December 31, 2024 3:20 PM

views 45

हिंद-प्रशांत प्रदेशासाठी एकत्रितपणे काम करण्यासाठी भारत वचनबद्ध

हिंद-प्रशांत प्रदेशात स्थैर्य, प्रगती आणि समृद्धी आणण्यासाठी इंडो-पॅसिफिक क्वाड एक महत्त्वाचा घटक असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावर म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्यासोबत बैठक झाली असून हिंद...

December 31, 2024 3:27 PM

views 27

डीआरडीओच्या सुमारे २ हजार ८६७ कोटी रुपयांच्या दोन करारांवर स्वाक्षरी

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओच्या एआयपी प्रणालीच्या एअर इंडिपेंडंट प्रोपल्शन प्लगची उभारणी आणि त्याचं भारतीय पाणबुड्यांचं एकीकरण तसंच इलेक्ट्रॉनिक हेवी वेट टॉर्पेडोच्या कलवरी श्रेणीच्या पाणबुड्यांशी एकत्रीकरणासंबंधीच्या सुमारे २ हजार ८६७ कोटी रुपयांच्या दोन करारांवर काल संरक्षण मंत्...

December 31, 2024 3:26 PM

views 27

2024 हे वर्ष अंतराळ विज्ञान क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण – डॉ. जितेंद्र सिंग

खासगी क्षेत्राच्या सहभागाने देशाला अंतराळ विज्ञान क्षेत्रात मोठा टप्पा गाठणं शक्य झालं, असं प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं थोड्या वेळापूर्वी ते  प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीने खासगी गुंत...

December 31, 2024 3:26 PM

views 45

मस्साजोग सरपंच हत्याप्रकरणी फरार वाल्मिक कराड पोलिसांना शरण

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आज पुण्यातल्या सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले. शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून यात त्यांनी स्वत:वरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावर राजकीय द्वेषापोटी आरोप करण्यात आले ...

December 31, 2024 1:12 PM

views 29

बुद्धिबळ फिडे बिल्ट्झ विश्वचषक स्पर्धेत भारताची  वैशाली रमेशबाबू पात्र 

बुद्धिबळामध्ये फिडे बिल्ट्झ विश्वचषक स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर रमेशबाबू वैशाली, महिला विभागात नॉकऑऊट टप्प्यासाठी पात्र ठरली. अकरा फेऱ्यांमध्ये साडेनऊ गुण मिळवत ती अव्वलस्थानी राहिली. या स्पर्धेत महिलांच्या आणि खुल्या विभागात पहिला अडथळा पार करणारी वैशाली एकमेव भारतीय खेळाडू होती. कॅरिसा यिप सह का...

December 31, 2024 1:07 PM

views 45

भारतीय बँकांचा अनुत्पादक मालमत्ता दर्जा सुधारला

भारतीय बँकांचा अनुत्पादक मालमत्ता दर्जा सुधारला असून निव्वळ बुडीत कर्जाचं प्रमाण २ पूर्णांक ६ दशांश टक्के इतकं कमी झालं आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये नोंदवलं गेलेलं हे प्रमाण म्हणजे गेल्या बारा वर्षातला नीचांक आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या वित्तीय स्थिरता अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. मागील दोन वर्...

December 31, 2024 1:26 PM

views 36

बँक ग्राहकांना प्राप्तकर्त्याचं नाव आणि खात्याच्या तपशीलांची पडताळणी करता येणार

चुकीच्या  बँक खात्यात निधी हस्तांतरण होऊ नये यासाठी लाभार्थीच्या खात्याचं नाव पडताळण्याची सुविधा आता उपलब्ध होणार आहे. रिझर्व्ह बँकेनं यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. आर टी जी एस आणि एन ई एफ टी प्रणाली तर्फे पैसे हस्तांतर करण्यापूर्वी या सुविधेचा वापर करता येईल.   इंटरनेट बँकिंग तसंच  मोबाइल ब...

December 31, 2024 1:12 PM

views 56

कौसर या बांग्लादेशी दहशतवाद्याला सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

बंगळुरूच्या विशेष न्यायालयानं, जहिदुल इस्लाम उर्फ कौसर या बांग्लादेशी दहशतवाद्याला सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. त्याला कट रचणे, लुटणे आणि दारूगोळा खरेदी या गुन्ह्यांमध्ये 57 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. बांग्लादेशात साखळी स्फोट घडवून आणल्यानंतर या आरोपीनं भारतात घुसखोरी केल्या...

December 31, 2024 11:05 AM

views 38

सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावाला आजपासून नेपाळमध्ये प्रारंभ

भारत-नेपाळ दरम्यानच्या 18 वा सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावाला आजपासून नेपाळमध्ये प्रारंभ होत आहे. या सरावात जगंलातले युद्ध, तसंच कठीण भूप्रदेशात दहशतवादाचा प्रतिकार तसंच आपत्ती व्यवस्थापनात मानवतावादी मदत यावर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे.  भारतीय लष्कराची 11 वी गोरखा रायफल तुकडी आणि नेपाळ लष्करा...

December 31, 2024 1:05 PM

views 52

रशिया, युक्रेन हजारो युद्धकैद्यांची सुटका

संयुक्त अरब अमिरातीच्या मध्यस्थीनंतर, रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान हजारो युद्धकैद्यांची सुटका करण्यात आली. रशियन संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, उभय देशांनी परस्परांच्या प्रत्येकी दीडशे लष्करी युद्धकैद्यांची सुटका केली. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेंक्सी यांनी 189 युक्रेनी नागरिक घ...