August 3, 2026 3:59 PM

printer

भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांची दिल्ली न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊज अवेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पंवार यांनी आज हा निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही त्यांनी निर्दोष मुक्तता केली. ६ महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं २ जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार ६ महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली होती. दिल्ली न्यायालयानं या प्रकरणात दिलेल्या निर्णयाविरोधात महिला कुस्तीपटू अपील करणार आहेत, अशी माहिती कुस्तीपटू विनेश फोगट यांनी दिली.