प्रादेशिक बातम्या

January 19, 2025 7:19 PM

views 62

बीड जिल्ह्यात एसटी बसची धडक लागून तीन युवकांचा मृत्यू

बीड जिल्ह्यातल्या घोडका राजुरी गावाजवळ आज सकाळी एसटी बसची धडक लागून तीन युवकांचा मृत्यू झाला. पोलिस भरतीसाठी धावण्याचा सराव करणाऱ्या या तिघांना बीडहून परभणीकडे जाणाऱ्या बसची धडक बसली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे तिघेही घोडका राजुरीचे रहिवासी होते. अपघात...

January 19, 2025 3:17 PM

views 336

पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर

राज्यातल्या सर्व पालकमंत्र्यांची नावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जाहीर केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःकडे गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी ठेवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमं...

January 19, 2025 9:43 AM

views 19

राज्यातील गड किल्ल्यांवरील अतिक्रमण 31 मेपर्यंत काढण्याचं नियोजन

राज्यातल्या गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि नव्यानं अतिक्रमणं होऊ नयेत याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी काल बातमीदारांना दिली.   31 मेपर्यंत या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी ...

January 19, 2025 9:31 AM

views 55

दहावी-बारावी प्रवेशपत्रावरील जाती प्रवर्ग काढला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आयोजित इयत्ता बारावी परीक्षा प्रवेश पत्रावरील जातीचा प्रवर्ग काढून टाकण्याचा निर्णय राज्य मंडळानं घेतला आहे.   याबाबत विविध स्तरात नाराजी व्यक्त केल्यानंतर मंडळानं हा निर्णय घेतला असून दिलगिरीही व्य...

January 19, 2025 9:12 AM

views 48

मुंबईत आता एकाच तिकिटावर लोकल, बेस्ट, मेट्रो आणि मोनो प्रवास करता येणार

सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या दृष्टीनं मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मुंबईतील एकात्मिक तिकीट सेवा प्रणालीवर चर्चा करताना ते बोलत होते. ...

January 18, 2025 8:43 PM

views 31

जेईईच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर

राष्ट्रीय चाचणी संस्थेने जेईईच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केलं आहे. बी. ई. आणि बी. टेक या अभ्यासक्रमांसाठी होणारी परीक्षा २२, २३ आणि २४ जानेवारी रोजी घेतली जाणार आहे. त्यासाठीचं प्रवेशपत्र आज जाहीर करण्यात आलं. इच्छुक विद्यार्थ्यांना संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर ती मिळू शकती...

January 18, 2025 8:33 PM

views 18

अखिल मराठा फेडरेशनच्या तिसऱ्या संमेलनाचं रत्नागिरीत उद्घाटन

अखिल मराठा फेडरेशनच्या तिसऱ्या संमेलनाचं उद्घाटन आज रत्नागिरीत झालं. महाराष्ट्रातली ७५ मराठा मंडळं या संमेलनात सहभागी झाली आहेत. मराठा मंडळाच्या कार्यात तरुणांनी यायला हवं, स्पर्धा परीक्षा देऊन पुढं जायला हवं असं अखिल मराठा फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश सुर्वे यावेळी म्हणाले.    या संमेलनात डॉक्टर सु...

January 18, 2025 8:31 PM

views 36

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणी एकाला अटक

अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी रेल्वे पोलिसांनी छत्तीसगडमधील दुर्गमधून एकाला अटक केली आहे. दुर्ग रेल्वे स्थानकावरुन त्याला ताब्यात घेतलं. रात्रीपर्यंत मुंबई पोलीस तिथे पोहोचून त्याची चौकशी करतील आणि त्याचा ताबा घेतील.

January 18, 2025 8:26 PM

views 68

दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्रांवर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्रांवर इतर शाळा, महाविद्यालयातल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिले आहेत. यासोबतच या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कॉपीमुक्त अभियानातर्गंत जनजागृती साप्ताह राबवला जाणार अस...

January 18, 2025 8:23 PM

views 38

राज्यातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई प्रारुप लागू करणार

राज्यातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रारुप लागू करणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. याची अंमलजावणी दोन टप्प्यांमध्ये केली जाईल. त्यानुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीसाठी हे प्रारु...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.