राष्ट्रीय

May 21, 2025 3:52 PM

views 55

भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी शिष्टमंडळं रवाना होण्यास सुरुवात

ऑपरेशन सिंदूरची माहिती सर्व देशांना देण्यासाठी आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जगासमोर आणण्यासाठी भारतानं आखलेल्या धोरणांतर्गत संयुक्त जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज पाच देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झालं. हे शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया, जपान आणि सिंगाप...

May 21, 2025 3:52 PM

views 33

छत्तीसगडमध्ये चकमकीत २० हून अधिक माओवादी ठार, एक जवान शहीद

छत्तीसगडच्या नारायणपूर, विजापूर आणि दंतेवाडा भागात सुरक्षादलांशी ५० तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या चकमकीत वीसपेक्षा जास्त माओवादी ठार झाले. यात काही कुख्यात माओवाद्यांचा समावेश असल्याची शक्यता आहे. यात एक जवान शहीद झाल्याची तर आणखी एक जवान जखमी झाल्याची माहिती छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा या...

May 21, 2025 1:44 PM

views 56

कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांच्या ‘हार्ट लॅम्प’ लघुकथासंग्रहाला ‘बुकर पुरस्कार’

कन्नड लेखिका, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या बानू मुश्ताक यांनी लिहिलेल्या आणि दीपा भस्थी यांनी इंग्लिशमध्ये भाषांतरित केलेल्या ‘हार्ट लॅम्प’ या लघुकथासंग्रहाला प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारावर नाव कोरणारा हा पहिलाच लघुकथासंग्रह आणि पहिलीच मूळ कन्नड साहित्यकृती आहे. तसंच दीपा ...

May 21, 2025 1:38 PM

views 39

देशातल्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता

कर्नाटकच्या समुद्रकिनाऱ्यालगत तसंच घाट विभागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आसाम, मेघालय, गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंढीगढ, उत्तर प्रदेशात २६ मे पर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची ...

May 21, 2025 1:32 PM

views 16

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते १०३ पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं उद्घाटन होणार

अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत १८ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या १०३ पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या करणार आहेत. या रेल्वेस्थानकांवर अद्ययावत प्रतीक्षालय, शौचालय आणि निवाऱ्याचा समावेश आहे. याशिवाय विविध सुविधा या रेल्वेस्थानकांवर देण्यात आल्या आहेत.

May 21, 2025 1:19 PM

views 56

पंजाबमध्ये पाकिस्तानी घुसखोऱ्याकडून ३३० पाकिस्तानी रुपये जप्त

पंजाबमधल्या अमृतसर इथं एका पाकिस्तानी घुसखोराला सीमा सुरक्षा दलानं काल अटक केली. ही व्यक्ती आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय सीमेच्या आत येण्याचा प्रयत्न करत होता, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला थांबवलं आणि ताब्यात घेतलं. त्या व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याकडे ३३० पाकिस्तानी रुपये सापडले....

May 21, 2025 9:31 AM

views 48

वक्फ दुरुस्ती कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी

वक्फ सुधारणा कायदा 2025 ला अंतरिम आदेश देण्याच्या मुद्द्यावर आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली. या कायद्याला स्थगिती देण्यासाठी ठोस मुद्दे मांडावे लागतील असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ए जी मसीह यांच्या खंडपीठाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी ...

May 21, 2025 1:29 PM

views 30

प्रधानमंत्र्याची जर्मनीचे नवनियुक्त चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्याशी चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रादेशिक तसंच जागतिक घडामोडींबाबत काल जर्मनीचे नवनियुक्त चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. जर्मनीसह भारत दहशतवादाविरुद्ध ठामपणे उभा राहील,  भारत-जर्मनी दरम्यानच्या रणनीतीविषयक भागीदारीत आणखी भर घालण्यासाठी भारत वचनबद्ध राहील, असं आश्वासन मोदी...

May 21, 2025 10:09 AM

views 46

भारताची भूमिका जगभरातल्या देशांसमोर मांडण्यासाठी शिष्टमंडळ रवाना होण्यास सुरुवात

ऑपरेशन सिंदूरवरील भारताच्या राजनैतिक संपर्कासाठी स्थापन केलेल्या सातपैकी पहिले सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज चार देशांना रवाना होत आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ युएई, लायबेरिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि सिएरा लिओनला रवाना होईल. गुरुवारी खासदार संजय झा यांच्या ...

May 21, 2025 9:34 AM

views 33

FSSAI चं विशेष अंमलबजावणी मोहिम राबवण्याचं आवाहन

भारतातील अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना, फळं पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या द्रव्यांच्या, कृत्रिम रंगांच्या वापरावर तसंच फळांवर मेणाचं आवरण करण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष अंमलबजावणी मोहीम राबवण्याचं आवाहन केलं आहे. कॅल्शियम कार्बाइड आदी...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.