदारांशी बोलत होते. सरकार कुठलीही माहिती लपवून ठेवणार नाही, असं ते म्हणाले.    सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नसल्या...

December 16, 2024 3:40 PM

views 56

धुळ्यात मांजा विक्रेत्यांवर पर्यावरण कायद्यानुसार १२ गुन्हे दाखल

धुळे शहर आणि धुळे ग्रामीण या भागातल्या मांजा विक्रेत्यांवर पर्यावरण कायद्यानुसार वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत १२ गुन्हे दाखल झाले आहेत. प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूंपासून बनवलेल्या नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री, साठवणूक आणि वापरास संपूर्ण धुळे जिल्हयात बंदी  आहे, त्यामुळे मकर संक्रातीच्या पार्श्...

December 16, 2024 3:37 PM

views 65

गायक आणि हार्मोनियम वादक पंडित संजय मराठे यांचं निधन

संगीतभूषण पंडित राम मराठे यांचे पुत्र, गायक आणि हार्मोनियम वादक पंडित संजय मराठे यांचं काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. राम मराठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला होता.

December 16, 2024 3:45 PM

views 60

विधानसभेत ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. कामकाज सुरू होण्याआधी विरोधकांनी ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा अशी घोषणाबाजी करत विधिमंडळ सदनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. कामकाजाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करुन दिला. त्यानंतर मंत्र...

December 16, 2024 3:47 PM

views 58

विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधन, देशभरातून शोक व्यक्त

विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं काल अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को इथं निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथंच त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या सहा दशकांच्या संगीत कारकिर्दीत झाकीर हुसैन यांना ५ ग्रॅमी पुर...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.