प्रादेशिक बातम्या

January 21, 2025 7:22 PM

views 17

बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई

पुणे शहर परिसरात प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय मजुरांची माहिती संकलित करून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या  घुसखोरांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.   पुणे स्टेशन आणि महर्षि परिसरातून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महर्षीनगर भागात ...

January 21, 2025 7:16 PM

views 15

ज्येष्ठ कीर्तनकार डॉक्टर किसन महाराज साखरे यांच्या पार्थिवावर आळंदीत अंत्यसंस्कार

ज्येष्ठ कीर्तनकार डॉक्टर किसन महाराज साखरे यांच्या पार्थिवावर आज आळंदी इथं अंत्यसंस्कार झाले. काल रात्री त्यांचं पुण्यात निधन झालं होतं. ते ८९ वर्षांचे होते. साखरे महाराज यांचा शिष्य परिवार देशात, तसंच परदेशातही आहे. राज्य सरकारनं २०१८ या वर्षीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं ...

January 21, 2025 3:19 PM

views 40

बीड : जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं १३ सरपंच आणि ४१८ सदस्यांचं सदस्यत्व रद्द

जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं बीड जिल्ह्यातील १३ सरपंच आणि ४१८ सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीच्या राखीव जागांवरून निवडून आलेल्या सदस्यांना बारा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असतं. पण बीड जिल...

January 21, 2025 3:01 PM

views 51

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन

मराठी भाषेतल्या साहित्यनिर्मितीबद्दल राज्य शासनाच्यावतीनं दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी २०२४ या वर्षाकरता अर्ज मागवण्यात आले आहेत. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तकं या स्पर्धेसाठी पात्र आहेत. मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात य...

January 21, 2025 2:56 PM

views 59

दृष्टिहीनांना नवी दृष्टी मिळण्यासाठी नेत्रदानाचा संकल्प करावा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नेत्रदानातून अनेक दृष्टिहीनांना नवी दृष्टी मिळू शकते, त्यामुळे अधिकाधिक जणांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड- नॅब या संस्थेच्या ७४ व्या स्थापना दिनानिमित्त ते काल बोलत होते. या संस्थेच्या स्थापनेत क्रिकेटपटू विजय मर्चंट य...

January 21, 2025 12:51 PM

views 40

जागतिक आर्थिक मंच : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या दालनाचं उद्घाटन

दावोस इथं जागतिक आर्थिक मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या दालनाचं उद्घाटन केलं. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह विविध राज्यांचे आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस आज विविध कंपन्यांच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत, तसंच अनेक सामंजस्य करा...

January 21, 2025 8:49 AM

views 56

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती

राज्य सरकारनं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. मात्र प्रजासत्ताक दिनी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण होईल, असा शासन निर्णय सरकारनं जारी केला आहे. आदिती तटकरे यांची रायगडच्या आणि गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली होती. दरम्य...

January 21, 2025 8:45 AM

views 45

छत्रपती संभाजीनगरमध्ये बांगलादेशी शोधमोहीम राबवण्याचा पालकमंत्र्यांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बांगलादेशी नागरिक शोधमोहीम राबवणार असल्याचा इशारा, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल सिल्लोड इथं उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची भेट घेऊन बांगलादेशी घुसखोर या विषयी चर्चा केली, या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्...

January 21, 2025 8:44 AM

views 68

धाराशिवमध्ये आयुष्यमान कार्ड काढण्याच्या मोहिमेची अंमलबजावणी करा, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध आजारावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी महत्त्वाच्या आयुष्यमान भारत कार्ड काढण्याच्या मोहिमेची धाराशिव जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिले. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आयुष्यमान कार्ड काढण्यास...

January 21, 2025 8:34 AM

views 69

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

लाडकी बहीण योजना बंद होणार नसून, ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत राहील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. सरकारनं तीन हजार ७०० कोटी रुपयांचा धनादेश महि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.