प्रादेशिक बातम्या

January 11, 2025 7:58 PM

views 143

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढणार

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्ष स्वबळावर लढणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. नागपुरात ते वार्ताहरांशी बोलत होते. नागपूरपासून मुंबईपर्यंत आपला पक्ष स्वबळावर लढत आहे, कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो, असं राऊत म्हणाले.  &nb...

January 11, 2025 3:50 PM

views 54

मेट्रो लाईन ७ आणि २एसाठी मिळालेली नियमित मंजुरी MMRDA च्या वचनबद्धतेचा दाखला- उपमुख्यमंत्री

मुंबई मेट्रो लाईन ७ आणि २ए या दोन्ही मार्गांवर पूर्ण गतीनं संचालनासाठी सीसीआरएस, अर्थात रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तां कडून सुरक्षा प्रमाणपत्र आज प्रदान करण्यात आलं. त्यामुळे ५० ते ६० किमी प्रति तास या मर्यादित वेगाऐवजी आता ८० किमी प्रति तास या पूर्ण क्षमतेनं मेट्रोचं संचालन होईल.   मेट्रो लाईन ७ आणि...

January 11, 2025 3:42 PM

views 74

वाशिम इथं सव्वा कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी आरोपींना अटक

वाशिम इथं झालेल्या सव्वा कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी आरोपींना २४ तासांच्या आत अटक केली आहे. अमरावती विभागीय पोलिसांसह वाशिम, यवतमाळ आणि अकोला पोलिसांनी ही संयुक्त कामगिरी केली.   यासाठी पोलिसांच्या पथकाला ७० हजार रुपयांचं बक्षिसही देण्यात आलं. अमरावती विभागीय पोलिस महानिरीक्षक रामदास ...

January 11, 2025 3:01 PM

views 26

चित्रपटसृष्टीत लेखकांना योग्य तो मान आणि कामाचं दाम मिळणं गरजेचं- जावेद अख्तर

चित्रपटसृष्टीत लेखकांना योग्य तो मान आणि त्यांच्या कामाचं दाम मिळणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन प्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांनी केलं आहे. २१व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाच्या काल झालेल्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान त्यांना ‘एशियन कल्चर’ या विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त...

January 11, 2025 2:59 PM

views 16

मुंबईत मरीन ड्राइव्ह इथं उद्या ५०० निवृत्त जवानांचं संचलन

१४ जानेवारी हा दिवस देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांमधून निवृत्त झालेल्या जवानांचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मुंबईत मरीन ड्राइव्ह इथं ५०० निवृत्त जवानांचं संचलन उद्या होणार आहे. यात शौर्यपदक विजेते जवानही सहभागी होतील.   देशाच्या सेवेसाठी निवृत्त जवानांचं योगदान अधोरेखित करणं हा या...

January 11, 2025 11:04 AM

views 21

‘एशियन कल्चर’ या विशेष पुरस्कारानं जावेद अख्तर यांचा गौरव

मुंबईत आयोजित २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला काल प्रारंभ झाला.   यावेळी ज्येष्ठ पटकथा लेखक आणि गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांना चित्रपट क्षेत्रातल्या भरीव योगदानाबद्दल 'एशियन कल्चर’ या विशेष पुरस्कारानं महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या हस्ते गौरवण्यात आलं.   या महोत्सवा...

January 11, 2025 9:40 AM

views 47

केंद्राकडून राज्यांना दीड लाखांहून अधिक कराच्या रकमेचं हस्तांतरण

केंद्र सरकारकडून राज्यांना काल डिसेंबर २०२४ साठी १ लाख ७३ हजार ३० कोटी रुपयांच्या करांच्या रकमेचं हस्तांतरण करण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्राच्या १० हजार ९३० कोटी ३१ लाख रुपयांचा वाटा आहे. राज्यांना भांडवली खर्चाला गती देता यावी तसंच विकासकामं आणि कल्याणकारी उपक्रमांना वित्त पुरवठा करणं शक्य व्हावं ,...

January 10, 2025 7:45 PM

views 56

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे २४१ अंकाची घसरण

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज २४१ अंकाची घसरण झाली आणि तो ७७ हजार ३७९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९५ अंकांची घट नोंदवत २३ हजार ४३२ अंकांवर बंद झाला.

January 10, 2025 7:40 PM

views 59

सराफा व्यापाराची फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक

कर्नाटकातल्या सराफा व्यापाराची ११ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना परभणी स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.   बेळगाव जिल्ह्यातल्या सराफा व्यापाऱ्याला सोन्याची नाणी कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवत आरोपी त्याच्याकडून १० लाखांची रोकड घेऊन पस...

January 10, 2025 7:42 PM

views 47

वानखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त १२ ते १९ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम

 मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमच्या उभारणीला यंदा ५० वर्षं पूर्ण होत असून सुवर्णमहोत्सवानिमित्त १२ ते १९ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. १९ जानेवारी रोजी होणाऱ्या भव्य कार्यक्रमात विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रवी शास्त्री, अजिंक्य रह...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.