राष्ट्रीय

November 19, 2024 8:14 PM

views 47

जी-२० बैठकीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जागतिक नेत्यांशी चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज रिओ द जानेरो इथं जी-20 परिषदेच्या निमित्तानं, ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ ईनाचिओ लुलादा सिल्व्हा यांच्याशी चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी ऊर्जा, जैव इंधन, संरक्षण, आणि कृषी इत्यादी विविध क्षेत्रांमधल्या सहकार्यात सुधारणा करण्याबाबत कटीबद्धता व्यक्त केली. भारत आणि ब...

November 19, 2024 12:39 PM

views 41

यंदाचं हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंत चालणार

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने येत्या २४ तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यन लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांकडून पाठिंबा मागणार आहे. यंदाचं हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

November 19, 2024 9:39 AM

views 50

दिल्ली प्रदुषणाच्या पार्श्वभुमीवर शेजारील राज्यांनी प्रदुषण नियंत्रणासंदर्भात निर्बंध लागू करावेत – सर्वोच्च न्यायालय

राजधानी दिल्ली क्षेत्रातली हवेची गुणवत्ता आणखी घसरली असून आज सकाळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक 494 अंकांवर गेला होता. केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार काही भागात हा निर्देशांक 500 नोंदवला गेला. यामुळे रेल्वे आणि हवाई वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान, राजधानी क्षेत्रातली प्रदूषणा...

November 19, 2024 9:31 AM

views 30

मणिपूरमध्ये CAPFच्या ५० अतिरिक्त तुकड्या तैनात करणार

मणिपूरमधील सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी केद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी काल विविध स्तरावरील अधिकाऱ्यांबरोबर उच्च स्तरीय आढावा बैठक घेतली. केंद्रिय सशस्त्र पोलीस दल अर्थात CAPFच्या ५०अतिरिक्त तुकड्या मणिपूरमध्ये तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं दिली. राज्यात शांतता आ...

November 19, 2024 9:24 AM

views 29

‘बँकींग क्षेत्रातील अनैतिक प्रक्रियांना आळा घालण्यासाठी अंतर्गत प्रशासकीय साचा मजबूत करावा’

बँकींग क्षेत्रातील अनैतिक प्रक्रियांना आळा घालण्यासाठी अंतर्गत प्रशासकीय साचा मजबूत करावा असं आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काल केलं. खासगी क्षेत्रातील बँकांच्या संचालकांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

November 19, 2024 9:20 AM

views 46

बँकांनी २०२५-२६मध्ये ६ लाख १२ हजार कोटी तर २०२६-२७मध्ये ७ लाख कोटी रुपये पतपुरवठा करण्याचं उद्दीष्ट ठेवावं – अर्थमंत्री

बँकांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 6 लाख 12 हजार कोटी तर 2026-27 मध्ये 7 लाख कोटी रुपये पतपुरवठा करण्याचं उद्दीष्ट ठेवावं असं केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल मुंबईत 11व्या एसबीआय बँकिंग अँड इकॉनॉमिक्स परिषदेत बोलत होत्या. विकस...

November 19, 2024 9:11 AM

views 40

‘एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य’ संकल्पना अद्यापही समर्पक – प्रधानमंत्री

नवी दिल्लीत गेल्या वर्षी झालेल्या जी-20 शिखर परिषदेची एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य ही संकल्पना अद्यापही समर्पक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ब्राझिलच्या रीओ दी जेनेरो शहरांत सुरु असलेल्या जी-20 देशांच्या शिखरपरिषदेत ते काल बोलत होते. सामाजिक समरसता तसंच भूक आणि गरिबी न...

November 18, 2024 8:43 PM

views 23

राष्ट्रीय युवक महोत्सव ११ आणि १२ जानेवारी २०२५ साजरा केला जाणार

राष्ट्रीय युवक महोत्सव पुढच्या वर्षी ११ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी विकसित भारत युवा नेतृत्व संवाद म्हणून साजरा केला जाणार आहे. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या मंचामुळे देशातल्या युवकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी य...

November 18, 2024 8:22 PM

views 18

राज्यात डीएपी खताचा तुटवडा नसून पुरेसा साठा उपलब्ध-हरियाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी

राज्यात डीएपी खताचा तुटवडा नसून पुरेसा साठा उपलब्ध आहे, असं हरियाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी यांनी आज विधानसभेत सांगितलं. राज्यातल्या प्राथमिक कृषी पतसंस्थांमधे किती खत उपलब्ध आहे, याची आकडेवारीही सरकारकडे असल्याचं सैनी यांनी सांगितलं. नोव्हेंबर महिन्यात १ लाख दहा हजार २०० मेट्रिक टन डीएपी खताच...

November 18, 2024 8:21 PM

views 45

दिल्लीत जीआरएपी प्रकारचे निर्बंध लागू करण्यासाठी पथकांची नेमणूक करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

हवेची गुणवत्ता अतिगंभीर पातळीपर्यंत घसरल्याने दिल्ली एनसीआर परिसरात जीआरएपी प्रकारचे निर्बंध लागू करण्यासाठी पथकांची नेमणूक करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. न्यायमूर्ती अभय ओक आणि ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी आज झाली. दिल्ली आणि लगतच्या राज्यांना बारावीपर्यंतचे...