प्रादेशिक बातम्या

June 16, 2025 1:15 PM

views 52

पुण्यातल्या इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्यानं ४ जणांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यात इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला, तर ५१ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. त्यापैकी ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. दोन ते तीन जण अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.    दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ए...

June 16, 2025 12:47 PM

views 38

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोर धरला असून जनजीवनावर परिणाम झाला आहे. राज्यातल्या शाळा आजपासूनच सुरु झाल्या, त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची आणि पालकांची पावसाने तारांबळ उडवली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी येत असून पुढचे दोन दिवस हीच स्थिती कायम राहण्य...

June 16, 2025 12:00 PM

views 44

पुणे इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्यानं २ जणांचा मृत्यू, ३२ जण जखमी

पुणे जिल्ह्यात आज तळेगाव नजीक कुंडमळा इथे इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्याने २ जणांचा मृत्यू झाला तर ३२ जण जखमी झाले. काही पर्यटक नदीत वाहून गेल्याची भीती असल्याने त्यांचा शोध घेण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचं पथक तसंच एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. या दुर्घटनेतून सहा जणांना वाचवण्यात यश...

June 15, 2025 3:21 PM

views 54

एसटी महामंडळाची उद्यापासून एसटी पास थेट तुमच्या शाळेत मोहीम सुरू

एसटी  बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून एसटी महामंडळ "एसटी पास थेट तुमच्या शाळेत" ही विशेष मोहीम राबवणार आहे. या मोहिमेतून विद्यार्थ्यांना एसटीचे पास त्यांच्या शिक्षणसंस्थांमधून वितरीत केले जाणार आहेत.  परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला तसे...

June 14, 2025 8:38 PM

views 48

नीट युजीचा निकाल जाहीर, कृशांग जोशी देशात तिसरा

वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षा नीट २०२५ चा  निकाल जाहीर  झाला  असून त्यात महाराष्ट्राच्या कृशांग जोशीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. राजस्थानच्या महेश जोशीने प्रथम क्रमांक तर मध्य प्रदेशच्या उत्कर्ष अवधियाने दुसरा क्रमांक मिळवला आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या ntaneet.nic.in या संकेतस्थळावर तपशीलवार निक...

June 14, 2025 8:31 PM

views 48

ISSF World Cup 2025 : आर्या बोरसे आणि अर्जुन बबुताला सुवर्ण पदक

ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आर्या बोरसे आणि अर्जुन बबुतानं सुवर्ण पदक पटकावलं. जर्मनीतल्या म्युनिचमध्ये १० मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीत त्यांनी ही कामगिरी केली.    स्पर्धेतलं भारताचं दुसरं सुवर्ण आणि एकूण चौथं पदक आहे. यापूर्वी सुरूची सिंगनं सुवर्ण पदक पटकावलं असून सिफ्ट कौर समरा आणि एला...

June 14, 2025 2:58 PM

views 33

पाच परदेशी विद्यापीठांची संकुलं महाराष्ट्रात उभारण्यासाठीची इरादापत्रं आज प्रदान

संपूर्ण जग आज भारताकडे फक्त एक जागा म्हणून नाही, तर ज्ञान आणि माहितीच्या क्षेत्रातला भागीदार म्हणून बघत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज केलं. पाच परदेशी विद्यापीठांची संकुलं महाराष्ट्रात उभारण्यासाठीची इरादापत्रं या विद्यापीठांना आज देण्यात आली, या कार्यक्रमात ते म...

June 13, 2025 8:24 PM

views 24

नागपूरमध्ये सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना उभा राहणार

नागपूरमध्ये सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभा राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मॅक्स एअरोस्पेस अँड एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि राज्य शासनाच्या उद्योग विभाग यांच्यात या संदर्भात सामंजस्य करार करण्...

June 13, 2025 7:19 PM

views 18

मोबाईल ग्राहकांना प्रीपेडमधून पोस्टपेड किंवा पोस्टपेडमधून प्रीपेडमध्ये बदलणं सोपं जाणार

दूरसंचार विभागाने सिम कार्डाशी संबंधित नियमांमध्ये बदल केला असून त्यानुसार मोबाईल ग्राहकांना प्रीपेडमधून पोस्टपेड किंवा पोस्टपेडमधून प्रीपेडमध्ये बदलणं सोपं जाणार आहे. दूरसंचार विभागाने प्रक्रियेसाठी लागणाऱ्या ९० दिवसांच्या कालावधीत कपात केली असून हा कालावधी आता ३० दिवसांचा असेल. तसंच या नवीन नियमां...

June 13, 2025 4:19 PM

views 31

राज्यस्तरीय खरीप हंगाम २०२४-२५ पीक स्पर्धेत पहिल्या चार क्रमांकाचे मानकरी सातारा जिल्ह्यातले

राज्यस्तरीय खरीप हंगाम २०२४-२५ पीक स्पर्धेत पहिले चार क्रमांक सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मिळवले आहेत . सातारा जिल्हा कृषी अधीक्षकांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल अशा ११ पिकांसाठी ही स्पर्धा राज्यस्तरावर घेतली होत...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.