August 31, 2024 8:17 PM

views 56

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत 10 मीटर एयर पिस्तूल स्पर्धेत रुबिना फ्रान्सिसला कांस्य पदक

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला आज आणखी एक पदक मिळालं. महिलांच्या १० मीटर एयर पिस्तूल स्पर्धेत रुबिना फ्रान्सिसला कांस्य पदक मिळालं. या स्पर्धेतलं भारताचं हे पाचवं आणि नेमबाजीतलं चौथं पदक आहे.  बॅडमिंटनमध्ये भारताच्या सुकांत कदम आणि सुहास यतिराज यांनी आपापल्या एकेरीच्या गटात विजय मिळवत उपांत्य फे...

August 31, 2024 7:09 PM

views 37

महिला सुरक्षेचे कायदे सक्रिय करण्याची आणि या प्रकरणांचा निकाल लवकर लावण्याची गरज प्रधानमंत्र्यांच्याकडून व्यक्त

देशात महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक कडक कायदे लागू केले आहेत. हे कायदे आणखी सक्रीय करायची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली. अशा प्रकरणांचे निकाल जितक्या लवकर लागतील, तितकी आपण सुरक्षित असल्याची खात्री महिलांना पटेल, असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. जिल्हास्तरीय न्यायपालिकेच्या दो...

August 31, 2024 7:01 PM

views 41

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून नागपूरात सुरुवात

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आज नागपूर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरूवात झाली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक कोटी साठ लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले असून १ हजार ५६२ कोटींहून अधिक रुपये वितरित झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांग...

August 31, 2024 6:57 PM

views 50

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात साडे ९ कोटींहून अधिक मतदार

राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात साडे ९ कोटींहून अधिक मतदार आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं काल अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार राज्यात ९ कोटी ५३ लाख ७४ हजार ३०२ मतदार आहेत. ६ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारुप यादीच्या तुलनेत राज्यात १६ लाख ९८ हजार ३६८ ...

August 31, 2024 7:31 PM

views 24

‘पर्यटन धोरण 2024 : ॲडव्हान्टेज विदर्भ कॉन्क्लेव्ह’ चा समारोप

वनसफारीसाठी आता बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या वापरल्या जात आहे. त्यामुळं प्रदुषण होत नसल्यानं या गाड्यांची संख्या तिप्पट करावी. यामुळं पर्यटकांची संख्‍या तसंच रोजगारही वाढेल, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपूर इथं केली. पर्यटन विषयक परिषदेत ते बोलत होते. राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश मह...

August 31, 2024 8:19 PM

views 53

व्हिएतनाममध्ये सायबर घोटाळे करणाऱ्यांच्या ताब्यातून ४७ भारतीयांची सुटका

व्हिएतनाममध्ये लाओस इथल्या सायबरकेंद्रामध्ये अडकलेल्या सत्तेचाळीस भारतीयांना भारतीय दूतावासाने सोडवलं आहे. ही सायबर केंद्रे म्हणजे सायबर घोटाळे करणारी केंद्रे होती.  बोकिओ परगण्यातल्या  गोल्डन ट्रँगल सेझमध्ये  ही केंद्रे  सुरु होती. भारतीय दूतावासाने त्यांच्या समाजमाध्यमावरच्या संदेशातून याबद्दल माह...

August 31, 2024 6:07 PM

views 36

अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणी इथं शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचं आयोजन

कृषी उत्पादन वाढवण्यासाठी तरुणांनी नवीन तंत्रज्ञान शिकून घ्यायला हवं असं राज्याचे महसूल पशूसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणी इथं कृषी खात्याने आयोजित केलेल्या शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. सेंद्रीय पद्धतीने पि...

August 31, 2024 5:11 PM

views 68

शिवरायांच्या पुतळ्याचे रचना सल्लागार चेतन पाटील याला ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

मालवणच्या राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे रचना सल्लागार चेतन पाटील  याला ५ सप्टेंबरपर्यंत  पोलीस कोठडी सुनावली आहे.  चेतन पाटील याला गुरुवारी कोल्हापूर पोलिसानी अटक करुन मालवण पोलीसांच्या ताब्यात दिलं होतं. पोलिसांनी त्याला आज मालवण न्यायालयात हजर केलं. सरकारी वकील तसंच आरोपींच्य...

August 31, 2024 3:32 PM

views 36

धुळे पोलीस दलात नवीन भरती झालेल्या प्रशिक्षणार्थींंचा दिक्षांत सोहळा

धुळे पोलीस दलात नवीन भरती झालेल्या प्रशिक्षणार्थींंचा दिक्षांत सोहळा आज सकाळी झाला. धुळ्याच्या कवायत मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरिक्षकांनी पोलीस प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्रक दिलं. उत्तम कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा त्यांनी यावेळी सत्कार केला. यावेशी धुळे जिल्हा परिषदे...

August 31, 2024 3:39 PM

views 46

तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

वंदे भारत रेल्वेगाड्यांचा वाढता विस्तार, आधुनिकता आणि वेग हे विकसित भारताच्या दिशेनं पडलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मीरत-लखनौ, मदुराई-बेंगळुरू आणि चेन्नई-नागरकोईल या तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी आज हिरवा झेंडा दाखवला. य...