August 31, 2024 10:38 AM

views 37

वाढवण बंदरासह विविध विकास कामांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ

पालघर जिल्ह्यात वाढवण इथं ७६ हजार कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या बंदराचं भूमीपूजन, तसंच २१८ मत्स्यपालन विकास योजनेसह विविध विकास योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. हे आशियातल सर्वात मोठं आणि जगातल्या आघाडीच्या १० बंदरांमधलं एक बंदर असेल. वाढवण बंदरामु...

August 31, 2024 10:26 AM

views 28

प्रधानमंत्री आज जिल्हास्तरीय न्यायपालिकेसंबंधीच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीच्या भारत मंडपम इथं जिल्हास्तरीय न्यायपालिकेसंबंधीच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७५ वर्षं झाल्याच्या निमित्ताने एक विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. सर्वोच्च न्यायालयानं आयोजित ...

August 31, 2024 10:23 AM

views 40

नांदगाव येथे शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव इथं उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. राजकोट इथं राज्य शासन आणि नौदलाच्या वतीनं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा लवकरच उभारण्यात येईल; तसंच नांदगावच्या शिवसृष्टीसाठी लागणारा निधी उपलब...

August 31, 2024 9:43 AM

views 58

दोडामार्ग तालुक्यात औषधांचे कारखाने सुरू करण्यात येणार – खासदार नारायण राणे

सिंधुदुर्गातील जंगलातल्या वनौषधींचं सर्वेक्षण करायला सांगितलं असून दोडामार्ग तालुक्यात औषधांचे कारखाने सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली. ते काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंच्या प्रदर्शन आणि खरेदी मह...

August 31, 2024 11:22 AM

views 170

पॅरीस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज अवनी लेखराची सुवर्ण पदकाला गवसणी

पॅरीस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज भारतानं एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकं अशी चार पदकं मिळवली. नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल स्टॅन्डिंग प्रकारात आज भारताच्या अवनी लेखरानं नवा विक्रम नोंदवत सुवर्णपदकाची कमाई केली. तिनं २४९ पूर्णांक ७ दशांश गुण मिळवत ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. याच प्रकारात भारताच...

August 31, 2024 9:18 AM

views 20

शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आठवडाभरात दूध अनुदान जमा होईल – पुणे दुग्धविकास आयुक्त प्रशांत मोहोड

राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आठवडाभरात दूध अनुदान जमा होईल अशी माहिती पुणे दुग्धविकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली आहे. राज्यातल्या सर्व दूध संघांनी शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर तत्काळ भरावी. राज्य सरकारकडून 256 कोटी रुपये दुग्धविकास विभागाकडे वर्ग झाले आहेत. कागदोपत्री तयारी पूर्ण...

August 31, 2024 9:11 AM

views 16

नदीजोड प्रकल्पाची राज्य मंत्रिमंडळात घोषणा, निधीसाठी प्रस्ताव लवकरच केंद्राकडे पाठवणार – खासदार हेमंत गोडसे

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या दमणगंगा-अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंग या नदीजोड प्रकल्पाला जलसंपदा विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. पुढच्या कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे पाठवला असून त्यानंतर अंतिम मान्यतेसाठी हा प...

August 30, 2024 8:17 PM

views 27

डॉ. टी. व्ही. सोमनाथन यांनी कॅबिनेट सचिव म्हणून पदभार स्विकारला

भारतीय प्रशासकीय सेवेचे वरिष्ठ अधिकारी डॉ. टी. व्ही. सोमनाथन यांनी आज कॅबिनेट सचिव म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या आधीचे कॅबिनेट सचिव राजीव गउबा सेवानिवृत्त झाले. डॉ. सोमनाथन १९८७च्या तुकडीचे तमिळनाडू केडरचे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी प्रधानमंत्री कार्यालयात संयुक्त सचिव आणि अतिरिक्त सचिवपदाची...

August 30, 2024 8:13 PM

views 35

सहा लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचं गडचिरोली पोलिसांपुढं आत्मसमर्पण

गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या पश्चिम उपक्षेत्र विभाग तांत्रिक समितीचा सदस्य केदार उर्फ मन्या किंजो नैताम यानं आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. शासनाने त्याच्यावर ६ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. २०१२ ते २०२० पर्यंत तो प्लाटून क्रमांक १५ मध्ये कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे १८, जाळपोळीचे ३, खुनाच...

August 30, 2024 8:10 PM

views 23

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा भाजपात प्रवेश

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी आज भाजपात प्रवेश केला. झारखंडमधल्या संथाल परगणा भागात बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीमुळे धोक्यात आलेली आदिवासी अस्मिता आणि अस्तित्व सुरक्षित राखण्यासाठी आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचं चंपाई सोरेन यांनी सांगितंल. आज दुपारी रांचीमधे धुर्वा मैदानात झालेल्या...