August 28, 2024 3:23 PM

views 26

मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द

गुजरातमधे वडोदरा इथं मुसळधार पाऊस सुरु असल्यानं मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या  रद्द करण्यात आल्या आहेत. सौराष्ट्र जनता एक्सप्रेस, लोकशक्ती एक्सप्रेस आणि सौराष्ट्र मेल या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच राणकपूर एक्सप्रेस, भगवत की कोठी एक्सप्रेस आणि जयपूर एक्सप्रेस या र...

August 28, 2024 3:31 PM

views 32

१७व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि अंतराळभौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताची १ सुवर्ण आणि ४ रौप्यपदकांची कमाई

१७व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि अंतराळभौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या चमूनं १ सुवर्ण आणि ४ रौप्यपदकांना गवसणी घातली आहे. १७ ते २६ ऑगस्टदरम्यान ब्राझिलची राजधानी रिओ दी जानेरो इथं झालेल्या या स्पर्धेत बंगळुरूचा दक्ष तयालिया यानं सुवर्ण, तर पुण्याचे आयुष कुठारी आणि सानिध्य सराफ, हैदराब...

August 28, 2024 3:44 PM

views 44

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गणेशोत्सवापूर्वी अहमदनगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीची कामं पूर्ण करावी – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गणेशोत्सवापूर्वी अहमदनगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीची कामं पूर्ण करावी असे निर्देश महसूल मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिले. मनमाड रस्त्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामं झालेली नाहीत त्य...

August 28, 2024 3:35 PM

views 55

महाविकास आघाडी येत्या रविवारी गेट वे ऑफ इंडिया इथं आंदोलन करणार

राजकोट किल्ल्यातला छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा कोसळणं ही घटना संतापजनक आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी येत्या रविवारी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं आंदोलन करणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतर्फे आज मालवणात मोर्चा क...

August 28, 2024 3:38 PM

views 35

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

  ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांच्या पार्थिवावर आज पुण्याच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.  काल पुण्यात निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. नाटक, चित्रपट, मालिका या सर्व क्षेत्रात आपल्या समर्थ अभिनयानं त्यांनी अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण ...

August 28, 2024 1:46 PM

views 32

देशातल्या २२ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

देशातल्या २२ राज्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र, जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशातला काही भाग तसंच गोवा, कर्नाटक आणि केरळ इथल्या अनेक ठिकाणी  आज ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तर ईशान्येच्य...

August 28, 2024 1:41 PM

views 45

वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी राष्ट्रीय कृती दलाची दुसरी बैठक

एनटीएफ अर्थात राष्ट्रीय कृती दलाची दुसरी बैठक आज दूरदृष्यप्रणालीमार्फत होत आहे. या बैठकीचं अध्यक्षस्थान केंद्रीय गृह सचिव आणि केंद्रीय आरोग्य सचिव  संयुक्तपणे भूषवणार असून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक बैठकीत सहभागी होतील. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी...

August 28, 2024 1:34 PM

views 62

पश्चिम बंगालमध्ये भाजपानं जाहीर केलेल्या ‘बंदला’ संमिश्र प्रतिसाद

पश्चिम बंगालमध्ये भाजपानं आज जाहीर केलेल्या ‘बंदला’ संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच झालेल्या ‘नबन्ना अभिजन’ आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कथित अत्याचाराच्या निषेधार्थ आज भाजपानं बंगाल मध्ये ‘बंदची हाक’ दिली होती. दरम्यान, कोलकत्यात तुरळक प्रमाणात वाहतूक सुरु असून दुकानं तसंच शाळा, महाविद्याल...

August 28, 2024 1:57 PM

views 44

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पुतळ्याचे शिल्पकार आणि बांधकाम सल्लागारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

महाराष्ट्रात राजकोट इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौदलाच्या दोन अधिकाऱ्यांनी काल मालवणला भेट देऊन पहाणी केली. या पुतळ्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानं २० ...

August 28, 2024 1:20 PM

views 21

सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याविषयीची चर्चा पुढे ढकलण्याचा संयुक्त राष्ट्रांचा निर्णय, निर्णयावर भारताची टीका

सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याविषयीची चर्चा पुढे ढकलण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं एकमतानं घेतला आहे. ही चर्चा आता पुढल्या अधिवेशनात होईल. भारताच्या उपस्थायी प्रतिनिधी योजना यादव यांनी या निर्णयावर टीका केली आहे. सरकारांमधल्या आपापसातल्या वाटाघाटींची प्रक्रिया खंडित झाली तर त्याची वैधता...