प्रादेशिक बातम्या

December 20, 2025 9:58 AM

views 102

केंद्रिय शिक्षण मंत्रालयाचा ‘राष्ट्रीय कला उत्सव’ पुण्यात होणार

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असलेला 'राष्ट्रीय कला उत्सव 2025' यावर्षी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. उद्यापासून 23 डिसेंबरपर्यंत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशदा इथं हा उत्सव होणार आहे. शिक्षण अधिक सर्जनशील आणि आनंददायी बनवण्याच्या उद्देशानं भरवण्यात ...

December 19, 2025 8:14 PM

views 42

नागपूरमध्ये एका औद्योगिक केंद्रात पाण्याची टाकी कोसळून ६ जण ठार

नागपूरमध्ये एका औद्योगिक केंद्रात पाण्याची टाकी कोसळून ६ जण ठार झाले आहेत. आज सकाळी साडेनऊच्या सुमाराला बुटीबोरी इथल्या औद्योगिक वसाहतीत ही दुर्घटना झाली. यात ३ जण जागीच मृत्यूमुखी पडले, तर उर्वरित तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

December 19, 2025 8:13 PM

views 62

भारताच्या नेतृत्वावर आणि संस्कृतीवर जागतिक विश्वास वाढत आहे- मुख्यमंत्री

भारताच्या नेतृत्वावर आणि संस्कृतीवर जागतिक विश्वास वाढत आहे. भारताच्या प्राचीन परंपरेतून आलेल्या विचारातून हे शक्य झालं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केलं. मुंबईत वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते.    आफ्रिकेत नैसर्गिक साधनसंपत्ती प्रचंड असून नव्य...

December 19, 2025 8:08 PM

views 50

राज्यातल्या २९ महानगरपालिकांमध्ये महायुती म्हणून लढायची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी

राज्यातल्या २९ महानगरपालिकांमध्ये महायुती म्हणून लढायची आपली तयारी आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मांडली.    तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत निवडणूक लढायचा कोणताही प्रस्ताव नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. महानगरपालिका निवडणुकांच्या पा...

December 19, 2025 8:02 PM

views 70

माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती द्यायला न्यायालयाचा नकार

सदनिका घोटाळ्याप्रकरणी राज्याचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. न्यायालयानं शिक्षेला स्थगिती दिली नसल्यानं त्यांची आमदारकी जाईल, अशी माहिती या प्रकरणातल्या वकील श्रद्धा ढुबे-पाटील यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. मात्र वैद्यकीय कारणास...

December 19, 2025 9:41 AM

views 95

नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या

आगामी नाताळ आणि नवीन वर्षाच्या काळात होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन देशातल्या नऊ विभागात 138 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेनं घेतला आहे. या गाड्यांच्या एकंदर 650 फेऱ्या होणार असून यातील 244 फेऱ्यांबाबतची सूचना जारी करण्यात आली आहे. नाताळ आणि नवीन वर्ष प्रवाशांना विनासा...

December 18, 2025 8:06 PM

views 88

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा

सदनिका घोटाळ्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने  दोषी ठरवल्याच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. कायदे, नियम हे कोणत्याही व्यक्तीपेक्षा महत्त्वाचे आहेत, त्यामुळे ...

December 18, 2025 7:05 PM

views 75

आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक प्रकरणी आरोपीच्या मालमत्तांवर NIAची कारवाई

एनआयए, अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक प्रकरणी एका आरोपीच्या दोन मालमत्तांवर टाच आणली आहे. यात महाराष्ट्रात ठाणे इथला एक फ्लॅट आणि बिहार मधल्या जमिनीच्या तुकड्याचा समावेश आहे. पाटणा इथल्या विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार, एनआयए नं ही कारवाई केली. संबंधित आरो...

December 18, 2025 6:56 PM

views 80

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका फेटाळली

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. या सर्किट बेंचमुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणं सुलभ होईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर या याच...

December 18, 2025 3:35 PM

views 172

काँग्रेसला धक्का! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश

काँग्रेस नेत्या आणि विधान परिषद सदस्य प्रज्ञा सातव यांनी आज भाजपात प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. भाजपा प्रवेश करण्यापूर्वी प्रज्ञा सातव यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला. लोक...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.