August 30, 2024 8:18 PM

views 33

आर्थिक समावेशनासाठी वित्तविषयक तंत्रज्ञानाने मोलाची कामगिरी बजावली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

शहर आणि गावातली दरी दूर करुन आर्थिक समावेशनासाठी वित्तविषयक तंत्रज्ञानाने मोलाची कामगिरी बजावली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वित्त आणि तंत्रज्ञान विषयक ग्लोबल फिनटेक फेस्टला  संबोधित करत होते. गेल्या १० वर्षांत ३१ अब्ज डॉलरची गुंतवणूक फिनटेकमध्ये झाली असून फिनटेक...

August 30, 2024 7:20 PM

views 32

पीओपीच्या गणेशमूर्तींवर तूर्त बंदी नाही, मात्र… – मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरची बंदी तूर्त टळली आहे. पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका मूर्तिकार आणि पर्यावरणवाद्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या...

August 30, 2024 2:34 PM

views 57

सीमा भागात शांतता राखण्याबद्दल भारत आणि चीनदरम्यान सहमती

सीमा भागात शांतता राखण्याबद्दल भारत आणि चीनदरम्यान सहमती झाली आहे. भारत-चीन सीमा प्रश्नविषयक सल्लामसलत आणि समन्वयासाठी कार्यरत संयुक्त यंत्रणेची ३१वी बैठक काल चीनमध्ये बीजिंग इथं पार पडली. या बैठकीत यावर सहमती झाली. सीमा भागात शांतता प्रस्थापित करणं आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा आदर राखणं, ही बाब दो...

August 30, 2024 2:30 PM

views 25

वक्फ घटनादुरुस्ती विधेयक २०२४ च्या अभ्यासासाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीची बैठक नवी दिल्लीत सुरु

वक्फ घटनादुरुस्ती विधेयक २०२४ च्या अभ्यासासाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीची बैठक आज नवी दिल्लीत सुरु आहे. यामध्ये संबंधितांची मतं जाणून घेतली जात असून आज मुंबईच्या ऑल इंडिया सुन्नी जमायुतुल उलेमा आणि नवी दिल्लीच्या इंडियन मुस्लीमस फॉर सिविल राईट्स या संघटनांचे प्रतिनिधी समितीसमोर आपलं म्हणणं मां...

August 30, 2024 6:33 PM

views 35

जेएएमच्या प्रवेश परीक्षांसाठीचे अर्ज ३ सप्टेंबरपासून भरता येणार

पदव्युत्तर शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा जेएएम च्या प्रवेश परीक्षांसाठीचे अर्ज ३ सप्टेंबरपासून भरता येणार आहेत. यासाठी आयआयटी दिल्लीने एक नोंदणी संकेतस्थळ तयार केलं आहे. या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षांच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवता येईल. प्रवेश परीक्षा २ फेब्रुव...

August 30, 2024 2:21 PM

views 20

लहान मुलांना स्थानिक भाषेमधून देण्यात येणाऱ्या शिक्षणासदर्भात नवी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक

शिक्षण मंत्रालयानं शालेय शिक्षणातल्या विविध भाषांचा वापर त्याचप्रमाणे लहान मुलांना स्थानिक भाषेमधून देण्यात येणाऱ्या शिक्षणासदर्भात काल नवी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. शालेय शिक्षण विभागाचे सचिव संयज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला ज्येष्ठ अधिकारी आणि शिक्षणतज्ञ उपस्थित होते. ...

August 30, 2024 2:03 PM

views 74

महाराष्ट्रात राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यां; पुतळा पडल्या प्रकरणी एका आरोपीला अटक

सिंधुदुर्गात मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा पडल्याच्या प्रकरणात पोलिसांनी चेतन पाटील या एका आरोपीला अटक केली आहे. चेतन याला कोल्हापुरातून ताब्यात घेतल्याचं सिंधुदुर्ग पोलिसांनी सांगितलं. चेतन पाटील हा पुतळा बनवण्याचं कंत्राट दिल्या गेलेल्या मेसर्स आर्टिस्ट या कं...

August 30, 2024 1:39 PM

views 34

वाढवण इथं उभारण्यात येणाऱ्या खोल पाण्यातल्या सर्वात मोठ्या बंदराचं आज प्रधानमंत्री करणार भूमीपूजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून पालघर इथं आज विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत. डहाणू गावात ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदराचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. आशिया खंडातलं हे खोल पाण्यातलं सर्वात मोठं बंदर असेल आणि जगातल्या आघाडीच्या १० बंदरामध्ये याचा ...

August 30, 2024 1:36 PM

views 38

भारताचा जीडीपी वाढीचा दर चालू वर्षात ७ पूर्णांक २ दशांश टक्के राहील असा मूडीजचा अंदाज

भारताचा जीडीपी वाढीचा दर चालू वर्षात ७ पूर्णांक २ दशांश टक्के राहील असा अंदाज मूडीज या पतमानांकन संस्थेनं वर्तवला आहे. यापूर्वी या वर्षासाठी भारताचा जीडीपी वाढीचा दर ६ पूर्णांक ८ दशांश टक्के राहील असा मूडीजचा अंदाज होता. २०२५ साठीचा सुधारित अंदाजही मूडीजने प्रसिद्ध केला आहे. पुढच्या वर्षात भारताचा ज...

August 30, 2024 1:10 PM

views 28

हरियाणा विधानसभा निवडणुक : उमेदवार निश्चितीसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक विषयक केंद्रीय समितीची बैठक नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुख्यालयात काल संध्याकाळी झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, पक्षाचे हरियाणा निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह पक्षाचे इतर वरिष्ठ नेते ...