January 18, 2026 7:37 PM

views 66

राष्ट्रीय चाचणी संस्थेचं यंदाच्या जेईई (मुख्य) सत्र- १ या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रकं जारी

एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं यंदाच्या जेईई (मुख्य) सत्र- १ या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रकं जारी केली आहेत. या महिन्याच्या २१ ते २४ तारखेदरम्यान बी.ई. अथवा बी.टेकच्या पेपर १ साठी बसणाऱ्या उमेदवारांना एनटीएच्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन त्यांचं प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे....

January 18, 2026 7:31 PM

views 92

ज्येष्ठ इतिहाससंशोधक रामचंद्र मोरवंचीकर यांचं निधन

ज्येष्ठ इतिहाससंशोधक रामचंद्र मोरवंचीकर यांचं छत्रपती संभाजी नगर इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पहिलं तसंच पर्यटन विभागाचे संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. ‘प्रतिष्ठान ते पैठण’ हा त्यांचा ग्रंथ ...

January 18, 2026 7:27 PM

views 43

मुंबईतल्या भारतीय तटरक्षक दलाच्या (पश्चिम) प्रादेशिक मुख्यालयाला ॲडमिरल योशियो सेगुची यांनी दिली भेट

मुंबईतल्या भारतीय तटरक्षक दलाच्या (पश्चिम) प्रादेशिक मुख्यालयाला जपानच्या तटरक्षक दलाचे कमांडंट ॲडमिरल योशियो सेगुची यांनी त्यांच्या शिष्टमंडळासह काल भेट दिली. यावेळी भारतीय तटरक्षक दल आणि जपानच्या नॅशनल स्ट्राइक टीम च्या वतीने समुद्रात होणाऱ्या धोकादायक रासायनिक गळतीचा सामना करण्यासाठी विशेष सरावाच...

January 18, 2026 7:18 PM

views 102

जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस दावोसला रवाना

स्वित्झर्लंडमध्ये उद्यापासून सुरु होत असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज दावोस इथं पोहोचले. उद्योग मंत्री उदय सामंत आणि प्रशासनातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या पथकात समावेश आहे. या परिषदेत, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आ...

January 18, 2026 6:46 PM

views 48

किमान वेतन निश्चितीबाबतच्या दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओचे सरकारने केले खंडन

विकसित भारत रोजगार हमी आणि अजीविका मिशन (ग्रामीण) योजने बद्दल  चुकीचा दावा करणाऱ्या एका चित्रफितीचं सरकारनं खंडन केलं आहे. या योजने अंतर्गत कायदेशीर किमान वेतन निश्चित केलं जाणार नाही, असा दावा करणारी चित्रफीत दिशाभूल करणारी आहे, अशी माहिती पत्र सूचना कार्यालयानं दिली आहे. कामगारांच्या किमान वेतनात ...

January 18, 2026 6:38 PM

views 88

७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष निमंत्रणाची झलक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष निमंत्रणाची झलक समाज माध्यमावर सामायिक केली आहे. ईशान्य भारताच्या परंपरांचा गौरव साजरा करणारं हे निमंत्रण अष्टलक्ष्मी राज्यांच्या कुशल कारागिरांसाठी कौतुकाची थाप असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.      

January 18, 2026 6:32 PM

views 38

दिल्ली पोलिसांच्या सायबर शाखेकड आंतरराज्यीय आर्थिक गुंतवणूक फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफार्श

दिल्ली पोलिसांच्या सायबर शाखेनं आंतरराज्यीय आर्थिक गुंतवणूक फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफार्श करून ८ जणांना अटक केली.  व्हॉट्स अप कॉल द्वारे बनावट गुंतवणूक योजनांमध्ये लोकांना आकर्षित करून त्यांच्याकडून पैसे उकळणं अशी त्यांची कार्य पद्धती असल्याचं अतिरिक्त पोलिस आयुक्त अभिमन्यु पोसवाल यांनी सांग...

January 18, 2026 6:16 PM

views 44

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हा देशाच्या विकासाचा कणा आहे- मंत्री जीतन राम मांझी

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हा देशाच्या विकासाचा कणा असल्याचे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतन राम मांझी यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्ली इथं झालेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा हाट २०२६ च्या उद्घाटन समारंभात बोलत होते.  या व्यासपीठावर राष्ट्रीय खरेदीदार, आंतरराष्ट्रीय खरेदीदार, भाग...

January 18, 2026 4:13 PM

views 75

विदर्भात भांडवली उद्योग स्थापन करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल -नितीन गडकरी

विदर्भातील नैसर्गिक संसाधनं, कृषी क्षेत्र आणि कृषी आधारित उद्योग तसंच सेवा क्षेत्र यांचं व्यवस्थापन करून विदर्भात भांडवली उद्योग स्थापन करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट यांच्या वतीने ‘ॲडव्हांटेज विदर्भ २०२६- खासद...

January 18, 2026 8:04 PM

views 77

७७ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरता नवी दिल्ली सज्ज

७७ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरता नवी दिल्ली सज्ज झाली आहे. या सोहळ्याला युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कर्तव्यपथावर भारताच्या लष्करी सामर्थ्यासोबतच सांस्कृतिक समृद्धीचे प्रदर्शन होणार आहे. म...