प्रादेशिक बातम्या

March 15, 2025 10:14 AM

views 43

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा

राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात काल पारा 39 ते 40 अंशांच्या आसपास होता; सोलापुरातही काल तापमान 41 अंश सेल्सियसपर्यंत नोंदवलं गेल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.   आज विदर्भात काळी ठिकाणी उष्णतेची ...

March 15, 2025 10:07 AM

views 24

बीज सोहळ्यासाठी देहू नगरपंचायतीकडून जय्यत तयारी

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमन अर्थात बीज सोहळा उद्या, रविवारी क्षेत्र देहू इथं होत आहे. यंदा तीनशे पंच्याहत्तरवा बीज सोहळा असून या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी देहू नगरपंचायतीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.   गावात स्वच्छतेची काम...

March 15, 2025 9:46 AM

views 43

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीत राज्य दुसऱ्या स्थानी

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत आतापर्यंत 1 लाख 92 हजार 936 सौर उर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्रानं देशभरात दुसरं स्थान मिळवल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावर दिली आहे.   गेल्या वर्षी 13 फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या या योजनेत देशभरात 10 मार्च 2025 पर्यंत 10...

March 14, 2025 9:02 PM

views 50

PM Gati Shakti: बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गासह विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा बैठकीत आढावा

प्रधानमंत्री गतिशक्ती अंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग गटाच्या ८९ व्या बैठकीत आज रस्ते, रेल्वे आणि मेट्रो क्षेत्रातल्या प्रमुख पायाभूत सेवा प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले. यावेळी चार रस्ते, तीन रेल्वे आणि एक मेट्रो अशा एकूण आठ प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले.    यात बदलापूर - कर्जत दरम्यान तिसऱ्या...

March 14, 2025 6:18 PM

views 39

भंडाऱ्यात झालेल्या स्फोटाप्रकरणी चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

भंडारा जिल्ह्यातल्या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात गेल्या २४ जानेवारीला झालेल्या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. हा स्फोट यंत्र आणि उपकरणांची दुरुस्ती करण्यात झालेल्या निष्काळजीपणामुळे झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. गुन्हा दाखल करण्यात आलेले चारही अधिकारी संरक्षण उ...

March 14, 2025 6:18 PM

views 54

पालघरमध्ये आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध – मंत्री प्रकाश आबिटकर

पालघर जिल्ह्यातल्या आरोग्य सेवांचं बळकटीकरण करून जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे. पालघर जिल्ह्यात मनोर इथल्या ट्रॉमा केअर सेंटर तसंच नंडोरे इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या...

March 14, 2025 3:32 PM

views 31

१ लाख ९२ हजार ९३६ सौर उर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्र देशात दुसरा

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत आतापर्यंत १ लाख ९२ हजार ९३६ सौर उर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्राने देशभरात दुसरं स्थान मिळवल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर दिली आहे. गेल्या वर्षी १३ फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या या योजनेत देशभरात १० मार्च २०२५पर्यंत एकूण १० ल...

March 14, 2025 10:34 AM

views 194

दूधाच्या किंमतीत वाढ ! जाणून घ्या, काय आहेत नवे दर ?

येत्या शनिवारपासून राज्यात गायीच्या आणि म्हशीच्या दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुण्यात कात्रज डेअरीमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गायीच्या दुधाची विक्री आता 56 वरून 58 रुपये...

March 14, 2025 9:16 AM

views 75

नीरा भिमा साखर कारखान्यावर हर्षवर्धन पाटील यांचं वर्चस्व कायम

इंदापूर तालुक्यातील नीरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे संस्थापक आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचं निर्विवाद वर्चस्व राहिलं आहे. सलग पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीत म्हणजे कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या ...

March 14, 2025 8:59 AM

views 61

अहिल्यानगर जिल्ह्यात मढी यात्रेला सुरुवात

भटक्यांच्या पंढरी म्हणून ओळख असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मढीच्या यात्रेला काल सुरुवात झाली. मंदिराच्या कळसाला नाथांची काठी लावून हा यात्रा उत्सव सुरू होतो. पहिल्या दिवशी कैकाडी समाजाला काठीचा मान असतो त्यानंतर गोपाल समाजालादेखील या काठीचा मान दुसरा आहे. कालच्या होळीच्या सणानंतर आज सर्वत्र धूलि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.