December 13, 2024 11:57 AM

views 54

जैश ए महंमद या संघटनेच्या दहशतवादी कट प्रकरणी NIA च्या आठ राज्यांत 19 ठिकाणी छापे

जैश ए महंमद या संघटनेच्या दहशतवादी कट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएनं काल आठ राज्यांत 19 ठिकाणी छापे घातले. या छाप्यांमधून बरीच आक्षेपार्ह कागदपत्रं, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, पेन ड्राईव्ह, सीडी, हार्डडिस्क असं साहित्य हस्तगत करण्यात आलं आहे. शेख सुलतान सलाउद्दीन अयुबी या जैश ए महंमदच्या हा ...

December 13, 2024 11:03 AM

views 32

भारतीय लष्कराच्या वज्र कोअरतर्फे आजपासून अमृतसर इथं विजय दिवस साजरा

भारतीय लष्कराच्या वज्र कोअरतर्फे आजपासून अमृतसर इथं विजय दिवस साजरा करण्यात येणार आहे. पाकिस्तानविरुद्ध १९७१ च्या युद्धात मिळवलेल्या विजयाचा ५३ वा वर्धापनदिन येत्या 16 तारखेला साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणि तांत्रिक प्रगती दाखवण्यासाठी दोन दिवसीय प्रदर्शन भरवण्या...

December 13, 2024 12:48 PM

views 21

संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज २३ वर्ष पूर्ण, शहिदांना देशभरातून आदरांजली

संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज २३ वर्ष पूर्ण होत आहेत. १३ डिसेंबर २००१ रोजी पाकिस्तानातून आलेल्या पाच दहशतवाद्यांनी संसद भवन परिसरात घुसून गोळीबार केला होता. संसदेचं रक्षण करताना वीरमरण आलेले सुरक्षा रक्षक आणि प्राण गमावलेल्यांना आज देशभरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी ...

December 13, 2024 10:58 AM

views 36

आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने 21 उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली आहे. पक्षाने बादली विधानसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव, नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून संदीप दीक्षित, बल्लीमारन मतदारसंघातून हारून युसूफ, वजीरपूरमधून रागिणी नायक, सीलमपूरमधून अब्दुल रहमान आणि...

December 13, 2024 10:51 AM

views 48

भारत-संयुक्त अरब अमिरातीच्या संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सह-अध्यक्षपद परराष्ट्र व्यवहारमंत्री भूषवणार

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद बिन सुलतान अल नाहयान आज नवी दिल्ली येथे १५ व्या भारत- संयुक्त अरब अमिरातीच्या संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवणार आहेत. दोन्ही नेत्यांनी काल नवी दिल्लीत धोरणात्मक बैठकीत चर्चा केली. धोरणात...

December 13, 2024 10:27 AM

views 25

रत्नागिरीत माध्यमिक विद्यालयात वायूगळती, अनेक विद्यार्थ्यांना त्रास

रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगडमध्ये काल दुपारी झालेल्या वायुगळतीमुळे एकंदर ५८ जणांना त्रास झाला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व व्यक्तींची प्रकृती स्थिर असून, त्यांना आज रुग्णालयातून घरी पाठवण्यात येईल, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. बाधित ५८ जणांमध्ये पाच विद्यार्थी, ५२ विद्यार्थिनी आण...

December 12, 2024 8:30 PM

views 35

नेपाळचे लष्करप्रमुख जनरल अशोकराज सिग्देल यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची घेतली भेट

नेपाळचे लष्करप्रमुख जनरल अशोकराज सिग्देल यांनी आज नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी दोन्ही देशांशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. नेपाळच्या लष्कराची क्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षण, नियमित सराव, कार्यशाळा आणि चर्चासत्रांसह संरक्षण सहकार्याच्या विविध मुद्द्य...

December 12, 2024 8:28 PM

views 24

मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या हस्ते हरित पोलाद वर्गीकरण उपक्रमाचं उद्घाटन

वर्ष २०७० पर्यंत देशानं निर्धारित केलेलं शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी, पोलाद उद्योगातून होणारं कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी आणि या उद्योगाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीनं आवश्यक, हरित पोलाद वर्गीकरण उपक्रमाचं उदघाटन आज नवी दिल्ली इथं केंद्रीय पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमार...

December 12, 2024 8:26 PM

views 53

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजूजू यांच्या विरोधात तृणमूल काँग्रेसचा हक्कभंग ठराव

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजूजू यांच्या विरोधात तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभा सदस्य सागरिका घोष यांनी आज राज्यसभेत हक्कभंग ठराव मांडला. त्या म्हणाल्या की, संसदेच अधिवेशन विनाअडथळा चालवण्याची जबाबदारी संसदीय कामकाज मंत्र्यांवर असते. त्याऐवजी त्यांनी विरोधी सदस्यांचा अपमान केला. त्यांची विधानं आक्षेप...

December 12, 2024 8:12 PM

views 22

देशाच्या किरकोळ किमतीवर आधारित चलनफुगवट्याचा दर ५.४८ टक्के

देशाच्या किरकोळ किमतीवर आधारित चलनफुगवट्याचा दर गेल्या महिन्यात घसरुन ५ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यावर आला आहे. ऑक्टोबर महिन्यात हा दर ६ पूर्णांक २ दशांश टक्के इतका होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शहरी भागात हा दर ४ पूर्णांक ८३ दशांश टक्के, तर ग्रामीण भ...