August 31, 2024 1:22 PM

views 41

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत ॲलेक्सेई पॉपिरिन कडून नोव्हाक जोकोविचचा पराभव

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेता नोव्हाक जोकोविचला ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्सेई पॉपिरिन यानं पराभवाचा धक्का दिला. पॉपिरिननं जोकोविचवर ६-४, ६-४, २-६, ६-४ अशी मात केली. एका वर्षात एकही ग्रँडस्लॅम जिंकण्यात अपयशी ठरण्याची जोकोविचची २०१७नंतरची ही पहिलीच वेळ आहे.  दरम्यान, भारताचा युकी भांब्री आणि त्या...

August 31, 2024 1:15 PM

views 37

अरबी समुद्रावरल्या ‘आस्ना’ चक्रीवादळामुळे अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

चक्रीवादळ ‘आस्ना’ पुढल्या चोवीस तासात अरबी समुद्रावरुन वायव्य आणि इशान्येच्या दिशेने सरकेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. या चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुजरातमध्ये गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडला.  अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओदिसा,...

August 31, 2024 1:04 PM

views 40

पंजाबमध्ये  पाणीटंचाई चिंताजनक, अनेक जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घट

पंजाबमध्ये  पाणीटंचाई चिंताजनक असून अनेक जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. एकूण 23 जिल्ह्यांपैकी 8 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून अन्य 9 जिल्ह्यांमध्येही पाणी पातळीची अवस्था बिकट आहे. केंद्रीय भूजल मंडळाच्या अहवालानुसार राज्यभरात केवळ 17 अब्ज क्युबिक मिटर भूजल उपलब्ध आहे. पंजाबच...

August 31, 2024 1:02 PM

views 71

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं नेमबाज अवनी लेखरा हिचं अभिनंदन

पॅरिस पॅरालिम्पिक खेळांमध्ये महिलांच्या 10 मीटर एयर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत भारताचं नाव पदक विजेत्या देशांच्या  यादीत झळकावल्याबद्दल राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी नेमबाज अवनी लेखरा हिचं अभिनंदन केलं आहे. देशाला तिच्या ऐतिहासिक आणि असामान्य कामगिरीचा अभिमान असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आ...

August 31, 2024 2:42 PM

views 30

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री जीतन राम मांझी खादी महोत्सवाबाबत घेतली आढावा बैठक

खादी आणि ग्रामोद्योग योजनांवर लक्ष केंद्रित करून त्याच्या अंमलबजावणीसाठी सखोल आणि विस्तृत प्रयत्नांची गरज असल्याचं केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री जितन राम मांझी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत खादी महोत्सव २०२४ च्या आढावा बैठकीत बोलत होते. देशात खादीला चालना मिळण्यासाठी येत्या ऑक्ट...

August 31, 2024 12:32 PM

views 37

फिनटेक क्षेत्राने नैतिकता वापरुन पैशांचा गैरव्यवहार आणि आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा कसा उपयोग करता येईल याकरिता प्रयत्न करावेत – मंत्री पियुष गोयल

फिनटेक क्षेत्राने नैतिकता वापरुन पैशांचा गैरव्यवहार आणि आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा कसा उपयोग करता येईल याकरिता प्रयत्न करावेत असं आवाहन केंद्रिय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी फिनटेक क्षेत्राला केलं आहे.मुंबईत आयोजित फिनटेक महोत्सव 2024 ला संबोधित करताना ते बोलत होते....

August 31, 2024 12:26 PM

views 16

धर्मेंद्र प्रधान यांचे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पीएम श्री योजनेसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याचे आवाहन

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे लाभ देशातील प्रत्येक मुलाला मिळणं ही केंद्र सरकारची वचनबध्दता असल्याचं केंद्रिय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांना लिहीलेल्या पत्रांत म्हटलं आहे. तामिळनाडू राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा योजनेचा लाभ झाला आहे. नवीन शैक्षणिक धोरण तम...

August 31, 2024 12:15 PM

views 40

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी काल रांची इथं आयोजित कार्यक्रमांत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी नेते बाबूलाल सोरेन यांचा मुलानेही भाजपात प्रवेश केला. या कार्यक्रमाला बाबुलाल मरांडी, शिवराज सिंह चौहान आणि हिमंता बिस्व सरमा यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित...

August 31, 2024 10:58 AM

views 14

भारताच्या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रामुळे जगभरातल्या लोकांची जीवनपद्धती सुलभ होणार असल्याचं पंतप्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारताच्या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रामुळे जगभरातल्या लोकांची जीवनपद्धती सुलभ होणार असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. जागतिक वित्तीय तंत्रज्ञान अर्थात फिनटेक महोत्सवात ते काल मुंबईत बोलत होते. भारतानं ज्या गतीनं आणि ज्या प्रमाणात वित्त क्षेत्रातलं तंत्रज्ञान अंगीकारलं आहे त्याल...

August 31, 2024 10:36 AM

views 15

वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचं आर्थिक चित्र बदलेल – प्रधानमंत्र्यांचा विश्वास

वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचं आर्थिक चित्र बदलणार असून वाढवण बंदराच्या पायाभरणीचा दिवस हा देशाच्या प्रगतीच्या वाटचालीतला ऐतिहासिक दिवस आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदराच्या पायाभरणीसह अन्य विकासकामांचं उद्घाटन आणि भूमीपूजन काल पंतप्रधानांच्या हस...