November 8, 2024 2:44 PM

views 21

बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पंकज अडवाणीचा सामना सौरव कोठारीशी होणार

कतारमधे दोहा इथं सुरू असलेल्या जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज पंकज अडवाणीचा सामना सौरव कोठारीशी होणार आहे.   गतविजेत्या पंकजनं काल रात्री ध्रुव सितवालाचा ४-३ असा पराभव केला तर सौरव कोठारीनं ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह मिफसूदला नमवलं. दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडच्या रॉबर्...

November 8, 2024 2:39 PM

views 17

कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत किरण जॉर्जचा पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश

कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किरण जॉर्जनं पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं जपानच्या ताकुमा ओबायशीचा २१-१४, २१-१६ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.   त्याआधी उपउपांत्यपूर्व फेरीत त्यानं तैवानच्या ची यु जेनचा २१-१७, १९-२१, २१-१७ असा पराभव केला होत...

November 8, 2024 2:35 PM

views 49

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काँग्रेसवर टीका

माझी लाडकी बहीण, माझा लाडका शेतकरी  या योजना महायुती सरकारने आणल्या. परंतु काँग्रेसच्या सरकारने कर्नाटक, राजस्थान येथे अशा  योजनांची आश्वासनं पूर्ण केली नाहीत, हे सर्वांना माहीत आहे, असं लोक जाणतात, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर मधे सांगितलं.

November 8, 2024 2:33 PM

views 31

भ्रष्टाचार हा असा आजार आहे जो मुळापासून नष्ट झाला पाहिजे- राष्ट्रपती

भ्रष्टाचार हा असा आजार आहे जो मुळापासून नष्ट झाला पाहिजे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागरूकता सप्ताह २०२४ निमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.   डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम, ई मार्केटप्लेस आणि इकॉनॉमिक ऑफेंडर्स ॲक...

November 8, 2024 3:43 PM

views 46

ईडी कारवाईतून सुटका करण्यासाठी महायुतीमध्ये सामील झाल्याच्या वृत्ताचं भुजबळांकडून खंडन

ईडीच्या कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी महायुती सरकारमध्ये सामील झाल्याच्या वृत्ताचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी खंडन केलं आहे. आपण ओबीसी असल्यामुळे आपल्यावर कारवाई झाली असं भुजबळ यांनी म्हटल्याचं वृत्त ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी लिहीलेल्या पुस्तकाचा हवाला देत एका दैनिकाने ...

November 8, 2024 1:43 PM

views 8

निवडणुकीच्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत एक फिरतं प्रदर्शन आजपासून सुरु

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी राबवण्यात येणाऱ्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो आणि निवडणूक आयोगाच्या वतीनं एक फिरतं प्रदर्शन आजपासून सुरु होणार आहे. प्रदर्शन लावलेल्या या गाड्या १५ निवडक जिल्ह्यांमधे मतदानविषयक जनजागृतीचा संदेश घेऊन जाणार आहेत.   मुंबईत हो...

November 8, 2024 1:34 PM

views 27

छठ महापर्वाचा समारोप

उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या सूर्य नारायणाच्या छट पूजेच्या महापर्वाची सांगता आज होत आहे. गेले चार दिवस सुरू असलेल्या या उत्सवात नहाय खाय, खरना, सूर्यास्त पूजा आणि अर्घ्य अर्पण या विधींचा समावेश असतो. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये प्रामुख्याने छट पूजा साजरी केली जा...

November 8, 2024 1:26 PM

views 27

महाविकास आघाडी सरकारने बंद केलेल्या योजना पुन्हा सुरु करण्याचं अमित शहा यांचं आश्वासन

भारताला सर्व क्षेत्रात सर्वोत्तम बनवणं हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं लक्ष्य असून हे एनडीच सरकारचं करु शकतं असं केंद्रिय मंत्री अमित शहा यांनी सांगली इथं प्रचारसभेत म्हटलं आहे.   त्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. महाविकास आघाडीनं बंद केलेल्या योजना पुन्हा स...

November 8, 2024 1:24 PM

views 12

अलिगड मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्यक संस्थेचा दर्जा द्यायला सर्वोच्च न्यायालयाची सहमती

अलिगड मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्यक संस्थेचा दर्जा द्यायला सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली असून १९६७ सालच्या अजीज बाशा विरुद्ध केंद्र सरकार खटल्या प्रकरणातला निर्णय रद्दबातल ठरवला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाने चार विरुद्ध तीन अशा बहुमताने हा निर्णय ...

November 8, 2024 11:08 AM

views 14

कॉग्रेसच्या बंडखोर उमेदवारांचं सहा वर्षांसाठी निलंबन

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांना पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल आता कारवाईला समोर जाव लागणार असून, त्यांना पुढील सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती कॉँग्रेसचे कार्यकारी सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली...