राष्ट्रीय

November 18, 2024 8:15 PM

views 39

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान लाओस देशाच्या दौऱ्यावर जाणार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान लाओस देशाच्या दौऱ्यावर जाणार असून तिथं ते आसियान संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. प्रादेशिक  आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा मुद्द्यांवर ते परिषदेत मार्गदर्शन करतील. ते अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, लाओस, मलेशिया, न्यूझीलंड, फिलिपा...

November 18, 2024 7:51 PM

views 56

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

महाराष्ट्रात, विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज संध्याकाळी थांबली. राज्यात यंदा ९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार २८८ आमदारांना निवडून देणार आहे. त्यांच्यासाठी १ लाख ४२७ मतदान केंद्रं उभारली असून दुर्गम भाग वगळता इतर ठिकाणी सकाळी ७ ते सं...

November 18, 2024 2:46 PM

views 24

दिल्लीतल्या वाढत्या प्रदुषणावर उपाययोजना करायला उशीर का ? – सर्वोच्च न्यायालय

दिल्लीतल्या वाढत्या प्रदुषणावर उपाययोजना करायला उशीर का केला, असा प्रश्न आज सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला विचारला आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन या उपायाची अंमलबजावणी करायला विलंब केल्याबद्दल न्यायालयाने दिल्ली सरकारवर ताशेरे ओढले आहेत. यापुढे उपाययोजनांची अंमलबजावणी...

November 18, 2024 2:46 PM

views 39

आम आदमी पार्टीचे कैलाश गहलोत यांचा भाजपात प्रवेश

दिल्लीच्या आम आदमी पार्टी मंत्रिमंडळाचे माजी सदस्य कैलाश गहलोत यांनी आज भाजपामधे प्रवेश केला. केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहरलाल, पक्ष उपाध्यक्ष बैजयंत पांडा आणि दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी त्यांचं स्वागत केलं. आम आदमी पार्टीच्या धारणांपेक्षा राजकीय महत्त्वाकांक्षा वरचढ...

November 18, 2024 1:00 PM

views 70

मणिपूर हिंसाचाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तीव्र निषेध

मणिपूरमधे गेले दोन दिवस उसळलेल्या हिंसाचाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीव्र निषेध केला असून केंद्र आणि राज्य सरकारने शांतता प्रस्थापित करण्यासाठी गांभीर्याने तातडीचे उपाय केले पाहीजेत असं सांगितलं आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून राज्यात दोन समुदायांमधे सुरु झालेला संघर्ष अद्याप धुमसतो आहे. ...

November 18, 2024 1:30 PM

views 53

आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेत लाभार्थींची संख्या १० लाखापेक्षा जास्त

ज्येष्ठ नागरिकांसाठी अलिकडेच सुरु केलेल्या आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेत ७० वर्षापेक्षा जास्त वयाच्या लाभार्थींची संख्या १० लाखापेक्षा जास्त झाली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने सांगितलं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या २९ ऑक्टोबरला योजनेचं उद्घाटन केल्यानंतर अवघ्या ३ आठव...

November 18, 2024 10:01 AM

views 49

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मणिपूरमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि मणिपूरमधील स्थितीचा आढावा घेतला. अमित शहा आजही नवी दिल्ली इथं स्वतंत्र बैठक घेणार असून एकंदर सुरक्षेबाबत चर्चा करणार आहेत. काल मणिपूरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिनं आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश गृह मंत्र...

November 18, 2024 9:42 AM

views 40

झारखंड विधानसभा : निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर खासगी वाहनांवर बॅनर वापरण्यास निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असं मुख्य निवडणूक अधिकारी के. रवी कुमार यांनी सांगितलं. झारखंडमध्ये १४ हजार २१८ मतदान केंद्र असून ३१ मतदान संघांमध्ये आज...

November 18, 2024 10:02 AM

views 56

हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे कडक हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर काल रात्री नऊ वाजता बंद करण्यात आले. त्यानिमित्त काल बद्रीनाथ मंदिर १५ क्विंटल झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले होते. मंदिराच्या सिंहद्वार संकुलात गढवाल स्काऊट बँडतर्फे वंदन करण्यात आलं. त्या भक्तिमय सुरांनी संपू...

November 17, 2024 8:15 PM

views 27

स्वातंत्र्य सेनानी लाला लजपत राय यांच्या ९६ व्या पुण्यतिथीदिनी आदरांजली

पंजाब केसरी नावानं ओळखले जाणारे थोर स्वातंत्र्य सेनानी लाला लजपत राय यांच्या ९६ व्या पुण्यतिथीदिनी देशानं आज त्यांना आदरांजली वाहिली. यानिमित्त, पंजाबमधल्या मोगा जिल्ह्यातल्या लालाजींच्या मूळ गावी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.