October 24, 2024 2:52 PM

views 63

पोर्श कार प्रकरण : अरुणकुमार सिंह यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला

पुण्यात कल्याणीनगर इथं २ मोटारसायकल प्रवाशांना धडक देणाऱ्या पोर्श गाडीतल्या अरुणकुमार सिंह यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयानं काल फेटाळून लावला. घटनेनंतर मद्यपानाचे पुरावे लपवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलून तपास यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आरोपीच्या  रक्ताच्या नमुन्याची  ...

October 24, 2024 2:46 PM

views 30

‘दाना’ चक्रिवादळ ओडिशा किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

बंगालच्या उपसागरात तयार झालेलं दाना चक्रिवादळ आज मध्यरात्री ओडिशा किनारपट्टीवरच्या भितरकनिका आणि धामरा या प्रदेशांदरम्यान धडकण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दानाच्या भूभागावरचा वेग ताशी १०० ते १२० किलोमीटर असून उद्या पहाटेपर्यंत त्याचा प्रभाव राहील. सध्या हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टी...

October 24, 2024 2:39 PM

views 42

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी बिश्नोई टोळीशी संबंधित प्रवीण लोणकरला अटक

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात  लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित प्रवीण लोणकरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीणचा लोणकरचा भाऊ शुभम हा अद्यापही फरार असून पोलिस त्याच्या शोधात आहेत. शुभमच्या संपर्कात असलेल्या चौघांना मुंबई पोलिसांनी काल चौकशीसाठी ताब्यात घे...

October 24, 2024 2:37 PM

views 81

व्हिएन्ना ओपन : उपांत्य फेरीत रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडन जोडीचा सामना नील स्कुपस्की आणि मिशेल व्हिनस जोडीशी होणार

व्हिएन्ना ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडन या जोडीचा सामना ब्रिटनचा नील स्कुपस्की आणि न्यूझीलंडच्या मिशेल व्हिनस या जोडीशी आज होणार आहे. सायंकाळी चार वाजून ५० मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल.    याआधी झालेल्या सामन्यात रोहन बो...

October 24, 2024 1:42 PM

views 63

प्रधानमंत्री २७ तारखेला ‘मन की बात’ कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २७ तारखेला मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचा हा ११५ वा भाग आहे. श्रोते येत्या २५ तारखेपर्यंत टोल फ्री क्रमांक, नमो ॲप किंवा मायजीओव्ही ओपन फोरम वरून आपली मतं, सूचना पाठवू शकतात.

October 24, 2024 1:38 PM

views 56

राजस्थान आणि उत्तरप्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी यादी जाहीर

राजस्थान आणि उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राजस्थामधल्या चौरासी विधानसभा मतदारसंघासाठी तर उत्तर प्रदेशमध्ये कुंदरकी, गाझियाबाद, खैर, करहल, फुलपूर, कटेहरी आणि मझवा या मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे.

October 24, 2024 1:33 PM

views 27

हवामान बदलामुळे पायाभूत सुविधांवर प्रतिकूल परिणाम होत असून विकासाची गती मंदावल्याचं अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

हवामान बदलामुळे पायाभूत सुविधांवर प्रतिकूल परिणाम होत असून त्यामुळे विकासाची गती मंदावल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन काल म्हणाल्या. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी इथे भरलेल्या जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक बैठकीत त्या बोलत होत्या. आर्थिक गर्तेत सापडलेल्या देशांना कर्ज फेडण्...

October 24, 2024 1:28 PM

views 42

हॉकी : भारतीय पुरुष संघाचा सामना जर्मनीशी होणार

भारतीय पुरुष हॉकी संघाचा सामना आज दुपारी दिल्लीत मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर जर्मनीशी होणार आहे. सामन्याला दुपारी दोन वाजता सुरूवात होईल. पहिल्या सामन्यात भारताला जर्मनीविरुद्ध ०-२ असा पराभव पत्करावा लागला होता. जर्मनीकडून चौथ्या मिनिटाला हेन्रीक मर्टगेन्स आणि ३०व्या मिनिटाला कर्णधार लुकास विंडफे...

October 24, 2024 2:34 PM

views 55

भारतात शिक्षणासाठी जास्त खर्च, युनेस्कोच्या पाहणीचा निष्कर्ष

चीन किंवा जपानपेक्षा भारतात शिक्षणासाठी जास्त खर्च करण्यात येतो असं युनेस्कोच्या पाहणीत आढळलं आहे. भारतात शिक्षणावरचा खासगी आणि सरकारी खर्च आशियातल्या इतर देशांपेक्षा जास्त असल्याचं युनेस्कोच्या अहवालात म्हटलं आहे. २०१५ ते २०२४ या काळात शिक्षणाला प्रोत्साहन देण्याकरता स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या ४...

October 24, 2024 1:31 PM

views 25

रशियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्र्यांचं मायदेशी आगमन

रशियातल्या कझान इथं सोळाव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर काल रात्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मायदेशी आगमन झालं. ब्रिक्स शिखर परिषद अतिशय फलदायी होती, असं त्यांनी सांगितलं. या शिखर परिषदेत अनेक मुद्यांवर जगभरातल्या विविध नेत्यांसोबत प्रधानमंत्री मोदी यांची चर्चा झाली. रशियाचे अध्यक्...