June 23, 2024 7:21 PM

views 48

नागपूर : आशा स्वयंसेविकांना मोबाईल फोनचं वितरण

नागपूरमध्ये १३ तालुक्यातल्या आशा स्वयंसेविकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मोबाइल फोनचं वितरण केलं. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण प्रतिष्ठानच्या सौजन्यानं आशा सेविकांना मोबाईल फोन सुविधेच्या्ानाल्ीो माध्यमातून अधिक सक्षमीकरणाचा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्ग...

June 23, 2024 7:16 PM

views 75

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात क्रमांक पटकावणाऱ्या शाळा बक्षिस वितरण

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात नागपूर जिल्ह्यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या शाळांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज बक्षिसं देण्यात आली. देवगिरी या शासकीय निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर, आमदार आशीष जायस्वाल, जिल्हाधिकारी डॉ....

June 23, 2024 7:04 PM

views 61

‘पुष्पक’ या अग्निबाणाचं तिसऱ्यांदा यशस्वी परीक्षण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आज पुष्पक या अग्निबाणाचं तिसऱ्यांदा यशस्वी परीक्षण केलं. कर्नाटकच्या चित्रदुर्ग एअरोनॉटिकल टेस्ट रेंज एटीआर इथे हे परीक्षण झालं. आज सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी वायू सेनेच्या चिनुक हेलिकॉप्टरमधून पुष्पकला ४ पूर्णांक ५ दशांश किलोमीटर उंचीवरून सोडण्यात आलं. प्रक्षेपणा...

June 23, 2024 3:39 PM

views 72

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा राज्यपातळीवर घेण्याची जयंत पाटील यांची मागणी

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा राज्यपातळीवर घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट-पीजी पुढे ढकलल्याबद्दल त्यांनी  केंद्र सरकारवर टीका केली आहे.   विविध प्रवेशपरीक्षांवरच्या आक्षेपांच्...

June 23, 2024 7:49 PM

views 41

नीट यूजी पेपरफुटीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

नीट यूजी पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने केेलेल्या तक्रारीनंतर सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी देशभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास हाती घेण्यासाठी सीबीआय पावलं उचलत आहे. नीट यूजी परीक्षेतल्या अनियमिततेचं प्रकरण काल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स...

June 23, 2024 3:14 PM

views 66

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आज संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आज संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधल्या अनेक महत्त्वाच्या मदुद्यांवर चर्चा करणार आहेत. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांतल्या परस्पर भागीदारीविषयी आणि विविध जागतिक मुद्द्यांवर चर्चा क...

June 23, 2024 3:21 PM

views 56

१८व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन उद्यापासून सुरू होणार

१८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल. लोकसभेचे हंगामी सभापती ज्येष्ठ भाजप खासदार भर्तृहरी महताब हे नवनिर्वाचित खासदारांना शपथ देतील.  लोकसभा सभापतीपदासाठी येत्या २६ जून रोजी निवडणूक होणार आहे.  राज्यसभेचं अधिवेशन येत्या २७ तारखेल...

June 23, 2024 3:12 PM

views 59

उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात एक अतिरेकी ठार

उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात उरी इथं नियंत्रणरेषेजवळ सुरू असलेल्या घुसखोरीविरोधी कारवाईदरम्यान सुरक्षादलांनी एका अतिरेक्याला ठार केलं आहे. बजरंग-उरी भागात काही घुसखोर अतिरेकी असल्याची बातमी मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी इथं शोधमोहीम सुरू केली. लपून बसलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबा...

June 23, 2024 3:08 PM

views 62

टेनिसपटू सुमीत नागलचं पॅरिस ऑलिम्पिकमधलं स्थान निश्चित

टेनिसपटू सुमीत नागल यानं आगामी २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. या हंगामात सुमितनं हेलबॉन चॅलेंजर आणि चेन्नई चॅलेंजर स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. यापूर्वी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुमीत दुसऱ्या फेरीपर्यंत पोहोचला होता. रोहन बोपण्णा आणि एन. श्रीराम बालाजी ही जोडीही पुरुष दुहेरीत ऑलिम...

June 23, 2024 3:05 PM

views 55

केरळ, कर्नाटक आणि गोव्यात पुढचे चार दिवस अतिजोरदार पावसाचा इशारा

केरळ, कर्नाटक आणि गोव्यात पुढचे चार दिवस अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तमिळनाडू, महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यांसह अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. ईशान्य भाग आणि पश्चिम बंगालच्या हिमालयाजवळच्या भागात पुढचे पाच दिवस जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल. उत्...