राष्ट्रीय

September 7, 2025 11:30 AM

views 80

पश्चिम राजस्थान गुजरातमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा लाल बावटा

पश्चिम राजस्थान गुजरातमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह लाल बावटा हवामान विभागानं जारी केला आहे. वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार पूर्व राजस्थान, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा होण्याची शक्यता आहे. उर्वरीत देशातही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्...

September 6, 2025 8:22 PM

views 46

जीएसटीतल्या दरकपातीमुळं कृषी क्षेत्रावर मोठा सकारात्मक परिणाम होईल-केंद्रीय कृषी मंत्री

जीएसटीतल्या दरकपातीमुळं कृषी क्षेत्रावर मोठा सकारात्मक परिणाम होईल, असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज म्हणाले. यामुळं कृषी क्षेत्रातला उत्पादन खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांचा नफा वाढेल, असा विश्वास त्यांनी भोपाळमध्ये वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला.

September 6, 2025 8:22 PM

views 16

जीएसटी सुधारणांमुळे सहकार क्षेत्राला बळकटी मिळणार

जीएसटी सुधारणांमुळे सहकार क्षेत्राला बळकटी मिळणार असून उत्पादनात आणि मागणीत वाढ होईल, यामुळे सहकार क्षेत्राचं उत्पन्न वाढेल, असं सरकारनं म्हटलं आहे. सहकार, शेती, ग्रामीण उद्योग तसंच दहा कोटींहून अधिक दूध उत्पादनांना फायदा होईल, अशा महत्त्वाच्या क्षेत्रात जीएसटी कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे...

September 6, 2025 8:16 PM

views 51

भारत आणि अमेरिका संबंधांबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचं प्रधानमंत्र्यांकडून स्वागत

भारत आणि अमेरिका यांच्यात अतिशय सकारात्मक, दूरदृष्टीपूर्ण, व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभय देशांमधल्या संबंधांबद्दल केलेल्या विधानावर त्यांनी आज समाज माध्यमावर प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यां...

September 6, 2025 8:15 PM

views 55

जीएसटी दरकपातीनं जीडीपीत २० लाख कोटी रुपयांची भर पडेल-अश्विनी वैष्णव

जीएसटी सुधारणेमुळे देशाच्या जीडीपीत २० लाख कोटी रुपयांची भर पडणार असून यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला. हा मध्यमवर्गासाठी मोठा दिलासा असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.   ...

September 6, 2025 3:09 PM

views 38

अत्यावश्यक खनिजांच्या देशांतर्गत क्षमता निर्मितीवर भारताचं लक्ष केंद्रित

पुरवठा साखळीतली लवचिकता अधिक बळकट करण्यासाठी भारतानं अत्यावश्यक खनिजांच्या देशांतर्गत क्षमता निर्मितीवर लक्ष केंद्रित केलं आहे. देशात अत्यावश्यक खनिज पुनर्वापराला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकतीच पंधराशे कोटी रुपयांच्या प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे. या उपक्रमामुळे  किमान २७० किलो...

September 6, 2025 3:00 PM

views 63

 पंजाबमध्ये राज्यातल्या नद्यांच्या पुराचा प्रकोप कमी

पंजाबमध्ये पावसानं काहीसा दिलासा दिल्यानं राज्यातल्या नद्यांमध्ये पुराचा प्रकोप कमी झाला असला तरी शेतजमिनी अद्याप पाण्याखाली आहेत. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत २२ जिल्ह्यातली १ हजार ९४८ गावं प्रभावित झाली आहेत तर सुमारे ३ लाख ८४ हजार लोक बाधित झाले आहेत. पूरग्रस्त भागातून सुमारे २२ हजार नागरिकांना सुरक्ष...

September 6, 2025 2:52 PM

views 23

भारताच्या परकीय चलनसाठ्यात अंदाजे साडेतीन अब्ज डॉलर्सची वाढ

भारताच्या परकीय चलनसाठ्यात अंदाजे साडेतीन अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवण्यात आली आहे. २९ ऑगस्टला संपलेल्या आठवड्यातली ही वाढ असून, हा साठा एकंदर ६९४ अब्ज डॉलर्सपेक्षा थोडा अधिक आहे. रिझर्व बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार या साठ्याचा प्रमुख घटक असलेली परकीय चलन मालमत्ता देखील जवळपास ५८४ अब्ज डॉलर्सपेक्ष...

September 6, 2025 8:23 PM

views 24

वस्तू आणि सेवा कर परिषदेची ५६व्या बैठकीत वस्तू आणि सेवा कररचनेच्या सुसूत्रीकरणाला मान्यता

वस्तू आणि सेवा कर परिषदेनं ५६व्या बैठकीत वस्तू आणि सेवा कररचनेच्या सुसूत्रीकरणाला मान्यता दिली असून यापुढे फक्त ५ आणि १८ टक्के अशी दोन स्तरात जी एसटी कर आकारणी होईल. या सुधारणेचं स्वागत व्यापारी तसंच सामान्य नागरिकही करत आहेत.  जीएसटीच्या पुनर्चरनेमुळे अनेक वस्त्र आणि पादत्राणं स्वस्त झाली आहेत. हात...

September 6, 2025 2:34 PM

views 34

जहाजबांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत भारताची गणना सर्वोत्तम ५ देशांमध्ये होईल – सर्बानंद सोनोवाल

जहाजबांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत भारताची गणना जगातल्या सर्वोत्तम १० देशांमध्ये तर २०४७ पर्यंत सर्वोत्तम ५ देशांमध्ये होईल, असं प्रतिपादन केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केलं आहे. ते काल तामिळनाडू इथं चिदम्बरनार बंदराच्या पहिल्या बंदर आधारित हरित हायड्रोजन पथदर्शी...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.