November 1, 2025 8:10 PM

views 68

कॅनडाच्या प्रधानमंत्र्यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे दिलगिरी व्यक्त

कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कॅर्नी यांनी टॅरिफ विरोधी राजकीय जाहिरातीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली असून ऑन्टेरियोचे प्रमुख ड्युग फोर्ड यांना जाहिरातीचे प्रक्षेपण न करण्याची सूचना केली आहे. आपण ट्रम्प यांच्याकडे खासगीत दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती कॅर्नी...

November 1, 2025 8:02 PM

views 65

आंध्रप्रदेशच्या श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरीत ९ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातल्या श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात आज चेंगराचेंगरी होऊन किमान ९ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेतल्या मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि जखमींना लवकर बरं वाटावं, अशी प्रार्थना के...

November 1, 2025 7:33 PM

views 73

पालघरमध्ये पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचं आयोजन

नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमात पोलीस दलातले अधिकारी,  अंमलदार तसंच सुमारे ८,००० नागरिकांनी सहभाग घेतला. याव...

November 1, 2025 7:32 PM

views 133

ICC Women World Cup : भारत – दक्षिण आफ्रिका संघात अंतिम सामना

आयसीसी एकदिवसीय महिला क्रिकेट विश्व चषक स्पर्धेत उद्या भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात नवी मुंबईत अंतिम सामना रंगणार आहे. दुपारी ३ वाजता सामन्याला सुरुवात होईल. गुवाहाटी इथं झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडचा १२५ धावांनी एकतर्फी पराभव केला तर गुरुवारी डी वाय पाटील स्टेडियम इथ...

November 1, 2025 7:25 PM

views 33

नागपूर स्कील सेंटरमुळे युवकांच्या रोजगाराचं स्वप्न साकार होईल – मंत्री नितीन गडकरी

नागपूर स्कील सेंटरमुळे विदर्भातल्या लाखो युवकांच्या रोजगाराचं स्वप्न साकार होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.  नागपूर स्कील सेंटर  या कौशल्य विकास उपक्रमाचं  लोकार्पण आज गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. स्‍मार्ट शहरांसोबत स्‍मार्ट गावं देखील निर्माण ...

November 1, 2025 7:16 PM

views 111

जीएसटी संकलनानं गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ

जीएसटी करप्रणालीत केलेल्या सुसुत्रीकरणानंतर ऑक्टोबर महिन्यातल्या जीएसटी संकलनानं गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ४ पूर्णांक सहा दशांश टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. या सणासुदीच्या काळात १ लाख ९५ हजार कोटी इतकं जीएसटी संकलन झालं आहे.  आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत अर्थात एप्रिल ते ऑक्टो...

November 1, 2025 6:54 PM

views 132

मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीला राज्यात येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरुवात

केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मूग, उडीद आणि सोयाबीन पिकांच्या खरेदीला येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना ॲपद्वारे किंवा खरेदी केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी करता येईल. या नोंदणीला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे तर अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे.   ख...

November 1, 2025 6:57 PM

views 190

मतदार याद्यांतील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी मविआचा मोर्चा

मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीनं आज मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढला आहे. या मोर्चात जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, माकपचे राज्य सचिव डॉ अजित नवले, भाप...

November 1, 2025 8:07 PM

views 37

६७व्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं उद्या उद्घाटन

६७व्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं उद्या  दिल्ली, मुंबई आणि चेन्नई इथं उद्घाटन होणार आहे.  प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी सांगितलं की कोविड काळात खंड पडलेल्या या कार्यक्रमाला पुन्हा प्रारंभ होईल. येत्या २९ नोव्हेंबरपर्यंत देशभरातल्या २४ आकाशवाणी केंद्रांवर हिंदुस्तानी, कर्नाट...

November 1, 2025 7:58 PM

views 77

छत्तीसगडमध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी छत्तीसगढच्या दौऱ्यावर असून ते राज्यस्थापनादिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. प्रधानमंत्र्यांच्या  हस्ते छत्तीसगडमध्ये १४ हजार २६० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आज झाली. नवा रायपूर अटलनगर इथं छत्तीसगड विधानसभेच्या नव्या  इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या...