January 9, 2026 1:32 PM

views 59

प्रवासी भारतीय दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांकडून शुभेच्छा

देशभरात आज प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जात आहे. ज्यामध्ये भारताच्या विकासात आणि अर्थव्यवस्थेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या अनिवासी भारतीयांचा सन्मान केला जातो. नऊ जानेवारी १९१५ मध्ये महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते, या घटनेचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीचा प...

January 9, 2026 1:29 PM

views 88

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारत भेटीवर

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन पुढच्या महिन्यात भारत भेटीवर येणार आहेत. नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात येणाऱ्या एआय इम्पॅक्ट परिषदेत ते सहभागी होतील. एआय इम्पॅक्ट परिषदेची घोषणा प्रधानमंत्र्यांनी फ्रान्स एआय ॲक्शन परिषदेत केली होती. पुढच्या महिन्यात १९-२० फेब्रुवारी रोजी ही परिषद होणार आह...

January 9, 2026 1:25 PM

views 76

इराणमधल्या ३१ प्रांतांमध्ये १३ दिवसांची इंटरनेट बंदी

इराणमधे सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर इराणमधल्या ३१ प्रांतांमधे १३ दिवसांची इंटरनेट बंदी करण्यात आली आहे. यामुळे देशभरातली मोबाईल सेवादेखील विस्कळीत झाली आहे. २८ डिसेंबरला सुरू झालेल्या निदर्शनांमुळे माजलेल्या अराजकतेमुळे आतापर्यंत ४५ जणांचा मृत्यू झाला असून २०० पेक्षा जास्त ...

January 9, 2026 1:09 PM

views 67

केरळमध्ये अलाप्पुझा जिल्ह्यात इनफ्लूएन्झाचा प्रादुर्भाव

केरळमध्ये अलाप्पुझा जिल्ह्यात अंबालापुझा उत्तर, अंबालापुझा दक्षिण, करुवट्टा आणि पल्लिपड या चार पंचायतींमध्ये इनफ्लूएन्झाचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आज आणि उद्या या भागातल्या केंद्रांच्या एक किलोमीटर परिघातल्या पाळीव पक्ष्यांची शास्त्रीय पद्धतीने कत्तल करण्यात येणार आहे. य...

January 8, 2026 8:33 PM

views 36

स्टार्टअप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातले उद्योजक एकत्रितपणे भारताचं उद्याचं भविष्य घडवतील-प्रधानमंत्री

स्टार्टअप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातले उद्योजक एकत्रितपणे भारताचं उद्याचं भविष्य घडवतील, असं प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. येत्या फेब्रुवारी मध्ये भारतात होणाऱ्या ‘इंडिया A-I इम्पॅक्ट समिट २०२६’, या  परिषदेच्या पार्श्वभूमीवर, प्रधानमंत्री मोदी यांनी आज नवी दिल्ली इथल्या त्यां...

January 8, 2026 8:32 PM

views 53

अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचवणाऱ्याला २५ हजार रुपये बक्षीस मिळणार

अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचवणाऱ्या व्यक्तीला आता २५ हजार रुपये बक्षीस मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सदर जखमी व्यक्तीला रोखरहित उपचार दिले जाणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं.

January 8, 2026 7:49 PM

views 90

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या अपघातात २ जण ठार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड घाटात एक वाहन उलटून झालेल्या अपघातात २ जण ठार झाले तर ४ जण जखमी झाले. अहिल्यानगरच्या शेवगावहून मध्यप्रदेशात उज्जैनला जाणारे ७ प्रवासी वाहनात होते. अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेलं, परंतु दाखल करतानाच त्यांचा मृत्यू झाला.

January 8, 2026 8:18 PM

views 47

राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय पक्षांचा प्रचार जोमाने सुरु

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीसाठीचा प्रचार जोमाने सुरु आहे. विविध ठिकाणचे प्रश्न लक्षात घेऊन वेगवेगळे राजकीय पक्ष निवडणूक जहीरनामे प्रसिद्ध करत आहेत. संबंधित महानगरपालिकांमधे  येत्या १५ जानेवारीला मतदान असल्याने संबंधित क्षेत्रात  सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली आहे.   मुंबई महानगरपालिका निवडण...

January 8, 2026 6:57 PM

views 76

अंबरनाथनगरपरिषदेमधे भाजपात गेलेल्या नगरसेवकांविरुद्ध काँग्रेस कायदेशीर पावलं उचलणार

भाजपामधे प्रवेश केलेल्या अंबरनाथमधल्या काँग्रेसच्या बारा नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेस कायदेशीर पावलं उचलणार असल्याचं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांनी स्वतंत्र गट स्थापन करणं किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश करणं हे असंवैधान...

January 8, 2026 6:47 PM

views 120

शेअर बाजारात घसरण

अमेरिकेकडून पुन्हा अतिरीक्त आयात शुल्क लादले जाईल, या भीतीनं देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार घसरण झाली. दिवसअखेर सेन्सेक्स ७८० अंकांनी घसरुन ८४ हजार १८१ अंकांवर बंद झाला.   निफ्टी २६४ अंकांची घसरण नोंदवून २६ हजारांच्या खाली जाऊन २५ हजार ८७७ अंकांवर स्थिरावला. धातू, तेल आणि नैसर्गिक वायू यासारख...