June 22, 2024 1:09 PM

views 37

विज्ञान भारती संघटनेचं सहावं राष्ट्रीय अधिवेशन पुण्यात लोणी काळभोर इथल्या एमआयटी मध्ये होणार

विज्ञान विषयाबाबत जनजागृतीसाठी काम करणाऱ्या विज्ञान भारती या संघटनेचं सहावं राष्ट्रीय अधिवेशन आज आणि उद्या पुण्यात लोणी काळभोर इथल्या एमआयटी मध्ये होणार आहे. विज्ञान भारतीचे अध्यक्ष आणि सीएस-आयआर-चे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी ही माहिती दिली. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जीतें...

June 22, 2024 3:15 PM

views 71

आसाममध्ये आजपासून प्रसिद्ध कामाख्या मंदिरात अंबुबाची मेळा सुरू

आसाममध्ये आजपासून प्रसिद्ध कामाख्या मंदिरात अंबुबाची मेळा सुरू झाला आहे. 26 जून रोजी याची सांगता होणार असून अंबुबाची मेळ्यासाठी देशभरातून आलेले लाखो भाविक जमले आहेत. कामाख्या देवीची, प्रजनन आणि स्त्रीत्वाचं प्रतीक असलेली वार्षिक मासिक पाळी साजरी करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. उत्सवादरम्यान, का...

June 22, 2024 7:34 PM

views 90

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांची घेतली बैठक

राज्यांना दिला जाणारा करांचा हिस्सा, वित्त आयोग अनुदान आणि वस्तू आणि सेवा कर भरपाई थकबाकीच्या माध्यमातून  केंद्राकडून राज्यांना मिळणारं सहाय्य राज्यांमध्ये विकासाला गती देण्याच्या उद्देशाने प्रेरित असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ...

June 22, 2024 3:32 PM

views 59

CSIR-UGC-NET परीक्षा पुढे ढकलली

CSIR-UGC-NET ही 25 ते 27 जून रोजी संयुक्तपणे घेण्यात येणारी परीक्षा काही अपरिहार्य कारणामुळे तसंच तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक नॅशनल टेस्टिंग एजन्सी-एन टी ए च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केलं जाईल असं NTA ने कळवलं आहे. आधिक महितीसाठी, परीक्षार्थींनी 011- 407...

June 22, 2024 10:32 AM

views 60

केरळ, कर्नाटक,कोकण आणि गोव्यामध्ये पुढील पाच दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज

केरळ, कर्नाटकाचा दक्षिण मध्य आणि किनारी भाग, कोकण आणि गोव्यामध्ये पुढील पांच दिवस मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागात विदर्भाच्या उर्वरित भागात, मध्य प्रदेशच्या काही भागात, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि प...

June 22, 2024 10:21 AM

views 43

20 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात इंग्लंड पराभूत

20 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत सेंट लुईसा मधील ग्रॉस आईसलेट इथं झालेल्या सुपर आठ सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडचा सात धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी निवडून दक्षिण आफ्रिकेनं विजयासाठी 164 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं होतं मात्र इंग्लंडला 20 षटकात सहा गडी बाद 156 धावा करता आल्या. विश्वचषकाचे सह-यजम...

June 22, 2024 2:50 PM

views 65

१८ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल मुंबईत समारोप

18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात समारोप झाला. यावेळी 'The Golden Thread' या माहितीपटाला आंतरराष्ट्रीय श्रेणीत सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लन यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शिका निशिता जैन यांना सुवर्ण शंख,...

June 22, 2024 9:35 AM

views 66

दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा

दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस काल जगभरात मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिनाचा मुख्य कार्यक्रम जम्मू आणि काश्मीर मधील श्रीनगर इथं शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात संपन्न झाला. यावेळी मोदी यांनी आपल्या भाषणात शारीरिक, मानसिक आणि आध्...

June 21, 2024 8:38 PM

views 41

याेगाची उपयुक्तता जगभरातल्या लोकांना समजल्यामुळे योगाभ्यासाची व्याप्ती वाढली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

गेल्या १० वर्षात योगाभ्यासाची व्याप्ती वाढली असून योग पर्यटनाविषयीचं आकर्षण वाढल्यामुळे लोक भारतात त्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी येतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य समारंभ आज जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं शेर ए काश्मीर आंतरराष्ट्री...

June 21, 2024 8:30 PM

views 33

तूर, हरभरा आणि काबुली चणा यांच्या साठ्यावर सरकारचे निर्बंध

सरकारनं तूर, हरभरा आणि काबुली चणा यांच्या साठ्यावर नियंत्रण घातलं आहे. ग्राहकांना रास्त भावात डाळी मिळाव्यात आणि साठेबाजी किंवा अन्य गैरप्रकार होऊ नयेत यासाठी शासनानं हे पाऊल उचललं आहे. घाऊक तसंच किरकोळ व्यापारी, डाळ मिलचे मालक, बहुशृखंला किरकोळ विक्रेते, आणि आयातदार या सगळ्यांनाच हा निर्णय लागू आहे...