August 31, 2024 8:28 PM

views 36

22 जणांसह रशियन हेलिकॉप्टर बेपत्ता

रशियाच्या कामचाटका भागातल्या वाझाहेट ज्वालामुखी जवळ एक एम आय ८ जातीचे हेलिकॉप्टर बेपत्ता झालं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण २२ जण होते. आज सकाळी उड्डाण केल्यानंतर काही काळात संपर्क तुटला. हेलिकॉप्टरचा शोध सुरु आहे. यासाठी मदत आणि बचाव पथक रवाना करण्यात आलं आहे.

August 31, 2024 8:26 PM

views 30

जपानच्या संरक्षण मंत्र्यांकडून २०२५ या आर्थिक वर्षासाठी ५९ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा प्रस्ताव

जपानच्या संरक्षण मंत्र्यांनी २०२५ या आर्थिक वर्षासाठी संरक्षण विभागासाठी  सर्वाधिक निधीच्या  तरतूदीचा प्रस्ताव ठेवला आहे. पुढील वर्षासाठी ५९ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून काल झालेल्या बैठकीत या तरतूदीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. येत्या डिसेंबर मध्ये अर्थ मंत्रालयाबरोबर होणाऱ्या बै...

August 31, 2024 8:23 PM

views 68

जैवतंत्रज्ञानातील अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगार असं BioE3 धोरण प्रसिद्ध

जैवतंत्रज्ञानातील अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगार असं BioE3 धोरण केंद्र सरकारनं आज प्रसिद्ध केलं. या धोरणामुळे देशातल्या जैविक उत्पादनामध्ये वाढ होईल असं  विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग म्हणाले. गेल्या आठवड्यात मंत्रीमंडळानं या धोरणाला मंजुरी दिली होती. या धोरणाचा परिणाम अन्ननिर्मिती,...

August 31, 2024 8:11 PM

views 39

बलात्कार आणि पॉक्सो प्रकरणे हाताळण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करण्याची केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांची ममता बॅनर्जी यांना विनंती

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आर.जी. कार रुग्णालयामधील बलात्कार आणि पॉक्सो प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करण्याची विनंती पुन्हा पत्राद्वारे केली आहे.  पश्चिम बंगालमधल्या सध्याच्या जलदगती...

August 31, 2024 8:07 PM

views 42

येत्या पाच वर्षांत १० आयुष संस्था उभारण्यात येणार – आयुषमंत्री प्रतापराव जाधव

प्रत्येक घराघरांत आयुर्वेद पोहोचवण्याची प्रधानमंत्र्यांची संकल्पना पूर्ण करण्यासाठी आयुष मंत्रालय कटिबद्ध असून येत्या पाच वर्षांत १० आयुष संस्था उभारण्यात येणार असल्याचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीतल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद इथं झालेल्या एका कार्यक्...

August 31, 2024 7:58 PM

views 43

हरियाणा आणि जम्मू काश्मिर विधानसभेसाठी ४ ऐवजी ८ ऑक्टोबरला मतमोजणी

केंद्रीय निवडणूक आयोगानं हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख बदलली असून हरियाणात आता १ ऑक्टोबर ऐवजी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. बिष्णोई समाजाच्या असोज अमावस्या उत्सावामुळे ही तारीख बदलण्यात आल्याचं आयोगानं म्हटलं आहे. अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी ही तारीख बदलण्याची विनंती केली होत...

August 31, 2024 7:40 PM

views 36

रत्नागिरीत सायन्स गॅलरीचं लोकार्पण

रत्नागिरी शहरातल्या बाळासाहेब ठाकरे तारांगणात उभारण्यात आलेल्या सायन्स गॅलरीच लोकार्पण आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झालं. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, त्याचप्रमाणे त्यांच्या चिकित्सक वृत्तीला प्रोत्साहन मिळावं, या दृष्टीनं या गॅलरीची उभारण...

August 31, 2024 7:35 PM

views 39

राजस्थान मल्टीस्टेट बँकेचे संचालक अभिषेक बियाणी यांना पुणे इथून अटक

राजस्थान मल्टीस्टेट बँकेचे संचालक अभिषेक बियाणी यांना पुणे इथून अटक करण्यात बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. अनेक दिवसांपासून या प्रकरणातील आरोपी असलेलं बियाणी कुटुंबिय पोलिसांना गुंगारा देत होतं. अखेर आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. अभिषेक बियाणी याला आता बीडला घेऊन जाणार असून ठेवीदारा...

August 31, 2024 7:26 PM

views 45

द्राक्ष बेदाण्याला कृषिमाल म्हणून मान्यता मिळण्यासाठी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

द्राक्षापासून तयार होणाऱ्या बेदाण्याला कृषिमाल म्हणून मान्यता मिळण्यासाठी नाबार्डसह अन्य संबंधित यंत्रणांसोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत ठरलं. बेदाण्यावरचा पाच टक्के जीएसटी रद्द करण्यासाठी केंद्रीय जीएसटी परिषदेला प...

August 31, 2024 7:46 PM

views 30

तरुण पिढीनं आपली प्रतिभा, नवनिर्मिती आणि क्षमता, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी वापरण्याची गरज – केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

तरुण पिढीनं आपली प्रतिभा, नवनिर्मिती आणि क्षमता, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी वापरण्याची गरज आहे, असं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं आहे. मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेत 'आयडियाज फॉर लाईफ' या मोहिमेसंबंधीच्या कार्यक्रमात आज ते बोलत होते. २०२१मध्य...