लोकसभेत बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर

लोकसभेत बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर करण्यात आलं. न्यायालयीन प्रक्रियेत बँकांकडील नोंदींचा पुरावा म्हणून वापर करण्याबाबतचा आणि सद्यकालिन डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत असणारा कायदा करण्याचा प्रस्ताव या विधेयकात मांडण्यात आला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

 

राज्यसभेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येबाबतच्या सुधारणा विधेयकाला मान्यता देऊन ते लोकसभेत पाठवण्यात आलं. लोकसभेत गेल्या सोमवारी या विधेयकाला मंजूरी मिळाली आहे. या विधेयकाच्या मंजूरीनंतर राज्यसभेचंही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.