प्रादेशिक बातम्या

March 29, 2025 7:42 PM

views 51

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपूर दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. रेशीमबागेतल्या स्मृती मंदिरात ते डॉ केशव बळिराम हेडगेवार यांना आदरांजली वाहतील. त्यानंतर दीक्षाभूमीलाही भेट देऊन ते आदरांजली वाहणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नागपूरम...

March 29, 2025 7:38 PM

views 42

येत्या १ ते ४ एप्रिल दरम्यान संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, विदर्भात हवामान कोरडं राहील  असा अंदाज आहे.   येत्या १ ते ४ एप्रिल दरम्यान संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे ...

March 29, 2025 7:34 PM

views 65

IPL वर सट्टा लावणाऱ्या ५ जणांना जालन्यातून अटक

जालना जिल्ह्यात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणारे ४ बुकी आणि एका सट्टेबाजाला चंदनझिरा पोलिसांनी आज अटक केली. आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातल्या सामन्यावर सट्टा लावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.  पोलिसांनी या कारवाईत  मोबाईल, लॅपटॉप आणि इतर साहित्यासह एकूण...

March 28, 2025 8:45 PM

views 266

गेल्या ३ वर्षात मराठवाड्यात ३,०९० शेतकऱ्यांची आत्महत्या

गेल्या ३ वर्षात मराठवाड्यातल्या ३ हजार ९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. २०२२ मध्ये १ हजार २२, २०२३ मध्ये १ हजार ११६ आणि २०२४ मध्ये ९५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तां...

March 28, 2025 9:12 PM

views 48

शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा नुकसान भरपाई

राज्यातल्या ६४ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पीकविमा नुकसानभरपाई जमा होणार असल्याचं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं आहे. शासनानं विमा कंपन्यांना द्यायचा २ हजार ८५२ कोटी रुपयांचा प्रलंबित हप्ता वितरित करायला मान्यता दिल्यामुळे आता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या आधारशी जोडलेल्या खा...

March 28, 2025 7:40 PM

views 48

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची जिल्हानिहाय निरीक्षक म्हणून नियुक्ती

काँग्रेस पक्षात संघटनात्मक फेरबदलाचा भाग म्हणून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची जिल्हानिहाय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अहवालानंतर संघटनेत बदल होतील. या निरीक्षकांची बैठक आज सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. हे सर्व निरीक्षक त्यांना नेमून दिलेल्या जिल्...

March 28, 2025 8:45 PM

views 63

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता लवकरच मिळणार

'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'च्या सहाव्या हप्त्यांतर्गत उद्यापासून ९३ लाख २६ हजार शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. सहाव्या हप्त्यात सुमारे २ हजार १६९ कोटी रुपये रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या आधार आणि डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात जमा केली जाईल असं शासनाने कळवलं आहे. 

March 28, 2025 9:12 PM

views 80

सावधान ! उघड्यावर कचरा जाळल्यास बसणार दंड

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना यापुढं  १०० रुपयांऐवजी एक हजार रुपये इतका दंड आकारला जाणार असल्याचं महानगरपालिकेनं स्पष्ट केलं आहे. येत्या १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे. उघड्यावर कचरा जाळल्यामुळे वायू प्रदूषण तसंच पर्यावरण विषयक गंभीर धोके निर्माण होत असल्याची ...

March 28, 2025 8:56 PM

views 349

सरस्वती सन्मान पुरस्कार संस्कृत विद्वान महामहोपाध्याय साधु भद्रेशदास यांना जाहीर

२०२४ या वर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार प्रसिद्ध संस्कृत विद्वान महामहोपाध्याय साधु भद्रेशदास यांना जाहीर झाला आहे. ‘स्वामी नारायण सिद्धांत सुधा’ या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. मानपत्र, स्मृतीचिन्ह, १५ लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.   सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या...

March 28, 2025 7:04 PM

views 45

Nashik KumbhMela : मंत्री गिरीश महाजन यांनी केली त्र्यंबकेश्वर परिसराची पाहणी

नाशिकमध्ये  त्र्यंबकेश्वर इथं २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेऊन अनेक व्यवस्था नव्याने करण्यात येणार असल्याचं जलसंपदा, आपत्तीव्यवस्थापन आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज सांगितलं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी आज त्र्यंबक...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.