October 14, 2024 6:20 PM

views 146

तलाठी आणि कोतवाल पदाच्या नावात राज्य सरकारकडून बदल

राज्य सरकारनं तलाठी पदाचं नाव बदलून ग्राम महसूल अधिकारी केलं आहे. कोतवाल पदाचं नाव बदलून महसूल सेवक करण्याचा शासन आदेशही सरकारनं आज जारी केला. या नाव बदलामुळं तलाठी किंवा कोतवालांचं काम किंवा वेतनश्रेणीत काहीही बदल होणार नाही. तलाठी आणि कोतवालांच्या संघटनेनं केलेल्या मागणीनुसार सरकारनं ही नावं बदलली...

October 14, 2024 6:31 PM

views 33

राज्य सरकारनं शिक्षकांवरचा भार कमी केल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचं स्थान अतिशय महत्त्वाचं असून आपल्या सरकारनं शिक्षकांवरचा भार कमी करण्याचा प्रयत्न केल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या विजेत्या शाळांना त्यांच्या हस्ते आज पुरस्कार देऊन गौरवण्यात आल...

October 14, 2024 3:31 PM

views 63

पॅरिस ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक आणि बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतले विजेते खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा तसंच बुडापेस्ट इथं झालेल्या बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या राज्यातील खेळाडूंचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्...

October 14, 2024 3:29 PM

views 55

राज्य शिक्षण मंडळाच्या कोकण विभागाच्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन

रत्नागिरी शहराजवळच्या कुवारबाव इथं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाच्या नियोजित प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं.   कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी आज रत्नागिरी रेल्वेस्थानकासम...

October 14, 2024 7:19 PM

views 25

सप्टेंबरमध्ये देशातला घाऊक महागाई दर १.८४ टक्क्यांवर

देशातला घाऊक महागाई दर सप्टेंबरमध्ये १ पूर्णांक ८४ शतांश टक्क्यांवर गेला आहे. ऑगस्ट मध्ये हा दर १ पूर्णांक ३१ शतांश टक्के होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाईत वाढ झाली आहे.

October 14, 2024 3:04 PM

views 35

कोल्हापूरच्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी कामाचं भूमीपूजन

कोल्हापूरच्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी कामाचं भूमीपूजन आज झालं. याकरता शासनाने २५ कोटी १० लाख रुपये निधी जाहीर केला असून येत्या दीड वर्षात हे काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार छत्रपती शाहू महाराज यावेळी उपस्थित होते. ८ ऑगस्टला हे ना...

October 14, 2024 3:01 PM

views 31

विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसची दिल्लीत बैठक

आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी आज काँग्रेसची दिल्लीत बैठक होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. तसंच महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेतेही उपस्थित राहतील, अशी माहिती काँग्रेस...

October 14, 2024 2:26 PM

views 26

महिलांच्या टी २० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना

महिलांच्या टी २० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात आज संध्याकाळी साडे ७ वाजता सामना होणार आहे.   पाकिस्तान हा सामना जिंकला तर भारताला उपांत्य फेरीत प्रवेश करायची संधी मिळेल. अ गटात ऑस्ट्रेलियानं काल भारतीय संघाला पराभूत केलं. त्यामुळं उपांत्य फेरीतली त्यांची जागा निश्चित झाली आ...

October 14, 2024 2:22 PM

views 62

वाढत्या घरभाड्याच्या विरोधात स्पेनमधल्या माद्रिदमध्ये आंदोलन

परवडणाऱ्या दरातली घरं आणि वाढत्या घरभाड्याच्या विरोधात स्पेनमधल्या माद्रिदमध्ये काल हजारो लोकांनी आंदोलन केलं. घरभाड्याची रक्कम कमी करावी आणि जगण्यासाठी चांगली परिस्थिती निर्माण करावी अशी त्यांची मागणी होती.   पर्यटकांना तात्पुरत्या स्वरुपात जागा देऊन अधिक उत्पन्न मिळत असल्यानं स्पेनमधल्या घरमा...

October 14, 2024 2:18 PM

views 74

तैवानजवळ लष्करी कवायतींना सुरुवात

चीनने तैवानजवळ लष्करी कवायतींना सुरुवात केली आहे. तैवानने आपला राष्ट्रीय दिवस साजरा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी या लष्करी कवायती होत आहेत. उत्तर, दक्षिण आणि पूर्व तैवानमध्ये सुरू असल्याचं चीनच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. चीनची लष्करी विमानं आणि जहाजं तैवानला चहुबाजूंनी वेढत आहेत, तैवानच्या हवाई...