October 18, 2024 8:21 PM

views 52

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचं आव्हान संपूष्टात

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगकडून पराभव पत्करावा लागला. मारिस्का तुनजुंगने सिंधूचा १३-२१, २१-१६, ९-२१ असा पराभव केला.

October 18, 2024 9:04 PM

views 46

मतदार याद्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत श्वेतपत्रिका काढण्याची महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या गैरप्रकारांची दखल निवडणूक आयोगानं घ्यावी आणि मतदार याद्यांमधल्या अनियमिततेबद्दल श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम ...

October 18, 2024 8:09 PM

views 41

सर्व भारतीय भाषांमध्ये शिक्षणाला चालना देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचं प्रतिपादन

सरकार सर्व भारतीय भाषांमध्ये  सुलभ आणि सोयीस्कर शिक्षणाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज सांगितलं. त्यांनी आज नवी दिल्लीत प्राकृत, पाली, मराठी, बंगाली आणि आसामी या पाच नवीन अभिजात भाषांच्या अभ्यासकांशी संवाद साधला. भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष ...

October 18, 2024 8:05 PM

views 64

टोलमुक्तीसाठी मनसे कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या तक्रारी मागे घेण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मागणी

मुंबईत टोलमुक्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलेल्या आंदोलना दरम्यान मनसे कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या तक्रारी मागे घेतल्या पाहिजेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. आज ते ठाण्यात वार्ताहरांशी बोलत होते. गेली अनेक वर्ष जी टोलवसुली सुरु होती त्यातून नक्की क...

October 18, 2024 9:02 PM

views 73

आसाम आणि बिहारमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी

आसाम आणि बिहारमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना आज जारी करण्यात आली. आसामध्ये विधानसभेच्या पाच जागांसाठी आणि बिहारमध्ये विधानसभेच्या चार जागांसाठी पोटनिवडणुक होत आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर आज नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. बिहारमध्ये इमामगंज, बेलागंज, रामगढ आणि तरारी या चार विधानसभा मतद...

October 18, 2024 7:54 PM

views 18

आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं आज मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. जैन यांचा संबंध असलेल्या चार कंपन्यांद्वारे मनी लाँड्रिंग केल्याच्या आरोपाखाली त्यांनी ईडीनं ३० मे २०२२ रोजी अटक केली होती.

October 18, 2024 7:50 PM

views 32

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीला अटक

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलांनी आज पुंछ जिल्ह्यात दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. संशयिताकडून चार ग्रेनेड जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पूंछ शहर आणि सुरनकोट शहरात झालेल्या दोन ते तीन ग्रेनेड हल्ल्यांशी या व्यक्तीचा संबंध असल्याचा पुंछ पोलिसांना संश...

October 18, 2024 7:37 PM

views 72

माजी नगरसेवक नाना बागुल तसंच नंदलाल वाधवा यांचा रिपाई पक्षात प्रवेश

आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी नगरसेवक नाना बागुल तसंच सिंधी समाजाचे ज्येष्ठ नेते नंदलाल वाधवा यांनी आज रिपाई अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटात  प्रवेश केला. त्याबाबतची घोषणा रिपाईचे  राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबई इथं केली. ...

October 18, 2024 7:32 PM

views 41

निवडणूक पारदर्शक वातावरणात पार पाडण्याकरता आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरु

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात विविध निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी तसंच निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत. आचारसंहिता संपेपर्यंत परवानाधारकांना शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. या काळात धरणं आंदोलन, मोर्चा, निदर्शनं, उपोषण करण्यावर ...

October 18, 2024 7:23 PM

views 33

गडचिरोली जिल्ह्यातल्या गोंडवाना विद्यापीठाला फिक्कीचा ‘संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व राष्ट्रीय पुरस्कार

गडचिरोली जिल्ह्यातल्या गोंडवाना विद्यापिठाला फिक्कीच्या संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व या राष्ट्रीय पुरस्कारानं तर महात्मा फुले कृषि विद्यापीठाला फिक्कीच्या सर्वोकृष्ट विद्यापीठ या पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं. दिल्लीत आज झालेल्या १९ व्या 'फिक्की हायर एज्युकेशन समिट २०२४' या कार्यक्रमात भारतातल...