June 19, 2024 8:53 PM

views 37

खरीप हंगामासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची १४ पीकांच्या MSPला मंजुरी

खरीप हंगामासाठी १४ पीकांसाठीच्या MSP अर्थात किमान आधारभूत किंमतीला केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. उत्पादन खर्चाच्या तुलनेत ही किंमत किमान ५० टक्क्यांनी अधिक असेल याची खबरदारी घेतल्याचं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. धान, कापूस, ज्वारी, नाचणी, बाजरी, म...

June 19, 2024 8:51 PM

views 56

देशाला २०४७ पर्यंत विकसित करण्यात ज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

२०४७ पर्यंत देशाला विकसित करण्यात ज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बिहारमधल्या राजगीर इथं नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारतीय शिक्षण आणि ज्ञान पद्धती मजबूत करुन भारत सुपर पावर बनू शकतो. जगाला भारताची ओळख आण...

June 19, 2024 8:41 PM

views 46

चीनमध्ये मुसळधार पावसामुळे १३ जणांचा मृत्यू

चीनमध्ये झालेल्या मुसळधार पाऊस,पूर आणि भूस्खलनासारख्या घटनांमध्ये किमान १३ जणांचा मृत्यू झाला. शंघान्ग इथे गेल्या २४ तासात सतत पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम सुमारे साडे सहासष्ट हजार लोकांच्या जीवनावर पडला आहे. या घटनांमध्ये कित्येक लोक बेपत्ता झाले आहेत.  

June 19, 2024 8:38 PM

views 44

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली विशेष न्यायालयानं आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना तिहार तुरुंगातून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आलं. ...

June 19, 2024 8:36 PM

views 53

औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये कोळशाचा मुबलक साठा उपलब्ध – कोळसा मंत्रालय

देशात कोळशापासून तयार होणाऱ्या ऊर्जेची मागणी यावर्षी ७ पूर्णांक ३ दशांश टक्के वाढली असून, देशातल्या औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये कोळशाचा मुबलक साठा असल्याचं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे. औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये साडे चार कोटी टन इतका कोळसा उपलब्ध आहे. तर देशातला एकूण कोळसा साठा साडे चौदा कोटी मे...

June 19, 2024 8:31 PM

views 40

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी घेतला उष्णतेच्या लाटेचा आढावा

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज देशातल्या उष्णतेच्या लाटेची परिस्थिती आणि रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेतला. तसंच या रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष निर्माण करण्याचे निर्देश दिले. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. अजय चौहान यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. उष्णत...

June 19, 2024 9:07 PM

views 42

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विशेष मुलाखत २० जून रोजी सकाळी ८.४५ वा. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विशेष मुलाखत उद्या सकाळी पावणे ९ वाजता आकाशवाणी गोल्डसह देशभरातल्या आकाशवाणी केंद्रांवरुन प्रसारित होईल. राष्ट्रपतींच्या वाढदिवसानिमित्त माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ही मुलाखत घेतली आहे. आकाशवाणीचं युट्युब चॅनल आणि इतर सोशल मीडियावरही ही मुलाखत ऐकता येईल.

June 19, 2024 8:44 PM

views 45

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पहिली अर्थसंकल्पपूर्व बैठक

अर्थसंकल्पावर अर्थतज्ञांच्या सूचना आणि सल्ला घेण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं आज पहिली अर्थसंकल्पपूर्व बैठक संपन्न झाली. या बैठकीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, तसंच वित्त, आर्थिक व्यवहार, महसूल, वित्तीय सेवा आणि कॉर्पोरेट व्यवहार विभागांचे सचिव आण...

June 19, 2024 7:52 PM

views 44

पालखीमार्गावरची कामं वेळेत पूर्ण करण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना

पायी पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पालखीमार्गावरची सगळी कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी जास्तीचे कामगार लावावेत, अशा सूचना सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. आषाढी वारी पूर्व नियोजनाबाबत सोलापुरातल्या नियोजन भवन इथल्या बैठकीत ते बोलत होते.   आ...

June 19, 2024 7:43 PM

views 53

‘मिफ’च्या स्पर्धांमधले चित्रपट सखोल, ठाम आणि संवेदनशील; परीक्षकांचं मत

१८व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी विद्यार्थी आणि नवोदित निर्मात्यांचे चित्रपट सखोल, ठाम आणि संवेदनशीलरीत्या विषय मांडणारे आहेत, अशा शब्दांत परीक्षक मंडळानं या निर्मात्यांचं कौतुक केलं. या दोन्ही परीक्षक मंडळांनी आज मिफच्या पाचव्या दिवशी वार्त...