आंतरराष्ट्रीय

September 29, 2025 1:32 PM

views 100

व्हिएतनाममध्ये बुआलोई वादळामुळे विमानतळ बंद

व्हिएतनाममध्ये बुआलोई वादळामुळं त्याचा धोका असलेल्या भागातील विमानतळ बंद करण्यात आली आहेत. हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. या वादळामुळं फिलीपिन्समध्ये किमान 10 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक भागात पूराचा तडाखा बसला आहे. हे वादळ एकाच वेळी अनेक नैसर्गिक आपत्तींना कारणीभूत ठरू शकतं असा ...

September 29, 2025 9:18 AM

views 55

आयर्लंडमध्ये भारतीय दूतावासाद्वारे भारत दौडचं आयोजन

आइसलँडमधील भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या विकसित भारत दौडमध्ये भारतीय नागरिकांनी भाग घेतला. आइसलँडमधील भारताचे राजदूत आर. रवींद्र यांनी भारतीय समुदायाच्या सदस्यांना संबोधित केलं आणि त्यांना विकसित भारताची प्रतिज्ञा दिली. स्वावलंबी आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी परदेशातील भारतियांना योगदानार्थ...

September 28, 2025 7:48 PM

views 97

आयएसएसएफ कनिष्ठ गट जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अनुष्का ठोकूर ला सुवर्णपदक

आयएसएसएफ कनिष्ठ गट जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अनुष्का ठोकूरने आज मुलींच्या ५० मीटर रायफल थ्री पोझीशन प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. नवी दिल्लीत सुरु असलेल्या या स्पर्धेतलं हे तिचं दुसरं सुवर्णपदक आहे. मुलांच्या स्पर्धेत एड्रियन कर्माकारला रौप्य पदक मिळालं. स्पर्धेत आतापर्यंत ४ सुवर्ण, ६ रौप्य आणि...

September 28, 2025 2:02 PM

views 92

२०१५मधला अणु करार पुनरुज्जीवित करण्यात अमेरिका अडथळे आणत असल्याचा इराणचा आरोप

२०१५मधला अणु करार पुनरुज्जीवित करण्यात अमेरिका अडथळे आणत असल्याचा आरोप इराणने केला आहे. इराणच्या अणुप्रकल्पांना आळा घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून २०१५ मधे अमेरिकेने या कराराचा मसुदा तयार केला होता. मात्र अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी तो फेटाळला असून फ्रान्स ब्रिटन आणि जर्मनीने ...

September 26, 2025 2:43 PM

views 103

भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार करार लवकर पूर्ण करण्यासाठी इटलीचा पाठिंबा

भारत आणि युरोपियन युनियनमधला मुक्त व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी इटलीचं संपूर्ण समर्थन आहे, असं प्रतिपादन इटलीचे उप प्रधानमंत्री अंटोनियो ताजनी यांनी केलं आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या सोबत ताजनी यांची बैठक झाली त्यानंतर त्यांनी हे स्पष्ट मत व्यक्त...

September 26, 2025 1:21 PM

views 50

सहा दशकांच्या राष्ट्रसेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमानाला भारतीय हवाई दलाकडून निरोप

सहा दशकांच्या राष्ट्रसेवेनंतर भारतीय हवाई दलाने आज चंदीगडमध्ये मिग-२१ विमानाला निरोप दिला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे विमान निवृत्त झालं. एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी बादल ३ या कॉल साइनसह स्क्वाड्रनचं शेवटचं उड्डाण केलं. भारत-चीन युद्धानंतर १९६३ मध्ये भारतीय ह...

September 25, 2025 1:41 PM

views 96

अण्वस्त्र बनवण्याचा किंवा विकत घेण्याचा कोणताही इरादा नसल्याचं इराणचं स्पष्टीकरण

अण्वस्त्र बनवण्याचा किंवा विकत घेण्याचा इराणचा कोणताही इरादा नसल्यामुळे ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीने संयुक्त राष्ट्रांमार्फत इराणवर निर्बंध लावण्याचा केलेला प्रयत्न गैरलागू  असल्याचं मत इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकीयन यांनी व्यक्त केलं आहे.    याआधी पेझेशकीयन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इ...

September 24, 2025 1:18 PM

views 83

नाटो आणि अमेरिकेच्या मदतीनं युक्रेन रशियाकडून सर्व भूभाग परत जिंकू शकतो – डोनाल्ड ट्रम्प

नाटो आणि अमेरिकेच्या मदतीनं युक्रेन रशियाकडून आपला सर्व भूभाग परत जिंकू शकतो असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आपण आता लष्करी आणि आर्थिक परिस्थिती पूर्णपणे समजून घेण्यास सुरुवात केली असून रशिया म्हणजे प्रचंड आर्थिक समस्या असलेला कागदी वाघ आहे असं मत ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्...

September 23, 2025 2:39 PM

views 85

फ्रान्सकडून पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून फ्रान्सची औपचारिक मान्यता असल्याचं आज घोषित केलं. इस्रायली आणि पॅलेस्टिनी नागरिकंदरम्यानच्या शांततेला आपला पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मॅक्रॉन यांनी आज न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या ...

September 22, 2025 12:34 PM

views 46

Nepal: हंगामी सरकारसाठी पाच नव्या मंत्र्यांच्या नावाची शिफारस

नेपाळच्या प्रधानमंत्री सुशिला कार्की यांनी हंगामी सरकारसाठी पाच नव्या मंत्र्यांच्या नावाची शिफारस केली आहे.  सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधी न्यायमूर्ती अनिल कुमार सिन्हा यांना उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा मंत्रालय, तसंच कायदा आणि न्याय मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. महाबीर पुन यांची शिक्षण,...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.