August 30, 2024 12:00 PM

views 51

आठवी आशिया चषक महिला हॉकी अजिंक्यपद स्पर्धा भारतात होणार

आठवी आशिया चषक महिला हॉकी अजिंक्यपद स्पर्धा भारतात होणार आहे. आशियाई हॉकी महासंघाचे अध्यक्ष दातो फ्युमियो ओगुरा यांनी ही घोषणा केली आहे. हॉकी इंडिया आणि बिहार राज्य सरकार संयुक्तपणे याचं आयोजन करत असून बिहारमधल्या राजगीर इथं 11 नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होईल. बिहार राज्यात पहिल्यांदाच आंतर...

August 30, 2024 1:51 PM

views 39

अरबी समुद्रात असना चक्रीवादळाची चाहूल

अरबी समुद्रात ईशान्येकडे 'असना' हे चक्रीवादळ तयार होत आहे, सध्या निर्माण झालेलं कमी दाबाचे क्षेत्र गुजरातच्या पश्चिम-नैऋत्य दिशेला दाखल झालं असून, येत्या १२ तासांमध्ये त्याचं चक्रीवादळात रूपांतर होईल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवली आहे. मान्सूनमध्ये चक्रीवादळ तयार होणं ही दुर्मीळ ...

August 30, 2024 11:09 AM

views 26

कोळसा वितरण व्यवस्थापन योजनेंतर्गत 38 प्राथमिक रेल्वे प्रकल्पांना प्राधान्य देण्याचं निश्चित

कोळसा मंत्रालयानं कोळसा वितरण व्यवस्थापन योजनेंतर्गत 38 प्राथमिक रेल्वे प्रकल्पांना प्राधान्य देण्याचं निश्चित केलं आहे. रेल्वे मंत्रालयाच्या समन्वयानं हे प्रकल्प जलदगतीने पूर्ण केले जातील. रेल्वेची दळणवळण व्यवस्था सुधारण, कोळसा पुरवठा वेळेवर होईल या दृष्टिनं प्रयत्न करणे, वितरण व्यवस्थापनावरचा खर्च...

August 30, 2024 10:49 AM

views 46

अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचे देशभरात दहा ठिकाणी छापे

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं आखाती देशांतून कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर जसमीत हकीमजादा प्रकरणी काल देशभरात दिल्ली, अमृतसर, जालंधर, मुंबई, सोलापूर आणि इंदूर अशा दहा ठिकाणी छापे टाकले. अमेरिकेच्या फॉरेन नार्कोटिक्स किंगपिन डेजिगेशन अॅक्टअंतर्गत 'महत्त्वपूर्ण परदेशी अंमली पदार...

August 30, 2024 10:43 AM

views 48

पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये शीतलदेवी आणि राकेशकुमार यांचा मिश्र तिरंदाजी प्रकारात नवा विक्रम.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये शीतल देवी आणि राकेश कुमार या भारतीय खेळाडूंनी तिरंदाजी स्पर्धेत 1399 च्या एकत्रित गुणांसह एक नवीन विक्रम केला आहे. आता हे दोन्ही खेळाडू 2 सप्टेंबरला अव्वल मानांकित खेळाडू म्हणून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. दरम्यान, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू आज विविध स्पर्धांमध्...

August 30, 2024 10:15 AM

views 57

मालवणमधील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाला गती

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी काल वर्षा या निवासस्थानी विशेष बैठक घेतली. त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी नुकत्याच काही शिल्पकारांच्या भेटीही घेतल्या आहेत. दरम्यान या...

August 30, 2024 10:04 AM

views 39

केंद्र सरकारनं इथेनॉल उत्पादनावरील बंदी उठवली; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

केंद्र सरकारनं 2024-25 च्या गाळप हंगामासाठी उसाचा रस, साखरेचा पाक आणि बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यावरची बंदी उठवली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना आता इथेनॉल निर्मिती करता येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं सांगत मुख्यमंत्...

August 29, 2024 8:16 PM

views 24

३ सप्टेंबरला महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातल्या उत्कृष्ट संसदपटू आणि भाषण पुरस्कारांचं वितरण

महाराष्ट्र विधान मंडळातल्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातल्या उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण या पुरस्कारांचं वितरण ३ सप्टेंबर रोजी मुंबईत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. सन २०१९ ते २०२४ या कालावधीसाठी हे पुरस्कार...

August 29, 2024 8:12 PM

views 67

पॅरालिम्पिक स्पर्धा २०२४ : बॅडमिंटनच्या महिला एकेरीत पलक कोहलीनं फ्रान्सच्या मिलेना सूरीऊचा सलग दोन गेममध्ये पराभव केला

पॅरिस इथं सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत आज बॅडमिंटनच्या महिला एकेरीत पलक कोहलीनं सलामीच्या सामन्यात फ्रान्सच्या मिलेना सूरीऊचा सलग दोन गेममध्ये पराभव केला, तर अव्वल मानांकित नीतेश कुमारनं टोक्यो कांस्य पदक विजेत्या मनोज सरकारचा पराभव केला. अव्वल मानंकित टी. मुरूगेसन हिनं रोझा मार्कोचा पराभव केल...

August 29, 2024 8:02 PM

views 41

देशभरात महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचाराच्या घटना चिंताजनक – बसपा अध्यक्ष मायावती

देशभरात महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचाराच्या घटना चिंताजनक आहेत, या प्रकरणात सर्व राजकीय पक्षांनी राजकारण न करता योग्य ती कठोर पावलं उचलावीत, असं बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष  मायावती यांनी म्हटलं आहे. देशात विविध ठिकाणी निष्पाप अल्पवयीन मुलींवर आणि महिलांविरोधात बलात्कार, हत्या आणि अत्याचाराच्या झाल...