प्रादेशिक बातम्या

April 6, 2025 8:42 PM

views 40

येत्या ३-४ दिवसात महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात कमाल तापमानात

येत्या ३-४ दिवसात महाराष्ट्र, वायव्य भारत, मध्य भारत आणि  दक्षिण द्वीपकल्पात कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.  गुजरात, राजस्थान, हरियाणा चंदीगढ, दिल्ली आणि पंजाबमधे पुढचे चार-पाच दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.    पूर्व भारतात येत्या...

April 6, 2025 7:04 PM

views 52

मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशाकडून १२०० ग्रॅम सोनं जप्त

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी एका प्रवाशाकडून १ कोटी २ लाख रूपये किंमतीचं १२०० ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं आहे. जेदाह इथून इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातून आलेल्या या प्रवाशाच्या बँगेची तपासणी केली असता  त्यातून आणलेल्या दोन इलेक्ट्रिक इस्त्र्यांमध्ये २४ कॅरट सोन्...

April 6, 2025 6:22 PM

views 40

विधीसंघर्षित मुलांच्या पुनर्वसनासाठी हेल्प डेस्क स्थापन

विधीसंघर्षित मुलांच्या पुनर्वसनासाठी हेल्प डेस्क स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. विधीसंघर्षित मुलांच्या पुनर्वसनासाठी तसंच त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी या डेस्कच्या माध्यमातून कार्य केलं जाईल. गुन्हेगारीत अडकलेली अनेक मुलं गरीब, दुर्बल घटकांतली अस...

April 6, 2025 8:41 PM

views 25

देशभरात रामनवमीचा उत्साह

आज प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणजेच रामनवमी देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. अयोध्येतल्या राममंदिरासह देशातल्या विविध ठिकाणच्या राममंदिरांमध्ये दुपारी बारा वाजता रामजन्म सोहळा साजरा झाला. जगाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येत भाविक येत आहेत. देशभरात ठिकठिकाणी भजन, कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आय...

April 6, 2025 3:28 PM

views 28

भारतानं अर्थव्यवस्था दुप्पटीनं वाढवली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

गेल्या दहावर्षात भारतानं आपली अर्थव्यवस्था दुपटीनं वाढवली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज तमीळनाडूत रामेश्वरम इथं समुद्रावरच्या उघडता येणाऱ्या पंबन रेल्वे पुलाच्या उद्घाटनासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. गेल्या दह...

April 6, 2025 3:10 PM

views 21

रामनवमीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

हिंगोलीत संकटमोचन हनुमान मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. लहान मुलांनी श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांचा देखावा केला होता. नागपुरातही  उत्साहाचं  वातावरण असून  पोद्दारेश्वर राम मंदिरात विविध पूजा अर्चना केल्या जात आहेत. अकोला शहरात राजेश्वर मंदिर परिसरापासून बाईक रॅली काढण्यात आली. शिर्ड...

April 6, 2025 10:48 AM

views 51

सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी कणकवलीसह काही भागात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. जोरदार वाऱ्यानं, शहरासह अनेक ठिकाणी झाडं पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.अवकाळी पावसामुळे आंबा, काजू आणि जांभूळ पिकांचं मात्र नुकसान झालं आहे.

April 5, 2025 8:12 PM

views 47

राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित-मुख्यमंत्री

राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. या अनुषंगाने महसूल विभागाच्या १०० दिवस कृती कार्यक्रमासंबंधीच्या क्षेत्रीय कार्यशाळेचं कालपासून पुणे इथं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. १०० दिवसांचा कृत...

April 5, 2025 8:04 PM

views 152

महाराष्ट्र राज्याच्या राज्य मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्याच्या राज्य मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केली आहे. तसंच रविंद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर आणि गजानन निमदेव यांची राज्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती  करण्यात आली आहे. माहिती आयुक्तांचा कालावधी तीन वर्षांपर्यंत किंवा त्यांच्या वयाची ७६  वर्ष...

April 5, 2025 7:58 PM

views 42

सीबीएसईचा अभ्यासक्रम राबवल्यानं मराठी संस्कृती हरवणार नाही

राज्यातल्या शासकीय शाळांमध्ये सीबीएसईचा अभ्यासक्रम राबवल्यानं मराठी संस्कृती हरवणार नाही, मराठी अनिवार्यच राहील, तसंच स्थानिक इतिहासही अभ्यासक्रमातून वगळला जाणार नाही, अशी ग्वाही शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी आज दिली. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचानं आयोजित केलेल्या 'महाराष्ट्राचा सीबी...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.