राष्ट्रीय

October 12, 2025 6:35 PM

views 61

घर खरेदीच्या प्रमाणात २८ टक्के घट

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत घर खरेदीच्या प्रमाणात २८ टक्के घट झाल्याचं रिअल इस्टेट डेव्हलपर सिग्नेचर ग्लोबल इंडिया या संस्थेने आपल्या अहवालात नोंदवलं आहे. घर खरेदीसाठी या काळात २० अब्ज १० कोटी रुपयांची उलाढाल झाली असून ही उलाढाल गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीपेक्षा २८ टक्के कमी आहे, असं य...

October 12, 2025 6:10 PM

views 66

शेतकऱ्यांच्या पिकाला चांगली किंमत, उत्पादकताही वाढली – कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

देशातले ५२ लाखापेक्षा जास्त शेतकरी आता अकराशेपेक्षा जास्त कृषी उत्पादन संघटनांशी जोडलेले असून याद्वारे त्यांच्या पिकाला चांगली किंमत मिळत असून उत्पादकताही वाढली आहे, असं कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. या सर्व संघटनांची उलाढाल १५ हजार कोटी रुपयांपेक्ष...

October 12, 2025 4:42 PM

views 62

कायदेमंडळ, मंत्रिमंडळ आणि न्यायपालिका यांनी एकमेकांविरुद्ध काम करू नये, सरन्यायाधीशाचं प्रतिपादन

कायदेमंडळ, मंत्रिमंडळ आणि न्यायपालिका हे प्रशासनाचे तिन्ही स्तंभ देशाच्या नागरिकांना न्याय देण्यासाठीच काम करतात, त्यांचं अधिकारक्षेत्र स्वतंत्र असलं, तरी त्यांनी एकमेकांच्या विरोधात काम करू नये, असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज केलं. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड इथं दिवाणी आणि ...

October 12, 2025 2:27 PM

views 23

जबरदस्तीनं अपहरण करणं आणि मानवतेविरुद्ध गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतल्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांविरोधात अटक अटक वॉरंट जारी

जबरदस्तीनं अपहरण करणं आणि मानवतेविरुद्ध गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं केलेल्या आरोपांवरून १५ अधिकाऱ्यांविरोधात अटक वॉरंट जारी करत त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती बांग्लादेशच्या लष्करानं दिली. यातील १४ अधिकारी सेवेत कार्यरत असून एक अधिकारी निवृत्तीपूर्व सुट्...

October 12, 2025 2:10 PM

views 37

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागालँडमध्ये एकात्मिक अ‍ॅक्वा पार्कची दूरस्थ पद्धतीने पायाभरणी केली.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत नागालँडमधील मोकोकचुंग जिल्ह्यात त्झुडिकोड इथं एकात्मिक मत्स्य उद्यान-ॲक्वा पार्कची पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल दूरस्थ पद्धतीनं केली. नागालँडमधील हे पहिले मत्स्य उद्यान ठरणार असून ते मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध विकास उपक्रमांचं केंद्र असेल. ...

October 12, 2025 2:01 PM

views 227

महाराष्ट्रातल्या पाच समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र

महाराष्ट्रातल्या पाच समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र मिळालं आहे. या यादीत रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन आणि नागावसह, पालघरमधल्या पर्णका, तसंच रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर आणि लाडघर या किनाऱ्यांचा समावेश आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत ...

October 12, 2025 1:53 PM

views 21

तेलंगणात कामारेड्डी जिल्ह्यात बनावट चलन रॅकेट पोलिसांकडून उद्ध्वस्त, ८ जणांना अटक

तेलंगणात कामारेड्डी जिल्ह्यात पोलिसांनी बनावट चलन रॅकेट उघडकीला आणलं आहे. याप्रकरणी १२ जणांच्या आंतरराज्यीय टोळीतल्या आठ जणांना अटक केली. या आरोपींना बिहार आणि पश्चिम बंगालसह विविध राज्यांतून अटक केली. यासाठी विशेष पथकं स्थापन केली होती. अटक केलेल्यांकडून तीन लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याचं बनावट चलन...

October 12, 2025 1:01 PM

views 60

केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. आंध्र प्रदेश, आसाम, मेघायल, कर्नाटकचा समुद्रकिनारा, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओदिशा आणि कर्नाटकचा दक्षिणी भागातही जोरदार पावसाची शक्यताही वर्तवली आहे. प...

October 12, 2025 11:56 AM

views 53

दिल्ली हाफ मॅराथॉन स्पर्धेत ४० हजार ५०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय आणि भारतीयस्पर्धक सहभागी

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी काही वेळापूर्वी दिल्ली हाफ मॅराथॉनला हिरवा झेंडा दाखवत प्रारंभ केला आहे. आशियातल्या या प्रमुख स्पर्धेत ४० हजार ५०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय आणि भारतीयस्पर्धक सहभागी होत आहे. यंदाच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये तिन्ही संरक्षण दल सहभागी होत आहेत...

October 12, 2025 10:49 AM

views 63

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात ६ माओवाद्यांना अटक

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी शुक्रवारी सहा माओवाद्यांना अटक केली आणि मंगनार रस्त्याजवळ लावलेली स्फोटकं निकामी कऱण्यात यश मिळवले. संशयास्पद व्यक्तींबाबत मिळालेल्या माहितीनंतर बारसूर पोलिस स्टेशन, जिल्हा राखीव रक्षक, केंद्रीय राखीव पोलिस दल यांच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.