January 17, 2026 6:13 PM

views 70

देशातल्या गोड्या पाण्यातल्या तसंच खाडीमधल्या डॉल्फिनची मोजणी करण्याचा सरकारचा उपक्रम

देशातल्या गोड्या पाण्यातल्या तसंच खाडीमधल्या डॉल्फिनची मोजणी करण्याचा उपक्रम  सरकारने हाती घेतला आहे. प्रोजेक्ट डॉल्फिन अंतर्गत दोन टप्प्यात हे सर्वेक्षण होणार आहे. पहिल्या टप्प्यात गंगा नदीच्या मुख्य प्रवाहात म्हणजे बिजनौर ते गंगासागर आणि सिंधु नदीच्या खोऱ्यात हे सर्वेक्षण होईल तर दुसऱ्या टप्प्यात ...

January 18, 2026 8:22 AM

views 75

आकाशवाणी वृत्तविभागाच्या माजी वृत्तनिवेदिका जयश्री पाटणकर यांचं निधन

आकाशवाणीच्या वृत्त विभागातल्या माजी वृत्त निवेदिका जयश्री पाटणकर यांचं  मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्या ७० वर्षांच्या होत्या. सुरुवातीला राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयात काम केल्यानंतर  दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या वृत्तविभागात त्यांनी जवळपास तीन  दशकांहून‍ अधिक काम केलं हो...

January 17, 2026 3:12 PM

views 115

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद निवडणुकाही एकत्रित लढवणार!

पुणे महानगरपालिकेतल्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्रितपणे लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काल पुण्यात ही माहिती दिली....

January 17, 2026 1:49 PM

views 109

इराणमधले भारतीय नागरिक मायदेशी परतले

इराणमधल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक काल भारतात परतले. भारतीय नागरिकांनी इराण सोडावं, असं आवाहन सरकारने केलं होतं, त्या पार्श्वभूमीवर इराणमधून भारतीयांनी परतायला सुरुवात केली आहे. भारत सरकार इराणमधल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून भारतीय नागरिकांच्या  सुरक्षिततेसाठी सरकार व...

January 17, 2026 1:30 PM

views 137

२९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमधे भाजपा सर्वात मोठा पक्ष

महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी काल मतमोजणी झाल्यावर रात्री उशिरा अंतिम निकाल आले. या निकालांनुसार भारतीय जनता पक्षानं १ हजार ४२५ जागा जिंकून राज्यभरात वर्चस्व गाजवलं आहे. शिवसेनेनं ३९९, काँग्रेसनं ३२४, राष्ट्रवादी काँग्रेसनं १६७, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं १५५, राष्ट्...

January 17, 2026 1:29 PM

views 126

प्रधानमंत्र्यांनी मानले महाराष्ट्रातील जनतेचे आभार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या लोककल्याणकारी कारभारावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.   राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेलं यश म्हणजे व्यापक हिंदुत्व, पारदर्शकता, समावेशक विकासाला ...

January 17, 2026 1:19 PM

views 90

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात भूकंपाचा धक्का

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात आज पहाटे ४ पूर्णांक १ दशांश रिख्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. या भूकंपाचं केंद्र खावडा इथून ५५ किलोमीटर उत्तर-ईशान्येला असल्याची माहिती गांधीनगरच्या भूकंपशास्त्र संशोधन संस्थेनं दिली.

January 17, 2026 12:40 PM

views 89

Iran: सरकारने केलेल्या कारवाईत आतापर्यंत ३ हजार ९० जण मृत्युमुखी

इराणमधे सरकारविरोधी निदर्शनांवर सरकारने केलेल्या कारवाईत आतापर्यंत ३ हजार ९० जण मृत्युमुखी पडले आहेत. सध्या तेहरानमधल्या बाजारपेठा खुल्या झाल्या असल्या तरी इंटरनेट अजूनही बंद आहे. इराणचे निर्वासित युवराज रेजा पहलवी  यांनी नागरिकांना आंदोलन सुरू ठेवण्याचं आवाहन केलं आहे. इराणमधलं सरकार उलथून पाडलं तर...

January 17, 2026 1:15 PM

views 89

छत्तीसगडमध्ये चकमकीत २ माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात आज  सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. जंगलाच्या वायव्य भागात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकानं इथं शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पथकाच्या दिशेनं गोळीबार केला. प्रत्युत्तर...

January 16, 2026 7:37 PM

views 118

काँग्रेस राज्यातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनल्याची काँग्रेसची प्रतिक्रिया

मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसला समाधानकारक यश मिळालं नसलं तरी जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा निर्धार या जोरावर काँग्रेस राज्यातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला असल्याची प्रतिक्रीया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा इथं बोलताना दिली. या निवडणुकांमधे काँग्रेसचे एकूण साडेतीनशे नगरस...