प्रादेशिक बातम्या

February 6, 2025 7:29 PM

views 18

स्त्रीभ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी आणि मुलींचा जन्मदार वाढवण्यासाठी पीसीपीएनडीटी कायदा अधिक प्रबळ करणार- मंत्री प्रकाश आबिटकर

स्त्रीभ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी आणि मुलींचा जन्मदार वाढवण्यासाठी येत्या काळात पीसीपीएनडीटी, अर्थात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायदा अधिक प्रबळ करणार, असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत स्त्री आधार केंद्रानं आयोजित केलेल्या ...

February 6, 2025 7:25 PM

views 65

मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड, जलयुक्त शिवार या योजना पुन्हा सुरू केल्या जातील – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड, जलयुक्त शिवार या योजना पुन्हा सुरू केल्या जातील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नांदेड इथं झालेल्या सभेत दिली. यासोबतच लाडकी बहीण योजनेसह महायुती सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद होणार नसल्याचंही शिंदे म्हणाले. शक्तिपीठ महामार्...

February 6, 2025 7:23 PM

views 30

उद्योगांना त्रास देणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचे निर्देश

उद्योगांना त्रास देणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी पोलिसांना दिले आहेत. पिंपरी चिंचवड इथं पोलीस आयुक्तालय इमारतीच्या पायाभरणी समारंभात ते आज बोलत होते. राज्यातली होऊ पाहणारी जागतिक गुंतवणूक लक्षात घेता उद्योगांसाठी अनुकूल व...

February 6, 2025 7:21 PM

views 14

वरिष्ठ सनदी अधिकारी संजय सेठी यांची एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन सचिव संजय सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या पदावर लोकप्रतिनिधींची नियुक्ती होत होती, मात्र प्रथमच ही जबाबदारी एका सनदी अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली आहे. राज्य सरकारमध्ये भरत गोगावले यांचा समावेश झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं...

February 6, 2025 7:20 PM

views 41

ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन

ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक आणि लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज मुंबईत निधन झालं ते ७४ वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार चालू होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या मुंबईतल्या शिवाजीपार्क स्मशानभूमीत अंतिमसंस्कार करण्यात येतील. स्थापत्य अभियंता असलेले संझगिरी, मुंबई महानगरपाल...

February 6, 2025 5:12 PM

views 18

लातूर येथे असलेल्या गंजगोलाई परिसराच्या सुशोभिकरणाला निधी उपलब्ध करण्याचे उपमुख्यमंत्र्यांकडून निर्देश

लातूर जिल्ह्याचं ऐतिहासिक वैभव असलेल्या गंजगोलाई परिसराच्या सुशोभिकरणाला निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून त्या कामाचा सविस्तर आराखडा सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अज...

February 6, 2025 5:06 PM

views 167

ठाण्यात जलवाहिनीवर दुरुस्तीचं काम असल्याने पाणी पुरवठा मध्यरात्रीपर्यंत बंद

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या बारवी गुरुत्ववाहिनीवर कटाई नाका ते मुकुंद पर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीचं काम होणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, दिवा आणि मुंब्रा या भागात आज मध्यरात्री १२ वाजल्यापासून उद्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद...

February 6, 2025 3:58 PM

views 25

नापास विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत ढकलण्याच्या राज्यशासनाच्या योजनेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विरोध

नापास विद्यार्थ्याना पुढच्या इयत्तेत ढकलण्याच्या राज्यशासनाच्या योजनेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं विरोध केला असून, यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेला गंभीर धोका निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. विद्यार्थी परिषदेनं जारी केलेल्या निवेदनातून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात टीका...

February 6, 2025 3:52 PM

views 43

हिंगोली – बसने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जण ठार

भरधाव वेगाने जाणाऱ्या विनक्रमांकाच्या स्कूल बसने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव- रिसोड रस्त्यावर काल घडली. या अपघातात जखमी झालेल्या दोघांना सेनगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शो...

February 6, 2025 3:46 PM

views 43

रत्नागिरीत उद्यापासून क्षेत्रीय वैदिक संमेलनाचं आयोजन

रत्नागिरीत उद्यापासून क्षेत्रीय वैदिक संमेलन होणार असून, त्यात चारही वेदांचं पठण केलं जाणार आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतल्या भारतरत्न डॉ. पांडुरंग काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राने हे संमेलन आयोजित केलं आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात १०० वैदिक मान्यवर सहभागी होणार...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.